ETV Bharat / state

मुलानं वृद्ध आई वडिलाला काढलं घराबाहेर : जिल्हाधिकाऱ्यांनी 15 दिवसात घर खाली करण्याचे मुलाला दिले आदेश

आई वडिलाला त्रास देत मुलानं त्यांना घराच्या बाहेर काढून दिलं. मात्र पोलीस ठाण्यात धाव घेतलेल्या आई वडिलाला जिल्हाधिकाऱ्यांनी दिलासा दिला.

GONDIA COLLECTOR ON ELDERLY PARENTS
याच घरातून काढण्यात आलं आई वडिलाला बाहेर (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 25, 2026 at 2:54 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

गोंदिया : शहरातील एका मुलानं आपल्या वृद्ध आई-वडिलांना मानसिक व शारीरिक त्रास देत घरातून बाहेर काढल्यानं मोठी खळबळ उडाली. ही धक्कादायक घटना गोंदिया शहरातील गौतम नगर इथली असून त्या वृद्ध आई-वडिलानं याची तक्रार गोंदिया शहर पोलिसात केली. या तक्रारी वरून मुलाविरोधात गोंदियाचे जिल्हाधिकारी तथा वरिष्ठ नागरिक अपील प्राधिकरण यांनी महत्त्वपूर्ण निर्णय देत संबंधित मुलाला 15 दिवसात घर खाली करण्याचे आदेश दिले आहेत. ज्येष्ठ नागरिकांच्या संरक्षणाच्या दृष्टीनं हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

मुलानं आई वडिलाला काढलं घराबाहेर : गौतमनगर बाजपेयी वॉर्ड येथील कौशल्या हरिराम मंदारकर (वय 79) व हरिराम धाडू मंदारकर (वय 86) हे स्वमालकीच्या घरात राहत होते. संबंधित घर हे कौशल्या मंदारकर यांच्या नावावर आहे. वृद्धापकाळात शांततेनं जीवन जगण्याची अपेक्षा असताना त्यांचाच मुलगा दिनेश मंदारकर हा वारंवार मालमत्तेच्या कारणावरून त्यांच्याशी वाद घालत होता. शिवीगाळ, धमक्या देत होता. सततच्या भांडणांमुळे वृद्ध दाम्पत्याचं जीवन असह्य झालं. मोठ्या भावासोबत झालेल्या वादानंतर त्यानं संतापाच्या भरात वृद्ध आई-वडिलांना चक्क घराबाहेर काढत त्यांच्या वस्तूही घराबाहेर फेकून दिल्या. त्यामुळे वृद्ध दाम्पत्याला दुसरीकडे आश्रय घ्यावा लागला.

आई वडिलानं गाठलं पोलीस ठाणं : याप्रकरणी हरिराम मंदारकर यांनी मुलानं घराबाहेर काढल्याप्रकरणी गोंदिया शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर ज्येष्ठ नागरिक कायद्यांतर्गत न्यायासाठी अर्ज करण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावणीदरम्यान घर हे वृद्ध दाम्पत्याच्या स्वमालकीचं असल्याचं स्पष्ट करत मुलाला त्यांच्या इच्छेविरुद्ध घरात राहण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नसल्याचं म्हटलं. ज्येष्ठ नागरिकांना स्वतःच्या घरात सन्मानानं व सुरक्षितपणे राहण्याचा पूर्ण अधिकार आहेत. त्यामुळे मुलाला 15 दिवसात घर खाली करण्याचे आदेश जिल्हाधिकारी मंगेश गोंदावले यांनी दिले आहेत.

हेही वाचा :

  1. बैतूल हादरलं! 25 वर्षीय युवकानं केला आई-वडील आणि भावाचा खून, घरातील मांजरीलाही सोडलं नाही
  2. नांदेड हादरलं; कुटुंबातील आई-वडील अन् दोन भावांचा मृत्यू, आत्महत्या की घातपात पोलिसांचा शोध सुरू
  3. लेकानं पुरवला अनोखा हट्ट; 80 वर्षीय बापाचं दिलं थेट लग्नच लावून, वरातीत बाप-लेक-नातवंड 'झिंगाट' - Marriage Ceremony Amravati