ETV Bharat / state

राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवारांची एकमतानं निवड; प्रफुल्ल पटेल यांच्याकडून घोषणा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून औपचारिक घोषणा करण्यात आली.

Sunetra Pawar unanimously elected as NCP national presiden
सुनेत्रा पवार यांची एकमतानं राष्ट्रवादीच्या अध्यक्ष पदी निवड (Source- ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : February 26, 2026 at 7:19 PM IST

|

Updated : February 26, 2026 at 7:36 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या अध्यक्ष पदी त्यांच्या पत्नी, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची आज निवड झाली. सुनेत्रा पवार यांच्या नावाला राष्ट्रवादीच्या सर्वनेत्यांनी एकमतानं अनुमोदन दिलं. सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्ष पदाच्या निवडीची घोषणा प्रफुल्ल पटेल यांनी केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूनंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पण, त्यानंतर पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं वरळी येथील ‘एनएससीआय’ (NSCI) डोम येथे पार पडलेल्या या बैठकीत राज्य आणि केंद्रीय कार्यकारिणीच्या सदस्यांनी एकमतानं सुनेत्रा पवार यांच्या नावाला मंजुरी दिली. अध्यक्षपदासाठी पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेल यांचीही नावे चर्चेत होते. मात्र, अखेरीस सुनेत्रा पवार यांच्यावर सर्वानुमते शिक्कामोर्तब करण्यात आलं.

Sunetra Pawar unanimously elected as NCP national presiden
सुनेत्रा पवार यांची एकमतानं राष्ट्रवादीच्या अध्यक्ष पदी निवड (Source- ETV Bharat Reporter)



सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वात पुन्हा उभे राहू! राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी सुरुवातीला प्रफुल्ल पटेल यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा होती. त्यातच केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी एका मुलाखतीत पटेल यांचा उल्लेख राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून केल्यानं राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. टीका वाढल्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांसमोर येत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, अखेरीस त्यांनीच राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा करून चर्चेला पूर्णविराम दिला.

Sunetra Pawar unanimously elected as NCP national presiden
सुनेत्रा पवार यांची एकमतानं राष्ट्रवादीच्या अध्यक्ष पदी निवड (Source- ETV Bharat Reporter)



यावेळी बोलताना राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं, “अजितदादा गेल्यामुळे पक्षाचं खूप मोठं नुकसान झालं. ते नुकसान भरून निघणारं नाही. पण, यापुढे जे काम अजितदादांच्या नेतृत्वाखाली केले. तेच काम सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वात आपण करून दाखवू. अजितदादांचे निधन झाल्यानंतर अनेक राजकारण झालं. पण, योग्यवेळी योग्य निर्णय करण्यासाठी आपण सर्व आमदारांनी मदत केली यासाठी मी तुमचा आभारी आहे.”

Sunetra Pawar unanimously elected as NCP national presiden
सुनेत्रा पवार यांची एकमतानं राष्ट्रवादीच्या अध्यक्ष पदी निवड (Source- ETV Bharat Reporter)

केवळ औपचारिक घोषणा बाकी होती- 16 फेब्रुवारी रोजी देवगिरी बंगल्यावर सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदार आणि मंत्र्यांची बैठक बोलावली होती. पक्षाच्या आमदार-मंत्र्यांसोबतची त्यांची ही पहिलीच बैठक ठरली. याच बैठकीत प्रफुल्ल पटेल यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घोषणा केली. उपस्थित सर्व आमदारांनी त्यांच्या नावाला समर्थन दर्शवले, अशी माहिती समोर आली होती. त्यानंतर केवळ औपचारिक घोषणा बाकी होती.



महाराष्ट्रात सुनेत्रा पर्व सुरू- तटकरे- आज झालेल्या राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत प्रफुल्ल पटेल यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव अधिकृतपणं मांडला. पक्षाच्या आमदार आणि नेत्यांनी एकमतानं त्यास समर्थन दिल्यानंतर पटेल यांनी सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा म्हणून घोषित केले. यावेळी बोलताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी म्हटले, “आज नियतीनं इतका दुर्दैवी क्षण आपल्यावर आणला आहे का? सुनेत्रा पवारांची निवड आज राष्ट्रीय अध्यक्षपदी करत आहोत. अजितदादांचं एक भाषण होतं की, जरी मला एकटं पाडण्याचा प्रयत्न होत असेल तर मी एकटा नाही. बारामतीकर माझ्यासोबत आहेत. जेव्हा अजितदादांना एकटं पाडण्याचा प्रयत्न केला गेला तेव्हा राजधर्म आणि धर्मशास्त्राचं पालन करत आम्ही अजितदादांच्या पाठीशी उभे राहीलो. आज अजितदादा गेल्यानंतर 40 वर्ष त्यांची सावलीसारखी साथ देणाऱ्या सुनेत्रा पवारांच्या मागे उभं राहणं, हाच आमचा राजधर्म आहे. आम्ही टीकेचे धनी झालो तरीही आम्ही सुनेत्रा पवारांच्यासोबत उभे राहणार आहोत. सुनेत्रा पर्व आजपासून या महाराष्ट्रात सुरू झालं आहे.”

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीवरून दोन्ही राष्ट्रवादी गटांतील पदाधिकारी, आमदार आणि खासदारांमध्ये सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे.


हेही वाचा-

Last Updated : February 26, 2026 at 7:36 PM IST