ETV Bharat / state

विधिमंडळ परिसरात माहितीचा खजिना! ‘लोकराज्य’च्या 1964 वर्षांपासूनच्या निवडक दुर्मीळ अंकांचे प्रदर्शन

शासनाच्या विविध योजनांची माहिती व्हावी आणि हा अंक जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचावा, यासाठी ‘लोकराज्य’चे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

treasure trove of information in the Legislative Assembly premises
विधिमंडळ परिसरात माहितीचा खजिना (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : December 12, 2025 at 12:28 PM IST

|

Updated : December 12, 2025 at 1:59 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

नागपूर- विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्त महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र असलेले ‘लोकराज्य’ मासिकाचे प्रदर्शन विधिमंडळ परिसरात लावण्यात आले आहे. या प्रदर्शनात ‘ ज्ञानेश्वरी सप्तशताब्दी’ ते ‘खाद्यसंस्कृती महाराष्ट्राची’ असे दुर्मीळ अंक ठेवण्यात आले आहेत. प्रदर्शनात 1964 पासूनचे निवडक दुर्मीळ अंक ठेवण्यात आले आहेत. तसेच विविध विशेषांकही येथे पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. शासनाच्या विविध योजनांची माहिती व्हावी आणि हा अंक जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचावा, यासाठी ‘लोकराज्य’चे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

विधिमंडळ परिसरात माहितीचा खजिना (Source- ETV Bharat)

मासिक राज्याच्या जडणघडणीचा साक्षीदार ठरले - ‘लोकराज्य’ मासिक माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयामार्फत प्रकाशित होत असून, त्यास सात दशकांची परंपरा लाभली आहे. हे मासिक राज्याच्या जडणघडणीचा साक्षीदार ठरले आहे. महत्त्वपूर्ण घडामोडी, मंत्रिमंडळ निर्णय, माहितीपूर्ण विशेषांक विविध क्षेत्रांतील माहितीचा खजिना म्हणून लोकराज्य ओळखले जाते. विश्वासार्ह माहितीमुळे हे मासिक सर्वसामान्य वाचकांसोबतच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी उपयुक्त ठरले आहे.

treasure trove of information in the Legislative Assembly premises
विधिमंडळ परिसरात माहितीचा खजिना (Source- ETV Bharat)

महाराष्ट्राची संस्कृती जाणून घ्या - ज्ञानेश्वरी सप्तशताब्दी, महात्मा जोतिराव फुले स्मृती शताब्दी विशेषांक, मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर विशेषांक, मराठी संगीत रंगभूमी विशेषांक, छत्रपती शिवाजी महाराज विशेषांक, मराठी भाषा विशेषांक, कोकण विशेष, विदर्भ विशेषांक, आदिवासी विशेषांक, खाद्यसंस्कृती महाराष्ट्राची, संत परंपरा विषयक आदी विशेषांक आहेत.

treasure trove of information in the Legislative Assembly premises
विधिमंडळ परिसरात माहितीचा खजिना (Source- ETV Bharat)

चार हजारांवर नागरिकांनी दिली भेट- हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी या दालनाचे उद्घाटन माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार अमोल मिटकरी, आमदार भीमराव तापकीर, राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे, नागपूर विभागाचे माहिती आयुक्त गजानन निमदेव, विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच विधिमंडळ परिसरात राज्यभरातून आलेल्या चार हजारांवर नागरिकांनी या प्रदर्शनाला आतापर्यंत भेट दिली आहे.

treasure trove of information in the Legislative Assembly premises
विधिमंडळ परिसरात माहितीचा खजिना (Source- ETV Bharat)

महाराष्ट्राचं मुखपत्र हे कायदेविषयक साक्षरतेच्या दृष्टीने महत्त्वाचे - महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर विविध लोककल्याणकारी योजनांच्या माध्यमातून राज्यातील जनतेपर्यंत माहिती पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण काम लोकराज्यने केले आहे. शासनाने घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय हे कायद्याच्या स्वरूपात प्रशासनातून सर्वसामान्य जनतेला प्रत्ययास येतात. माहिती प्रसारासमवेत प्रशासनाप्रति विश्वासार्हता निर्माण करण्याचे कार्य लोकराज्य या शासकीय मासिकाने केले आहे. गत पाच दशकांपेक्षा अधिक कालावधीपासून जपून ठेवलेले हे अंक कायदेविषयक साक्षरतेच्या दृष्टीनेही तेवढेच महत्त्वाचे आहेत. प्रत्येक दशकात प्रशासकीय पातळीवर झालेल्या बदलांचे टप्पे दाखविणारे दस्ताऐवज म्हणून आपण पाहिले पाहिजे, असे राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडेंनी सांगितले आहे. या प्रदर्शनास मुख्य राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे आणि नागपूर खंडपीठ राज्य माहिती आयुक्त गजानन नीमदेव, मेट्रोचे संचालक अनिलकुमार कोकाटे यांनी भेट दिली.

treasure trove of information in the Legislative Assembly premises
विधिमंडळ परिसरात माहितीचा खजिना (Source- ETV Bharat)

लवकरच एका क्लिकवर माहिती उपलब्ध होणार - महाराष्ट्रातील लोकप्रशासन, महाराष्ट्र शासनाने घेतलेले महत्त्वपूर्ण विविध धोरणात्मक निर्णय याबद्दल संपूर्ण भारतात आकर्षण आहे. महाराष्ट्राच्या उभारणीमध्ये जडणघडणीमध्ये कालपरत्वे झालेल्या विविध निर्णयांची माहिती लोकराज्यच्या अंकामध्ये वेळोवेळी घेण्यात आलेली आहे. ही जडणघडण आणि यातील पाऊलखुणा असा मोठा दस्ताऐवज आता प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच जगातील प्रत्येक व्यक्तीला एका क्लिकवर डिजिटल पद्धतीनं उपलब्ध करण्याबाबत माहिती आणि जनसंपर्क विभाग नियोजन करीत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

treasure trove of information in the Legislative Assembly premises
विधिमंडळ परिसरात माहितीचा खजिना (Source- ETV Bharat)

विधानसभा परिसरापुरते मर्यादित राहू नये - ‘महाराष्ट्रातील एका काळाला अधोरेखित करणारे हे प्रदर्शन आहे. हे केवळ विधानसभा परिसरापुरते मर्यादित न राहता शहरातही महत्त्वाच्या ठिकाणी लावण्यात आले पाहिजे,’ अशी मौलिक सूचना नागपूर खंडपीठ राज्य माहिती आयुक्त गजानन नीमदेव यांनी केली. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना लोकराज्यच्या अंकातील माहिती ही मार्गदर्शक ठरत आली आहे. यापुढेही लोकराज्यचा अंक माहिती साक्षरतेसह विद्यार्थ्यांचाही मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.

हेही वाचाः

मुंबईकर लुटतायेत गुलाबी थंडीचा आनंद; 'एक्यूआय'मध्ये सौम्य सुधारणा, दोन दिवसात थंडी वाढणार

भर चौकात भाच्याने चाकूने सपासप वार करून मामाची केली हत्या, 19 गुन्हे असणाऱ्या गुंडाचा भयंकर शेवट

Last Updated : December 12, 2025 at 1:59 PM IST