ETV Bharat / state

TET पेपरफुटीवर मनसेचा संताप; मंत्र्यांच्या पोस्टरवर अंडी फोडून सरकारचा केला निषेध

टीईटी (TET) पेपरफुटीच्या संतापजनक प्रकारानंतर सोलापुरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीनं राज्य सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला.

मंत्र्यांच्या पोस्टरवर अंडी फोडून सरकारचा निषेध
मंत्र्यांच्या पोस्टरवर अंडी फोडून सरकारचा निषेध (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : June 28, 2026 at 2:37 PM IST

|

Updated : June 28, 2026 at 2:58 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

सोलापूर : शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटी प्रकरणामुळं राज्यभर संतापाची लाट उसळली असून, या प्रकरणाच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीनं सोलापुरात अनोखे आंदोलन करण्यात आले. कन्ना चौक येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिक्षणमंत्री दादा भुसे आणि शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांच्या पोस्टरवर अंडी फोडून मनसे कार्यकर्त्यांनी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

विद्यार्थी आणि पालकांमध्ये तीव्र नाराजी : नीट (NEET) पेपरफुटीचं प्रकरण ताजं असतानाच आता महाराष्ट्र शासनाच्यावतीनं आयोजित करण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) रद्द करण्याची वेळ आल्यानं विद्यार्थी आणि पालकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. ठाणे जिल्ह्यातील TET पेपरफुटी प्रकरणात काही संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असून, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

प्रतिक्रिया देताना प्रशांत इंगळे (ETV Bharat Reporter)

मंत्र्यांच्या पोस्टरवर फोडली अंडी : यावेळी बोलताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सोलापूर लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. "हे सरकार आमदार-खासदार फोडण्यात व्यस्त होते, आता पेपर फोडण्याचे उद्योग सुरू झाले आहेत. त्यामुळं आम्ही निषेध म्हणून मंत्र्यांच्या पोस्टरवर अंडी फोडली," असा टोला त्यांनी लगावला.



तरुणांचे भवितव्य धोक्यात : राज्यात विविध स्पर्धा परीक्षा आणि भरती प्रक्रियांमध्ये होत असलेल्या कथित घोटाळ्यांमुळं तरुणांचे भवितव्य धोक्यात आले आहे. या घोटाळ्यांतून मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार होत असून सरकार फोडाफोडीच्या राजकारणात गुंतले आहे, असा आरोपही मनसेच्यावतीनं करण्यात आला.



दोषींवर कठोर कारवाई करा : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातूनच हा पेपर फुटल्याचा आरोप करत, या संपूर्ण प्रकरणासाठी राज्यातील निष्क्रिय सरकार जबाबदार असल्याचं प्रशांत इंगळे यांनी म्हटलं. दोषींवर कठोर कारवाई करून भविष्यात अशा घटना रोखाव्यात, अशी मागणीही मनसेच्यांवतीनं करण्यात आली.

हेही वाचा -

  1. टीईटी पेपरफुटीवरुन राजकारण तापलं, 'सरकारचा जन्मच फोडाफोडीतून झाला', रोहित पवारांचा हल्लाबोल, राहुल गांधी म्हणाले 'तरुण असुरक्षित'
  2. टीईटी पेपरफुटीचा पर्दाफाश; दिल्लीहून भिवंडीत आणला पेपर, दीड कोटींच्या व्यवहारापूर्वी तिघांना अटक
  3. 'टीईटी'चा पेपर फुटला, 28 जूनची परीक्षा पुढे ढकलली, 1 लाख उमेदवारांना फटका
Last Updated : June 28, 2026 at 2:58 PM IST