ETV Bharat / state

घरावर ईडीची धाड पडल्याची थाप मारून भावी वधूला लाखोंचा गंडा घालणाऱ्या ‘रीलस्टार’ला बेड्या

शैलेश प्रकाश रामगुडे (30) असे अटकेत असलेल्या रीलस्टारचे नाव असून, त्याने आतापर्यंत 4 ते 5 तरुणींची अशाच प्रकारे फसवणूक केल्याचं पोलीस तपासात समोर आलीय.

'Reelstar' who cheated his future bride of lakhs arrested
भावी वधूला लाखोंचा गंडा घालणाऱ्या ‘रीलस्टार’ला बेड्या (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : November 15, 2025 at 5:17 PM IST

|

Updated : November 15, 2025 at 5:28 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

ठाणे : भावी वधूबरोबर आदी इन्टाग्रामवर आरोपी तरुणानं ओळख करून मैत्री केली, त्यानंतर दोघांमध्ये प्रेमाचं सूत जुळलं. तसेच आरोपीनं लग्नाच्या आणाभाका घेतल्या, त्यातच माझ्या घरावर ईडीची धाड पडली असून, यातून सोडविण्यासाठी भावी वधूला 92 लाख 75 हजार रुपयांचा गंडा घातल्याची घटना घडली होती. ही घटना डोंबिवली पश्चिम भागात उघडकीस आली होती. या प्रकरणी पीडित भावी वधूकडून विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करताच पोलीस पथकानं तांत्रिक तपासाच्या आधारे रीलस्टारला बेड्या ठोकल्या. शैलेश प्रकाश रामगुडे (30) असे अटकेत असलेल्या रीलस्टारचे नाव असून, त्याने आतापर्यंत 4 ते 5 तरुणींची अशाच प्रकारे फसवणूक केल्याचं पोलीस तपासात समोर आल्याची माहिती पोलीस साहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे यांनी दिली आहे.

सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे (Source- ETV Bharat)

फसवणुकीचा असा रचला बनाव : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित 30 वर्षीय तरुणी ही डोंबिवली पश्चिमेला एका हायप्रोफाईल सोसायटीत कुटुंबासह राहते. तर आरोपी रीलस्टार शैलेश हा ठाणे पश्चिमेतील हिरानंदानी इस्टेटमधील साॅलिटर इमारतीत राहतो. त्यातच 2024 साली दोघांची इन्स्टाग्रामवर मैत्री झाली. त्यानंतर प्रेमाच नाटक करत आरोपीने पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखविले. अशातच सप्टेंबर 2024 रोजी आरोपी शैलेश याने आपल्या घरावर ईडीची धाड पडली आहे. घरातील दोन किलो सोने, एक कोटी रुपये ईडीने जप्त केले आहेत. ते सोडविण्यासाठी शैलेशने पीडितेकडून सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा एकूण 92 लाख 75 हजार रुपयांचा ऐवज उकळला.

'Reelstar' who cheated his future bride of lakhs arrested
भावी वधूला लाखोंचा गंडा घालणाऱ्या ‘रीलस्टार’ला बेड्या (Source- ETV Bharat)

तांत्रिकदृष्ट्या तपास करून ठोकल्या बेड्या : दरम्यान, सप्टेंबर 2024 ते ऑगस्ट 2025 कालावधीत हा प्रकार घडला असून, पीडित तरुणीशी लग्न न करता, पैसे परत न करता फसवणूक केल्याचं समजल्यावर पीडित तरुणीने विष्णुनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिच्यावर घडलेल्या प्रसंग कथन केला, त्यानंतर पोलिसांनी भारतीय न्याय संहिताचे कलम 398 (4), 316 (2) प्रमाणे 5 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल केला. या गुन्हाचा पोलिसांनी तांत्रिकदृष्ट्या तपास सुरू केला असता आरोपी रीलस्टारला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता पोलीस पथकाला धक्कादायक माहिती समोर आली आहे.

श्रीमंत असल्याची छाप पाडून तरुणीची फसवणूक करायचा : आरोपी हा पीडित तरुणींना बीएमडब्ल्यू गाड्या दाखवून आपण खूप श्रीमंत आहोत, असे दाखवायचा. आपण मॉडेलिंग क्षेत्रात काम करतो, असे सांगून शैलेश बाहेर वातावरण निर्मिती करायचा. स्वत: तरुण आणि देखणा असल्याने आपसूक तरुणी त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात फसायच्या. एकदा तरुणी आपल्या जाळ्यात आली की मग तो त्यांना विविध कारणे सांगून त्यांच्याकडून पैसे, सोने उकळायचा. एकदा त्याचा उद्देश पूर्ण झाला की, मग तो त्यांना प्रतिसाद देणे टाळायचा. ही त्याची फसवणुकीची पद्धत होती.

39 तोळे सोने, एक बीएमडब्ल्यू कार, चार महागडे मोबाईल जप्त : आरोपी शैलेशकडून पोलिसांनी एकूण 39 तोळे सोने, एक बीएमडब्ल्यू कार, चार महागडे मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त केला आहे. शैलेशने आतापर्यंत एकूण तीन तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांची आर्थिक फसवणूक केली आहे. यापूर्वी त्याने एका पीडितेची 43 लाख, दुसऱ्या एका प्रकरणात 29 लाख रुपये फसवणूक केली आहे. अशाच प्रकारची एक तक्रार शैलेश रामुगडे याच्या विरुद्ध विष्णुनगर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, साहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम चोपडे यांनी दाखल तक्रारीचा तातडीने तपास सुरू केलाय.

इन्स्टाग्रामवर एक मिलियन अनुयायी : आरोपी रीलस्टार शैलेशचे इन्स्टाग्रामवर एक मिलियन अनुयायी असल्याची माहिती पोलिसांनी काढली आहे. फसवणुकीतून मिळालेले सोने त्याने ठाण्यातील सोनारांना विकले होते. ते पोलिसांनी जप्त केले आहे. शैलेश आतापर्यंत किती तरुणी अन्य कोणाची फसवणूक केली आहे. या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

हेही वाचाः

कायदेशीरदृष्ट्या जैन बोर्डिंगचे व्यवहार रद्द; मंत्री मोहोळ म्हणाले, "माझ्याविरोधात एकही पुरावा मिळाला नाही"

नवे जाहिरात फलक धोरण पुढील दोन आठवड्यात लागू होण्याची शक्यता

Last Updated : November 15, 2025 at 5:28 PM IST