ETV Bharat / state

'युती, आघाडीशी पुणेकरांना...'; थेट विधान करत आबा बागुल यांनी विजयाचा व्यक्त केला विश्वास

पुणे आणि पिंपरी - चिंचवडमध्ये युतीबाबत अजूनही निर्णय झालेला नाही. यावर पुण्यातील शिवसेनेचे नेते आबा बागुल यांनी भाष्य केलं.

Etv Bharat
Etv Bharat (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : January 2, 2026 at 1:54 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

पुणे - महानगरपालिका निवडणुकीसाठी पक्षांसह उमेदवारांनी जोरदार तयारी केलीय. येत्या 15 जानेवारीला मतदान होणार असून, 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. राज्यात सध्या महायुतीचं सरकार असल्याने महापालिका निवडणुकीसाठी युती, आघाडी होण्याबाबत अजूनही अनेक ठिकाणी निर्णय झालेला नाही. पुण्यातही तशीच परिस्थिती आहे.

युतीबाबत अजूनही निर्णय नाही - राज्यात जाहीर झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून, महायुती संदर्भात अजूनही कोणताही निर्णय झालेला नाही. महायुतीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अंतिम निर्णय घेणार आहेत. असं असताना पुण्यात शिवसेना नेते आबा बागुल यांनी मोठं विधान करत पुणेकरांना युती, आघाडीशी काहीही देणंघेणं नाही. आम्हाला पुणेकरांचे प्रश्न आणि पुण्याचा विकास महत्त्वाचा असून, मुंबई, ठाणेप्रमाणे पुण्यात देखील शिवसेनेचा महापौर आम्ही निवडून आणू, असा विश्वास आबा बागुल यांनी व्यक्त केला.

प्रतिनिधींनी आबा बागुल यांच्यासोबत साधलेला संवाद (ETV Bharat Reporter)

पुण्यातही भगवा भडकवायचा - अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस असताना पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे अजूनही महायुतीबाबत कोणताही निर्णय न झाल्याने आता शिवसैनिकांनी स्वबळाची तयारी सुरू केलीय. पुण्यातही भगवा फडकावला पाहिजे, असं मत शिवसैनिकांचं असल्याचं यावेळी आबा बागुल म्हणाले.

पुणेकरांना युती, आघाडीशी देणंघेणं नाही - महायुतीबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय घेण्यात येणार आहे. पुणेकरांना युती, आघाडीबाबत काहीही देणंघेणं नसून, पुण्याचे प्रश्न आणि पुण्याचा विकास हे त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. ज्या पद्धतीनं लाडकी बहीण योजना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणली, त्याच धर्तीवर आम्हाला पुण्यातील महिलांसाठी विविध योजना सुरू करायच्या आहेत. तसंच पुण्याचे प्रश्न, वाहतूक समस्या यावर शिवसेना काम करणार असल्याचं यावेळी आबा बागुल म्हणाले.

हेही वाचा -

  1. अहिल्यानगरमध्ये मनसेचे दोन उमेदवार गायब; अपहरण झाल्याचा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना संशय
  2. 'अजित पवारांच्या गुन्हेगार उमेदवारांमुळे पुणे शहरात १०० टक्के गुन्हेगारी वाढेल'-मुरलीधर मोहोळ
  3. छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक; छाननीत 97 उमेदवारांचे अर्ज बाद, माजी महापौरांवर अपक्ष म्हणून लढण्याची वेळ