सोलापुरात खळबळ! लोकप्रिय रीलस्टार रोहिणी पाराध्येची आत्महत्या; आत्महत्येचं कारण गुलदस्त्यात
सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या साध्या आणि हसऱ्या अभिनयानं लाखो लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारी रील स्टार रोहिणी निलेश पाराध्ये हिनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Published : May 28, 2026 at 11:28 AM IST
|Updated : May 28, 2026 at 1:53 PM IST
सोलापूर : जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली असून, लोकप्रिय रीलस्टार विवाहित महिलेने आत्महत्या केल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. रोहिणी निलेश पाराध्ये (Rohini Paradhye) (वय 25) यांनी अज्ञात कारणातून ब्रह्मपुरी येथील ‘हॉटेल ग्रामपंचायत’च्या (Hotel Gram Panchayat) स्वयंपाकघरात आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी साडेदोनच्या सुमारास घडली. या प्रकरणी पती निलेश पाराध्ये यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
रील्सस्टार रोहिणी पाराध्येची आत्महत्या होऊन तीन दिवस झाले आहे. मंगळवेढा पोलीस ठाण्यात याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नातेवाईकांनी अजून तक्रार दिली नाही.अंत्यविधी आणि इतर विधी करून नातेवाईकानी तक्रार दिल्यास त्या अनुषंगानं तपास करण्यात येणार आहे. - दत्तात्रय बोरीगिध्दे, पोलीस निरीक्षक मंगळवेढा पोलीस ठाणे
खाद्यपदार्थांवरील रील्समुळं सोशल मीडियावर लोकप्रिय : रोहिणी पाराध्ये आणि त्यांचे पती निलेश पाराध्ये हे मागील काही वर्षांपासून विविध सामाजिक विषय आणि खाद्यपदार्थांवरील रील्समुळं सोशल मीडियावर लोकप्रिय झाले होते. त्यांच्या लोकप्रियतेच्या जोरावर त्यांनी रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील ब्रह्मपुरी येथे ‘हॉटेल ग्रामपंचायत’ हा व्यवसाय सुरू केला होता. व्यवसाय विस्ताराची तयारी सुरू असतानाच पत्नी रोहिणी हिने अचानक आत्महत्या केल्यामुळं हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, रोहिणी यांनी आत्महत्या नेमकी कोणत्या कारणामुळं केली, याचं गूढ अद्याप कायम असून पोलीस अधिकचा तपास करत आहेत.
टीप - आत्महत्या हा उपाय नाही : जर तुमच्या मनात आत्महत्येचे विचार येत असतील, किंवा तुम्हाला एखाद्या मित्राची काळजी वाटत असेल, किंवा तुम्हाला भावनिक आधाराची गरज असेल, तर तुमचे ऐकण्यासाठी नेहमीच कोणीतरी आहे. स्नेहा फाउंडेशन - 04424640050 (24x7 उपलब्ध) किंवा आयकॉल, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस हेल्पलाइन 9152987821 वर कॉल करा (सोमवार ते शनिवार सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत उपलब्ध).
हेही वाचा -

