पोलीस 15 मिनिटे बाजूला काढा, मग मसल पॉवर काय आहे ते दाखवू; संजय राऊतांचे एकनाथ शिंदेंना ओपन चॅलेंज
पोलीस 15 मिनिटे बाजूला काढा, मग मसल पॉवर काय आहे ते दाखवू, असं म्हणत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंना खुल्ले आव्हान दिलंय.


Published : January 6, 2026 at 10:16 AM IST
ठाणे- पोलीस 15 मिनिटे बाजूला काढा, मग मसल पॉवर काय आहे ते दाखवू, हातात पोलीस आहेत म्हणून मसल पॉवर आहे ना? नाहीतर त्यांना या रस्त्यावर ठोकून काढू आणि पळताभुई थोडी करू, पोलीस हटवा मग मसल पॉवर दाखवून देऊ, मसल पॉवरच्या गोष्टी आम्हाला सांगू नका, असे उबाठाचे मुख्य प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. राजन विचारे आणि अविनाश जाधव यांच्या चेहऱ्याकडे पाहून एकनाथ शिंदेंना संजय राऊतांना खुले आव्हान दिलंय.
मसल पॉवर पैशाने घेतली आहे : एका माणसामुळे गद्दारांचं ठाणे शहर अशी महाराष्ट्रात ओळख निर्माण झाली ही दुर्दैवी बाब आहे. मसल पॉवर पैशाने घेतली आहे. ताकद ही शिवसेनेतून निर्माण झालीय. आपल्या न्याय हक्कासाठी लढायचं आणि विधायक कार्यासाठी संघर्ष करणं आणि लढणं, ताकद निर्माण करणं हा बाळासाहेबांचा विचार आहे. स्वतःची घरं भरणं आणि खंडणी गोळा करणं, आज ठाण्याची ओळख बेईमानांचं शहर म्हणून राज्यात ओळखलं जातं. ती ओळख आपल्याला पुसायची आहे, असे संजय राऊत म्हणालेत. ठाण्यात सोमवारी उबाठा, मनसे, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी ठाणे महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना (उबाठा), मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या महाविकास आघाडीचा वचननामा संजय राऊत यांनी जाहीर केलाय.
ठाण्यात परवा अडीच कोटींचं ड्रग्ज पकडलं : ठाणे हे शहर महाराष्ट्रात ड्रग्जचा अड्डा ओळखलं जात असून, त्यांनी कमिशनरचा फौजदार केलाय. ठाण्यात परवा अडीच कोटींचं ड्रग्ज पकडलं. ठाण्यात शाळा, कॉलेज, पान टपरी अशा अनेक ठिकाणी ड्रग्ज मुबलक प्रमाणात मिळतंय. पोलीस काय काय करतायत, फक्त आमच्या उमेदवारांना पकडताय. तसेच ठाण्याचा रेहमान डकेत आणि ठेकेदारांचा सम्राट अशी टीका संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता केलीय.
ठाण्याची अवस्था बीडसारखी झालीय : मंत्र्यांच्या, सत्ताधाऱ्यांच्या नातेवाईकांपर्यंत अमली पदार्थ प्रकरणांचे धागेदोरे पोहोचतात ही बाब अत्यंत गंभीर आहे. पण एक पिढी नासवणाऱ्या अमली पदार्थांवर एक शब्द का नाही. ही केवळ राजकीय बाब नाही. ही ठाण्याच्या भवितव्याची गंभीर बाब आहे, असेही ते म्हणाले. सत्ताधारी यावर मौन बाळगत आहेत. लोकांनी याच मुद्द्यावर मतदान केले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केलंय. ठाण्याची अवस्था बीडसारखी झालीय. बीडच्या पुढे ठाणे गेलंय, ठाणेकरांनी सावधपणे मतदान करावं, ठाण्याच्या विकासाची सुरुवात बाळासाहेब ठाकरे, प्रथम नगराध्यक्ष असताना सतीश प्रधान यांच्यापासून झाली. ठाण्यात मराठी माणसाची उत्तम युती झाली, मनसे आणि उबाठाचा डीएनए एकच आहे, या ठाण्याला, मंत्री, मुख्यमंत्री होते. उपमुख्यमंत्री असताना ठाण्याची अशी अवस्था कोणी केली? टेंडरबाजी कोणी केली? आज ठाणे महानगर पालिकेला कर्मचाऱ्याचे पगार द्यायला पैसे नाही हr वेळ कोणी आणली. कल्याण-डोंबिवली, ठाणे महापालिकेची वाट कोणी लावली या ठाण्याला बदलायचं असेल तर ठाणेकर जनता या वेळेला शहराचा आणि पुढच्या पिढीचा विचार करेल, असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केलाय.
एकनाथ शिंदे म्हणजे ठाणे नाही, धर्मवीर आनंद दिघे म्हणजे ठाणे : ठाण्यात जागोजागी भाजपाने नमो नमो बॅनर उभारल्याचे संजय राऊत यांना छेडले असताना संजय राऊत यांनी शिंदेंचा समाचार घेतला. ठाण्याची ओळख नमो नमो कोण म्हणताय? नमो नमो गुजराथला; अहमदाबादला? लाज वाटली पाहिजे एकनाथ शिंदेंना, बाळासाहेबांची छाप असलेल्या ठाण्यावर नमो नमो ठाणे असं तुमच्या तोंडावर लावलं जातं आणि तुम्ही गप्प आहात, तुम्ही शिवसेना म्हणून मिरवत आहात. अर्थात डुप्लिकेट शिवसेना म्हणून तुम्ही मिरवता. एकनाथ शिंदेंचा जन्म झाला नव्हता, तेव्हा ठाण्यात शिवसेनेची स्थापना झाली. एकनाथ शिंदे राजकारणात नव्हते, तेव्हा शिवसेनेच्या ताब्यात ठाण्यात महापालिका आली. एकनाथ शिंदे म्हणजे ठाणे नाही, धर्मवीर आनंद दिघे म्हणजे ठाणे आहे. ठाण्यात शिवसेना रुजविण्याचा आणि सत्ता आणण्यासाठी एकाकी झुंज आनंद दिघेंनी दिलीय. बाळासाहेबांनंतर कोणाचा पगडा आणि प्रभाव असेल तर आनंद दिघेंचा आहे. एकनाथ शिंदे यांच्यात कुठे नाही जेव्हा ठेकेदारांचं राज्य सुरू झाले, तेव्हा एकनाथ शिंदे आले आणि त्यांनी ठेकेदाराच्या माध्यमातून काम केले. या आर्थिक उलाढाली आहेत दिघेच्या सर्वात जवळ राजन विचारे होते सिनेमावर जाऊ नका सिनेमा मीपण लिहू शकत अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केलीय.
हेही वाचाः
पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचं निधन; 81व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
'बजरंग दल' बंदीचं आश्वासन देणं काँग्रेसला भोवलं, कोर्टाकडून भांडुप पोलिसांना चौकशीचे आदेश

