ETV Bharat / state

ठाण्यात आईची क्रूरता! साडेतीन वर्षाच्या चिमुकल्याला दिले चटके

ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील किसन नगर येथे साडेतीन वर्षाच्या मुलावर आईकडून अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

Thane Crime News
आईने मुलाला दिले चटके (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : July 5, 2026 at 7:45 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

ठाणे : ठाण्यात एका निर्दयी आईने स्वतःच्या साडेतीन वर्षाच्या मुलाला गरम चाकू आणि उलथण्याने चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वागळे इस्टेट परिसरातील किसन नगर येथील शाळा क्रमांक 3 मध्ये शिकणाऱ्या या मुलावर त्याच्याच आईने अमानुष अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पीडित बालकाने आपल्या आजीसोबत शिवसेना मध्यवर्ती शाखेत जाऊन त्याच्यावर मारहाण करण्यात आल्याचं सांगितलं. तसेच गरम चाकू आणि उलथण्याने हात-पायांवर चटके दिल्याचाही आरोप त्यानं केला. मुलाच्या अंगावरील जखमा पाहून परिसरात संतापाची लाट उसळली.

कायदेशीर तक्रार दाखल : पीडित मुलगा आजीबरोबर शिवसेना मध्यवर्ती शाखेत पोहोचल्यानंतर तेथील पदाधिकाऱ्यांना संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर शाखाप्रमुख सुनील मोरे यांनी तातडीने मुलाला जवळील रुग्णालयात दाखल करून उपचाराची व्यवस्था केली. घटनेची गंभीर दखल घेत सुनील मोरे यांनी महिला पदाधिकाऱ्यांसह संबंधित महिलेच्या घरी धाव घेतली. त्यानंतर त्या महिलेला वागळे इस्टेट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं असून तिच्याविरुद्ध कायदेशीर तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस उपआयुक्त प्रशांत कदम यांनी दिली.

नागरिकांमध्ये तीव्र संताप : स्वतःच्या आईनेच साडेतीन वर्षाच्या मुलाला अशाप्रकारे मारहाण करून चटके दिल्याच्या आरोपामुळं नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. मुलावरील अत्याचाराच्या या घटनेची परिसरात जोरदार चर्चा सुरू असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. या संदर्भात वागळे इस्टेट पोलिसांकडं तक्रार देण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत असल्याची माहिती पोलीस उपआयुक्त प्रशांत कदम यांनी दिली.

हेही वाचा -

  1. अंधश्रद्धेचा कळस! 22 दिवसांच्या चिमुकलीच्या पोटावर दिले गरम विळ्याचे चटके, उपचाराच्या नावाखाली केलं संतापजनक कृत्य
  2. नवजात बाळाला आईनेच दिले 65 चटके; ग्रीन कॉरिडॉर करत रुग्णालयात हलवलं, अघोरी कृत्यानं खळबळ
  3. गावगुंडाचं क्रौर्य, अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून दिले सिगारेटचे चटके; मुंडणही केलं