ETV Bharat / state

चाकून हल्ला केल्यानं दोन सुरक्षा रक्षक जखमी; दहशतवादी हल्ला होता का? ठाणे एटीएस करणार तपास

ठाणे जिल्ह्यात एका व्यक्तीनं दोन सुरक्षा रक्षकांवर सोमवारी चाकूनं हल्ला केला. आरोपीला अटक करण्यात आली असून ठाणे एटीएसकडून तपास सुरू आहे.

knife attack in Thane
प्रतिकात्मक (Source- ETV Bharat)
author img

By PTI

Published : April 28, 2026 at 12:32 PM IST

|

Updated : April 28, 2026 at 12:40 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

ठाणे - अमेरिकेतून भारतात परतलेल्या एका व्यक्तीनं सोमवारी ठाणे जिल्ह्यात दोन सुरक्षा रक्षकांवर कथितरित्या चाकूनं हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केलं. हा हल्ला धार्मिक द्वेषातून केला असावा, असा संशय असल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं.

आरोपी झैब जुबेर अन्सारी (वय 31) असे संशयित आरोपीचं नाव आहे. नुकतेच तो अमेरिकेतून परतला आहे. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या ९० मिनिटांतच त्याला अटक करण्यात आली. हा गुन्हा 'मीरा रोड' भागात घडल्यानंतर या हल्ल्याचा तपास स्थानिक पोलिसांकडून राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकानं (ATS) वर्ग करून घेतला आहे, असेही अधिकाऱ्यांनी म्हटलं. या हल्ल्यामागील नेमका हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही.

अवघ्या दीड तासात अटक- मीरा-भाईंदर, वसई-विरार (MBVV) पोलीस आयुक्तालयाच्या माहितीनुसार नयानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत, वॉकहार्ट रुग्णालयाच्या मागील बाजूला असलेल्या एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत घडली. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अवघ्या दीड तासाच्या आत त्याला अटक करण्यात आली, असे पोलीस आयुक्तालयानं म्हटलं आहे.

मिश्रा यांची प्रकृती अद्यापही चिंताजनक- राजकुमार मिश्रा आणि सुब्रतो रमेश सेन अशी दुर्घटनेत जखमी झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. या हल्ल्यानंतर पोलिसांचे एक पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमींना वॉकहार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आला. बाचाबाचीदरम्यान आरोपीनं आधी मिश्रा यांच्यावर आणि त्यानंतर जवळच उभे असलेल्या सेन यांच्यावर चाकूनं वार केल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यानं दिली. मिश्रा यांची प्रकृती अद्यापही चिंताजनक आहे. तर सेन यांच्यावरही वैद्यकीय उपचार सुरू असल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं. आरोपीकडं काही संशयास्पद आणि गुन्हेगारी स्वरूपाचे साहित्य (incriminating material) सापडले. याच कारणामुळे एटीएसनं या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

दहशतवादी हल्ल्याचा संशय- आरोपी अन्सारी हा मूळचा मुंबईतील कुर्लामधील असून तो मीरा रोड येथील नयानगर परिसरात एकटाच राहत होता. शिक्षणासाठी अमेरिकेत गेल्यानंतर 2019 मध्ये भारतात परतला, असे सूत्रांनी सांगितलं. सुरक्षा यंत्रणांना त्याच्या मोबाईल फोनमधून काही संशयास्पद कागदपत्रे आणि व्हिडिओ सापडले आहे. हा आरोपी एखाद्या 'लोन वुल्फ' (एकट्याने केला जाणारा) हल्ल्याची तयारी करत होता, असा सुरक्षा यंत्रणेला संशय आहे. एटीएसच्या एका पथकानं मीरा रोड येथे अन्सारीची चौकशी केली. तसेच त्याच्या राहत्या घराची झडतीही घेतली. या तपासावर सध्या विशेष पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) डॉ. मनोज कुमार शर्मा हे देखरेख करत आहेत.

हेही वाचा

Last Updated : April 28, 2026 at 12:40 PM IST