ETV Bharat / state

मान्सून केरळमध्ये दाखल, पुढील 3 ते 4 दिवसात राज्यात दाखल होणार!

पुढील तीन ते चार दिवसात मान्सून राज्यात दाखल होणार असल्याची माहिती पुणे हवामान विभागाने दिली.

Monsoon Arrives In kerala
केरळमध्ये मान्सून दाखल (ANI)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : June 4, 2026 at 4:58 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

पुणे - दरवर्षी एक जूनला मान्सून केरळमध्ये दाखल होत असतो. मात्र, यंदा चार जूनला मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. पुढील तीन ते चार दिवसात मान्सून राज्यात दाखल होणार असल्याची माहिती पुणे हवामान विभागाचे प्रमुख डॉ एस. डी.सानप यांनी दिली. त्यामुळं सर्वसामान्य, शेतकरी राजाला दिलासा मिळणार आहे. शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व कामे पूर्ण केली आहेत.

मान्सूनबाबत पुणे हवामान विभागाच्या प्रमुखांनी दिली माहिती (ETV Bharat Reporter)

तळकोकणात मान्सून दाखल होणार - "मान्सून हा केरळमध्ये दाखल झाला असून, कर्नाटक येथील काही भाग तसेच तामिळनाडू येथील काही भागात मान्सून दाखल झाला आहे. येणाऱ्या तीन ते चार दिवसात तळकोकणात मान्सून दाखल होणार आहे. मान्सूननं केरळ पूर्ण कव्हर केलं असून, यंदा चार दिवस उशिरा दाखल झाला आहे. अरबी समुद्रात चक्री स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे मान्सून चार दिवस उशिरा केरळमध्ये दाखल झाला," अशी माहिती पुणे हवामान विभागाचे प्रमुख डॉ एस. डी.सानप यांनी दिली.

मान्सूनपूर्व पावसाचा 'यलो अलर्ट' - "यंदा देशात सरासरीच्या 90 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. यात अधिक किंवा उणे 4 टक्के मॉडेल एरर गृहीत धरल्यास पाऊस 86 टक्के ते 94 टक्के दरम्यान असण्याची शक्यता आहे. सध्या महाराष्ट्रातील बहुतांश भागात मान्सूनपूर्व वादळी पाऊस हजेरी लावत आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये येत्या दोन दिवसांसाठी मान्सूनपूर्व पावसाचा 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. दोन दिवसांनंतर पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांमध्ये 'यलो अलर्ट' कायम असणार आहे," असं डॉ एस. डी.सानप म्हणाले.

weather forecast
मान्सूनची वाटचाल नकाशा (पुणे हवामान विभाग कार्यालय)

दक्षिण भारतातील अनेक राज्यात मान्सून दाखल - भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) माहितीनुसार, नैऋत्य मोसमी पाऊस गुरुवारी केरळमध्ये दाखल झाला. "नैऋत्य मान्सूनने 4 जून रोजी अरबी समुद्र, लक्षद्वीप बेटे, केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडूचा काही भाग, कोमोरिन क्षेत्राचा उर्वरित भाग, आग्नेय बंगालचा उपसागर आणि नैऋत्य, पश्चिम-मध्य, पूर्व-मध्य आणि ईशान्य बंगालच्या उपसागराच्या काही भागांमध्ये हजेरी लावली आहे," असे भारतीय हवामान विभागाने (IMD) म्हटले आहे.

यापूर्वी, हवामान खात्याने केरळमध्ये २६ मे रोजी मान्सून सुरू होईल असा अंदाज वर्तवला होता; तथापि, त्याच्या आगमनास विलंब झाला. गेल्या आठवड्यात, हवामान खात्याने मोसमी पावसाचा आपला अंदाज सुधारित केला असून, पाऊस सामान्यपेक्षा कमी राहील, असे सूचित केले आहे.

हेही वाचा - महाराष्ट्रात यंदा सरासरीच्या 98% पावसाचा अंदाज पण...; विदर्भात पाऊस उशिरानंच येणार