कर्मवीर पुण्यतिथीचा कार्यक्रम झाला, पण आम्हाला 'तुझी' खूप आठवण आली! सुप्रिया सुळे यांची भावूक पोस्ट
रयत शिक्षण संस्थेत कर्मवीर भाऊराव पाटील यांची पुण्यतिथी साजरी झाली. त्यावेळी अजित पवार यांच्या आठवणीने खा. सुप्रिया सुळे भावूक झाल्या होत्या.


Published : May 9, 2026 at 7:19 PM IST
सातारा - सभागृह भरलेलं होतं, कार्यक्रमही उत्साहात पार पडला. पण, तरीही काहीतरी अपूर्ण असल्याची भावना सतत मनाला स्पर्श करत होती. दादा, आम्हाला तुझी खूप आठवण आली, अशी भावूक पोस्ट करत खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. रयत शिक्षण संस्थेच्या प्रांगणात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम शनिवारी पार पडला. शरद पवार यांच्यासह रयत शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. मात्र, दरवर्षी या कार्यक्रमाला आवर्जून आणि वेळेवर उपस्थित असणाऱ्या अजित पवारांची अनुपस्थिती प्रत्येकाला जाणवली.
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी सातारा येथे रयत शिक्षण संस्थेची बैठक आयोजित केली जाते. या बैठकीला ‘रयत’चे सर्व पदाधिकारी उपस्थित असतात.
— Supriya Sule (@supriya_sule) May 9, 2026
अजितदादा देखील दरवर्षी या बैठकीला आवर्जून आणि वेळेवर उपस्थित राहत असत. मात्र आज झालेल्या बैठकीत त्यांची अनुपस्थिती… pic.twitter.com/s3GsjOu7TK
साताऱ्यात दरवर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम होतो. तसंच रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलची बैठक होते. त्यावेळी खासदार शरद पवार यांच्यासह अजितदादा आवर्जून उपस्थित असायचे. अजितदादांचा शिस्तप्रिय आणि वक्तशीरपणा पाहायला मिळायचा. त्याची आज सुप्रिया सुळेंना आठवण आली. दादांचा बैठकीतील उत्साही वावर, त्यांची ऊर्जा, सर्वांशी संवाद साधण्याची शैली आणि प्रत्येक गोष्टीतला सहभाग आज पुन्हा पुन्हा आठवत होता. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर नकळत तीच भावना दिसत होती, असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त रयत शिक्षण संस्था, सातारा येथे आयोजित कार्यक्रमात उपस्थितांशी सुसंवाद साधला.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 9, 2026
संस्थेचे पदाधिकारी, विधिमंडळाचे सभासद, संसदेचे सभासद, विविध संस्थांचे प्रतिनिधी, रयतच्यासंबंधी आस्था असलेले आपण सगळे बंधू-भगिनी आणि तरुण मित्रांनो..… pic.twitter.com/itR5YErDgP
मागील वर्षी रयत शिक्षण संस्थेची बैठकीत संस्थेच्या उत्पन्नाची माहिती सभासदांना देताना अजित पवार यांना कागदपत्रांमधील विशिष्ट तपशील मिळत नव्हता. त्यावेळी शरद पवारांनी कागदपत्रातल्या तपशीलावर बोट ठेवत वाचायला सांगितल्यानंतर अजित पवारांनी ते वाचून दाखवले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर पवार काका-पुतणे राजकीयदृष्ट्या वेगळ्या पक्षात असतानाही रयत शिक्षण संस्थेच्या कामकाजाच्या निमित्ताने त्यांच्यातील जवळीक संपूर्ण राज्याने पाहिली होती.
हेही वाचा...

