ETV Bharat / state

ऐकावं ते नवलच! देशी गाईच्या शेणापासून बनवली गादी, जाणून घ्या फायदे

शेणाचे खूप फायदे असल्याचं आपण वाचलं असून, शेणात नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम यांसारखे आवश्यक घटक असतात, जे वनस्पतींच्या वाढीसाठी महत्त्वाचे ठरतात.

six by three inch mattress was made from the dung of an indigenous cow
देशी गाईच्या शेणापासून बनविली सहा बाय तीन इंचाची गादी (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : December 27, 2025 at 3:49 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

पुणे : शेणाचे अनेक फायदे आहेत, ज्यात नैसर्गिक खत म्हणून मातीची सुपीकता वाढवणे, जैविक ऊर्जा (बायोगॅस) निर्माण करणे, कीटकनाशक म्हणून वापर करणे आणि धार्मिक आणि पारंपरिक औषधांमध्ये त्याचा उपयोग करणे यांसारख्या गोष्टींचा समावेश होतो, ज्यामुळे ते शेती, ऊर्जा आणि आरोग्य क्षेत्रासाठी एक बहुपयोगी नैसर्गिक साधन ठरते. शेणाचे खूप फायदे असल्याचं आपण वाचलं असून, शेणात नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम यांसारखे आवश्यक घटक असतात, जे वनस्पतींच्या वाढीसाठी महत्त्वाचे ठरतात.

देशी गाईच्या शेणापासून बनवली गादी (ETV Bharat Reporter)

शेणाच्या गादीच्या पेटंटसाठी अर्ज : शेणाचे वैज्ञानिक फायदेदेखील आहेत. हेच फायदे ओळखत पुण्यातील देवयानी तांबोळी यांनी देशी गाईच्या शेणापासून सहा फूट बाय तीन फूट गादी बनविलीय. तसेच मातीतून पर्यावरणपूरक भांडी तयार केली असून, त्यांनी तयार केलेल्या या शेणाच्या गादीच्या पेटंटसाठी अर्जही केलाय. लवकरच नावावर हे पेटंट मिळणार आहे. गाईच्या शेणापासून गादी, रांगोळी, आसन, दिवे तर खास लॅब टेस्टेड मातीपासून स्वयंपाकासाठी लागणारी भांडी आणि पाण्याची भांडी तयार करून एक वेगळा उपक्रम देवयानी यांनी सुरू केला असून, त्याला उत्तम असा प्रतिसाद मिळतोय.

six by three inch mattress was made from the dung of an indigenous cow
देशी गाईच्या शेणापासून बनविली सहा बाय तीन फुटांची गादी (Source- ETV Bharat)

देशी गाईच्या शेणात खूप गुणधर्म असतात : यावेळी देवयानी तांबोळी म्हणाल्या की, "मिट्टी हब आणि माय माते असे माझे दोन ब्रँड आहेत. मी गेल्या 10 वर्षांपासून लॅब टेस्टेड सर्टिफायड प्रॉडक्टमध्ये काम करीत असून, आता आम्ही शेणापासून विविध पदार्थ बनवतोय. आम्ही शेणाची फोल्डेड गादी आणि विविध आसन बनविलीत. देशी गाईच्या शेणात खूप गुणधर्म असतात आणि हे आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचे असतात."

six by three inch mattress was made from the dung of an indigenous cow
देशी गाईच्या शेणापासून बनविली सहा बाय तीन फुटांची गादी (Source- ETV Bharat)

अनेक वैज्ञानिक फायदे : देशी गाईच्या शेणामुळे आपल्या शरीरातील तापमान हे योग्य राहत थंडीतही ऊब मिळते आणि उन्हाळ्यात थंडावा मिळतो. तसेच याचे अनेक वैज्ञानिक फायदे आहेत. याच्या पेटंटसाठी देखील हे फाइल करण्यात आलंय. देशी गायीपासून जी गादी बनविण्यात आली आहे, ती सहा बाय तीन फुटांची आहे आणि ही गादी सर्व महिला हाताने विणतात. गादी बनवण्यासाठी जवळपास सहा ते सात तास लागत असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं.

हेही वाचा -

  1. चिकन की मटण; मधुमेह ग्रस्तांनी काय खावं? जाणून घ्या तज्ञांचं मत
  2. रात्री झोपण्यापूर्वी फक्त एक वेलची खा, आठवड्यात दिसू लागतील ‘हे’ बदल
  3. सकाळी रिकाम्यापोटी चुकूनही खाऊ नये हे पदार्थ; अन्यथा पडेल महागात