ETV Bharat / state

शिवसेनेचा स्ट्राईक रेट चांगला, नाशिक महापालिकेवर भगवा फडकेल; खासदार श्रीकांत शिंदे

नाशिक महापालिका निवडणूक 2026 मध्ये मोठी चुरस पाहायला मिळत आहे. नाशिकमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती आहे. त्यावरुन श्रीकांत शिदेंनी मोठं वक्तव्य केलं आहे.

Shrikant Shinde On Election
खासदार श्रीकांत शिंदे (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : January 7, 2026 at 9:20 PM IST

|

Updated : January 7, 2026 at 9:45 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

नाशिक : "नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेचा स्ट्राईक रेट चांगला होता. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील पाच नगर परिषदांवर शिवसेनेचे नगराध्यक्ष विराजमान झाले. नाशिककरांनी शिवसेनेला नेहमी भरभरून दिलं आहे. गेल्या वेळी शिवसेनेचे 35 नगरसेवक निवडून आले. आता शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढत आहे. त्यामुळे आम्हाला नाशिकमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोठं यश मिळेल. आताही नाशिक महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकेल," असा विश्वास खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला. खासदार श्रीकांत शिंदे नाशिक दौऱ्यावर असून, त्यांच्या उपस्थितीत शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ ‘रोड शो’चं आयोजन करण्यात आलं. काळाराम मंदिरात आरती केल्यानंतर उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

Shrikant Shinde Road Show In Nashik
खासदार श्रीकांत शिंदे (ETV Bharat Reporter)

शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांचा रोड शो : "नाशिक महानगरपालिका निवडणुकीत सर्वच पक्षाकडून जोरदार प्रचार केला जात आहे. अशातच आज शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी रोड शो करत शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून देण्याचं मतदारांना आवाहन केलं. महाराष्ट्रात चांगली कामं झाली, नाशिकचा सुद्धा नगरविकास खात्याच्या माध्यमातून चांगला विकास होईल. नागरिकांना देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामावर विश्वास आहे. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेवर भगवा फडकेल. नाशिकमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी एकत्रित निवडणूक लढवत आहे. त्यामुळे आम्हाला आणखी चांगलं यश मिळेल," असं खासदार श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं.

शिवसेनेचा स्ट्राईक रेट चांगला, नाशिक महापालिकेवर भगवा फडकेल; खासदार श्रीकांत शिंदे (ETV Bharat Reporter)

शिवसेनेचा स्ट्राईक रेट चांगला : "नाशिकमध्ये शिवसेनेची हवा पाहायला मिळतं आहे. नाशिक महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकेल. याआधी देखील 35 नगरसेवक निवडणूक आले. आता आमच्यासोबत राष्ट्रवादी आहे. आता आणखी यश मिळेल. आम्ही आकड्याच्या गणितात जात नाही. शिवसेनेचा महापौर होईल. एकनाथ शिंदे यांच्या काळात जास्त काम झालं. जास्त निधी महाराष्ट्राला मिळाला. नवीन योजना आणण्याचं काम झालं. नाशिकला निधी आणण्याचं काम केलं. कुंभमेळा येतोय, तयारी सुरू आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तयारी जोरात करत आहेत. नगरविकास खात्याच्या माध्यमातून नाशिकचा विकास होईल. बंडखोर उमेदवारांचा प्रॉब्लेम नाही. नगरपालिकेला होते. शिवसेनेचा स्ट्राईक रेट चांगला आहे. 135 पैकी 64 जागी नगराध्यक्ष विराजमान झाले," असं खासदार श्रीकांत शिंदे यांनी यावेळी सांगितलं.

हेही वाचा :

  1. विनोद कांबळी यांच्या मदतीसाठी डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशनकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर
  2. मतमोजणी सर्व निवडणुका झाल्यावरच करावी, श्रीकांत शिंदेंची मागणी
  3. राज्यातील सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होणार का? आता श्रीकांत शिंदे म्हणतात...
Last Updated : January 7, 2026 at 9:45 PM IST