ETV Bharat / state

शिर्डी साईबाबा मंदिरात पारंपरिक पद्धतीनं होळीचं दहन; मंदिर परिसरात आकर्षक फुलांची सजावट!

साईबाबांच्या मंदिरात होळी साजरी करण्याची परंपरा पूर्वीपासून चालत आलीय.

Sai Baba Temple Celebrate Holi Dahan In Traditional Way in Shirdi
शिर्डी साईबाबा मंदिरात पारंपरिक पद्धतीनं होळी दहन (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : March 2, 2026 at 2:05 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

शिर्डी : आज (2 मार्च) साईबाबांचे गुरुस्थान मंदिर समोर पारंपरिक पद्धतीनं होळीचं पूजन करून होळीचं दहन करण्यात आलं. तसंच पालथ्या हातानं शंखध्वनी अर्थात बोंब मारत मनातील अनिष्ट प्रवृत्ती शांत होवोत, अशीच प्रार्थना साईबाबा संस्थान आणि भक्तांनी साईबाबांच्या चरणी केली. दरम्यान, होळीचा सण आज संपूर्ण देशभर साजरा केला जातोय. तसंच साईबाबांच्या मंदिरात होळी साजरी करण्याची परंपरा पूर्वीपासून चालत आलीय. दरम्यान, शिर्डीत साईबाबांच्या काळापासून होळी पूजन करून दहन केलं जातं.

Sai Baba Temple Celebrate Holi Dahan In Traditional Way in Shirdi
शिर्डी साईबाबा मंदिरात पारंपरिक पद्धतीनं होळी दहन (ETV Bharat Reporter)

पारंपरिक पद्धतीनं होळीचं दहन : होळी निमित्तानं आज साईबाबा समाधी मंदिर तसंच परिसराला साईबाबा संस्थानच्या वतीनं आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलीय. तसंच साई मंदिराच्या गुरुस्थानासमोर एरंड, फुलांच्या माळा, ऊस आणि पाच गोवऱ्या उभ्या करून होळी तयार करण्यात आली. त्यानंतर संस्थानचे कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते होळीचं पूजन करून दहन करण्यात आलं. यानंतर साईबाबांची दुपारची मध्यान्ह आरती पार पडली. मनातील दुष्ट प्रवृत्ती नष्ट होण्यासाठी आज आणि उद्या हा उत्सव साजरा केला जातोय. आजपासून साईबाबांच्या मूर्तीला साखरेपासून तयार केलेल्या गाठी घालण्यात आल्या आहेत. तसंच देशासह राज्यातील शेतकरी सुखी, समाधानी राहोत, अशी प्रार्थना यावेळी भाविकांसह संस्थानच्या वतीनं करण्यात आली. शेतकऱ्यांबरोबरच साईंच्या शिर्डीतही सौख्य लाभावं आणि अनिष्ट प्रवृत्ती लोप पावाव्यात, यासाठी होळीचं पूजन करण्यात आलं.

शिर्डी साईबाबा मंदिरात पारंपरिक पद्धतीनं होळीचं दहन; मंदिर परिसरात आकर्षक फुलांची सजावट! (ETV Bharat Reporter)

दर्शन व्यवस्था पूर्णतः बंद राहणार : उद्या म्हणजेच 3 मार्च रोजी खग्रास चंद्रग्रहण असल्यामुळं दुपारी 3.20 वाजल्यापासून सायंकाळी 6.48 वाजेपर्यंत, म्हणजेच सुमारे तीन तास 28 मिनिटं, साईबाबा समाधी मंदिर व मंदिर परिसरातील सर्व मंदिरांमध्ये दर्शन व्यवस्था पूर्णतः बंद राहणार आहे. या कालावधीत भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. खग्रास चंद्रग्रहणा निमित्त पारंपरिक पद्धतीनुसार साईबाबांच्या समाधी मंदिरात दहा ते पंधरा पुजारी ग्रहणकाळात विशेष पूजा, मंत्रोच्चार, जप आणि विधी सुरू ठेवतील, अशी माहिती साईबाबा संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी दिलीय. याचबरोबर, ग्रहणकाळ संपल्यानंतर सायंकाळी 7 वाजता साईबाबांच्या मूर्तीला मंगलस्नान घालण्यात येणार आहे. त्यानंतर शिर्डी माझे पंढरपूर ही छोटी आरती तसंच धूपारती संपन्न होईल. सर्व धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर दर्शन व्यवस्था पूर्ववत सुरू करण्यात येणार असून रात्री 10 वाजता नियमित शेजारती होऊन त्यानंतर मंदिर बंद करण्यात येईल, अशी माहिती साईबाबा संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी दिलीय.

Sai Baba Temple Celebrate Holi Dahan In Traditional Way in Shirdi
शिर्डी साईबाबा मंदिरात पारंपरिक पद्धतीनं होळी दहन (ETV Bharat Reporter)

हेही वाचा :

  1. व्हीएसआरचे मालक रोहित सिंह यांचा व्हिडीओ शेअर करत जय पवारांनी उपस्थित केले प्रश्न
  2. इराण-इस्रायल संघर्ष : कोल्हापुरातील एमबीबीएसचे 6 विद्यार्थी शारजाहमध्ये अडकले
  3. विश्व मराठी संमेलन 2026 : मराठी भाषेत शिकूनच सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश झालो- निवृत्त सरन्यायाधीश भूषण गवई