ETV Bharat / state

इटलीच्या भक्ताकडून साईचरणी 11 लाख 19 हजारांचं सोन्याचं ब्रोच अर्पण!

इटलीत स्थायिक असणारे साईभक्त सतीश कुमार चान्ना यांनी शिर्डीत साईबाबांच्या चरणी 11 लाख 19 हजार रुपये किमतीचे, 75 ग्रॅम वजनाचे हिरेजडीत सोन्याचे ब्रोच अर्पण केले.

Shirdi Sai Baba Temple receives diamond studded gold brooch
इटलीच्या भक्ताकडून साईचरणी सोन्याचं ब्रोच अर्पण (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : August 27, 2026 at 3:51 PM IST

|

Updated : August 27, 2026 at 3:57 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

शिर्डी : साईबाबांवर देश-विदेशातील कोट्यवधी भाविकांची श्रद्धा आहे. भाविक साईबाबांच्या झोळीत भरभरून दान देत असतात. अशाच प्रकारे इटली येथील साईभक्त सतीश कुमार चान्ना यांनी 11 लाख 19 हजार रुपये किमतीचं 75 ग्रॅम वजनाचं आकर्षक नक्षीकाम केलेलं हिरेजडीत सोन्याचं 'ब्रोच' आज साईबाबांच्या चरणी अर्पण केलं.

नक्षीकाम केलेलं हिरेजडीत सोन्याचं ब्रोच-मूळचे नवी दिल्लीचे पण सध्या इटलीत स्थायिक असणारे साईभक्त सतीश कुमार चान्ना यांनी आज सहकुटुंब शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचं मनोभावे दर्शन घेतलं. साई दर्शनानंतर त्यांनी सोबत आणलेलं, आकर्षक नक्षीकाम केलेलं हिरेजडीत सोन्याचं ब्रोच साईबाबांच्या चरणी अर्पण केलं. त्यानंतर, साईबाबा संस्थानच्या वतीनं संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी देणगीदार साईभक्त सतीश कुमार चान्ना यांचा सत्कार केला.

इटलीच्या भक्ताकडून साईचरणी सोन्याचं ब्रोच अर्पण (ETV Bharat)

तब्बल 19 वर्षांनंतर शिर्डीत- यावेळी माध्यमांशी बोलताना सतीश कुमार चान्ना यांनी सांगितलं, ''तब्बल 19 वर्षांनंतर आज शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेण्याचा योग आलाय. साईबाबांचा आपल्या कुटुंबावर मोठा आशीर्वाद आहे. हा आशीर्वाद साईबाबांचा आमच्या कुटुंबावर असाच कायम राहावा, अशी प्रार्थना आपण साईचरणी केली आहे. आमच्याकडे जे काही आहे, ते सर्व साईबाबांच्या आशीर्वादानंच आहे. त्यामुळे त्यांचंच त्यांना आज दिलं आहे. आम्ही आणलेली ही छोटीशी सुवर्णभेट साईबाबांच्या चरणी अर्पण करताना मनाला मोठं समाधान मिळालं'', अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

सोन्याची बिस्किटं दान-काही दिवसांपूर्वी बंगळुरू येथील एका साईभक्ताने साईबाबांच्या चरणी 21 लाख 9 हजार 691 रुपये किमतीची सोन्याची बिस्किटं अर्पण केली होती. या दानाचं एकूण वजन 136 ग्रॅम 700 मिलिग्रॅम इतकं होतं. विशेष म्हणजे, यामध्ये 100 ग्रॅम, 10 ग्रॅम, 5 ग्रॅम आणि 2 ग्रॅम अशा वेगवेगळ्या वजनांच्या बिस्किटांचा व नाण्यांचा समावेश होता. साईबाबांच्या चरणी अशा प्रकारे विविध वजनांची सोन्याची बिस्किटं पहिल्यांदाच अर्पण करण्यात आली असल्याची माहिती साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.

हेही वाचा -

साईनगरीतून 'राखी सन्मान रथ' रवाना; संजीवनी युवा प्रतिष्ठानतर्फे जवानांसाठी 1 लाखांहून अधिक राख्या

साईचरणी सोन्याची 21 लाखांचे बिस्किटं अर्पण, प्रसादालयासाठी 70 लाखांचे डिशवॉशर मशीन देणगी

Last Updated : August 27, 2026 at 3:57 PM IST