शरद पवार यांची प्रकृती खालावली, डिहायड्रेशनमुळं रुबी हॉल क्लिनिकमध्ये केलं दाखल
शरद पवार यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलंय.

Published : February 22, 2026 at 10:15 AM IST
|Updated : February 22, 2026 at 10:50 AM IST
पुणे - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलंय. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार हे प्रकृतीच्या कारणास्तव त्रस्त होते. त्यानंतर त्यांना पुन्हा एकदा रुग्णालयात नेण्यात आलं.
शरद पवार रुग्णालयात दाखल - मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार यांना रविवारी सकाळी अचानक अस्वस्थ आणि थकवा जाणवू लागला. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना तातडीनं रुग्णालयात हलवण्यात आलं. तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाद्वारे त्यांच्या प्रकृतीची तपासणी केली जात आहे.
"शरद पवार यांना आज सौम्य डिहायड्रेशनमुळं रूबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं. त्यांना द्रवपदार्थांची आवश्यकता आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. ते २ दिवस रूबी हॉल क्लिनिकमध्ये राहतील आणि नंतर घरी पाठवण्यात येईल." - डॉ. पुर्वेज ग्रँट - मुख्य हृदयरोगतज्ज्ञ आणि रूबी हॉल क्लिनिकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय विश्वस्त
We are admitting Baba to Ruby Hall, Pune for follow-up tests and hydration.
— Supriya Sule (@supriya_sule) February 22, 2026
Thanking all the doctors and healthcare workers.
काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांची तब्येत बिघडली होती. त्यानंतर त्यांना बारामतीमधून थेट रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं होतं. चार ते पाच दिवस उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. आता पुन्हा एकदा त्यांना रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
शरद पवार यांची तब्येत पुन्हा खालावली - शरद पवार यांची फेब्रुवारीच्या दुसऱया आठवड्यात प्रकृती खालावली होती. त्यामुळं त्यांना तातडीनं बारामतीहून पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये आणण्यात आलं होतं. त्यांना ५ दिवसांनी डिस्चार्ज देण्यात आला होता. शरद पवार यांना छातीचं इन्फेक्शन झालं होतं. त्यांना घरी राहून आराम करावा, असा सल्ला ड़ॉक्टरांनी दिला होता. त्यावेळी शरद पवार यांना अँटिबायोटिक्स देत त्यांची फिजिओथेरपी देखील करण्यात आली होती.
रुग्णालयात असताना त्यांच्याबरोबर कन्या खासदार सुप्रिया सुळे या होत्या. पक्षातील नेतेमंडळी तसंच इतर पक्षातील नेते त्यांना भेटण्यासाठी येत होते. त्यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी रूबी हॉल क्लिनिकच्या मेडिकल स्टाफचे आभार मानले होते.
हेही वाचा -

