ETV Bharat / state

खग्रास चंद्रग्रहणानिमित्त साईबाबा दर्शन साडेतीन तास बंद, मंदिरात मंत्रोच्चार-जप सुरू

आज खग्रास चंद्रग्रहण असल्यानं दुपारी 3.10 वाजता साईबाबा मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद करण्यात आलं.

Sai Baba darshan closed for three and a half hours due to Chandra Grahan in Shirdi
खग्रास चंद्रग्रहणानिमित्त साईबाबा दर्शन साडेतीन तास बंद, मंदिरात मंत्रोच्चार-जप सुरू (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : March 3, 2026 at 5:07 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

शिर्डी : आज खग्रास चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर शिर्डी साईबाबा संस्थानच्या वतीनं साईबाबा मंदिरातील दर्शन व्यवस्था साडेतीन तासांसाठी बंद ठेवण्यात आली आहे. खग्रास चंद्रग्रहण असल्यानं धार्मिक परंपरा व शास्त्रानुसार ग्रहणकाळात साईबाबा समाधी मंदिरात विधिवत पूजा करण्यात येत आहे.

Sai Baba darshan closed for three and a half hours due to Chandra Grahan in Shirdi
खग्रास चंद्रग्रहणानिमित्त साईबाबा दर्शन साडेतीन तास बंद, मंदिरात मंत्रोच्चार-जप सुरू (ETV Bharat Reporter)

सर्व मंदिरे चंद्रग्रहण काळ संपेपर्यंत बंद : आज खग्रास चंद्रग्रहण असल्यानं दुपारी 3.10 वाजता साईबाबा मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद करण्यात आलं. तसंच मंदिर परिसरातील गुरुस्थान मंदिर, श्री गणेश मंदिर, शनिदेव मंदिर आणि महादेव मंदिर ही सर्व मंदिरे चंद्रग्रहण काळ संपेपर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत. दुपारी 3.20 वाजल्यापासून सायंकाळी 6.48 वाजेपर्यंत म्हणजे सुमारे 3 तास 28 मिनिटं साईबाबा समाधी मंदिर व परिसरातील सर्व मंदिरांमध्ये दर्शन व्यवस्था पूर्णतः बंद ठेवण्यात आल्याची माहिती साईबाबा संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी भीमराव दराडे यांनी दिली.

साईबाबा संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांची प्रतिक्रिया (ETV Bharat Reporter)

धूपआरतीनंतर दर्शन व्यवस्था पूर्ववत होणार : खग्रास चंद्रग्रहणानिमित्त पारंपरिक पद्धतीनुसार साईबाबांच्या समाधीवर तुळशीची पानं, दर्भ आणि हरळीचे दुर्वा अर्पण करून समाधी झाकण्यात आली आहे. मंदिरातील दहा ते पंधरा पुजारी ग्रहणकाळात विशेष पूजा, मंत्रोच्चार, जप व विधीपूजा करत आहेत. दुपारी 3.20 वाजता सुरू झालेले खग्रास चंद्रग्रहण सायंकाळी 6.48 वाजता समाप्त होणार आहे. ग्रहणकाळ संपल्यानंतर सायंकाळी 7 वाजता यमुना, सरस्वती, गोदावरी, सिंधू, नर्मदा, कावेरी आणि गंगा या सात पवित्र नद्यांच्या जलाने साईबाबांच्या मूर्तीला व समाधीस मंगलस्नान घालण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी 7.20 वाजता शिर्डी माझे पंढरपूर ही छोटी आरती होईल. पुढं सायंकाळी 7.30 वाजता धूपआरतीस सुरुवात होईल. आरतीनंतर दर्शन व्यवस्था पूर्ववत सुरू करण्यात येणार आहे. रात्री 10 वाजता नियमित शेजारती होऊन त्यानंतर मंदिर बंद करण्यात येईल, अशी माहिती साईबाबा संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी दिली.

Sai Baba darshan closed for three and a half hours due to Chandra Grahan in Shirdi
खग्रास चंद्रग्रहणानिमित्त साईबाबा दर्शन साडेतीन तास बंद, मंदिरात मंत्रोच्चार-जप सुरू (ETV Bharat Reporter)

मंदिर परिसरासह बाहेरील भागात सूचना फलक : दरम्यान, खग्रास चंद्रग्रहणानिमित्त भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी संस्थानच्या वतीनं मंदिर परिसरासह बाहेरील भागात सूचना फलक लावण्यात आलं आहेत. तसंच सामाजिक माध्यमांद्वारेही मंदिर काही काळ बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्रसारित करण्यात आली होती.

हेही वाचा :

  1. दुबईत युद्धाचा भडका; पिंपरी-चिंचवडमधील 40 ज्येष्ठ नागरिक दुबईत अडकले
  2. 'फडणवीस साहेब, मोदीजी, माझा मुलगा कुवैतमध्ये अडकलाय...'; विशाखा सुभेदार यांची भावनिक साद
  3. मुंबईत होळीचा उत्साह शिगेला; सर्वत्र संगीत, मस्ती आणि तगडा पोलीस बंदोबस्त