भाजपाकडून महाराष्ट्रातून रामदास आठवले आणि विनोद तावडे राज्यसभेवर जाणार
भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीनं महाराष्ट्रातून रामदास आठवले आणि विनोद तावडे यांना राज्यसभेवर पाठवणार असल्याचं सांगितलंय.


Published : March 4, 2026 at 12:14 PM IST
|Updated : March 4, 2026 at 2:02 PM IST
नवी दिल्ली- भारतीय जनता पक्षाने सहा राज्यांमध्ये होणाऱ्या 2026 च्या राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा केलीय. भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीनं महाराष्ट्रातून रामदास आठवले आणि विनोद तावडे यांना राज्यसभेवर पाठवणार असल्याचं सांगितलंय. 16 मार्चला होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी आज भाजपाने चार उमेदवारांची यादी जाहीर केलीय, त्यात रामदास आठवले यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आलीय, तर भाजपाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे आणि रामराव वडकुते यांना सुद्धा उमेदवारी जाहीर झालीय. तसेच माया चिंतामण ईवनाते आणि रामराव वडकुते यांनाही राज्यसभेवर पाठवण्यात येणार आहे. भाजपाचे राष्ट्रीय महासचिव आणि मुख्यालय प्रभारी अरुण सिंह यांनीही घोषणा केलीय. राज्यसभेवर जाण्यासाठी भाजपाकडून अनेक दिग्गज, अनुभवी नेते इच्छुक असताना भाजपाने धक्कातंत्राचा वापर करत त्यांना धक्का दिलाय. नागपूरच्या माजी महापौर मायाताई ईवनाते यांना संधी देण्यात आलीय. मायाताई ईवनाते या विद्यमान नगरसेविकादेखील आहेत.

आदिवासी व्यक्ती माया चिंतामन इवनाते यांनाही संधी : भाजपाने नागपूरच्या माजी महापौर आणि आदिवासी व्यक्ती माया चिंतामन इवनाते यांनाही संधी दिलीय. खरं तर ज्येष्ठ भाजपा नेते विनोद तावडे यांचे नाव आधीच चर्चेत होते. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे नावही चर्चेत होते. आता भाजपाने दोघांच्याही नावावर शिक्कामोर्तब केलंय. 10 राज्यांमधील 37 रिक्त राज्यसभेच्या जागांसाठी निवडणुका होणार आहेत. संबंधित सदस्यांचा कार्यकाळ एप्रिलमध्ये संपत आहे, त्यामुळे निवडणूक प्रक्रिया आधीच सुरू झालीय.

...तर मतदान 16 मार्च रोजी होणार : उमेदवार 5 मार्चपर्यंत नामांकन दाखल करू शकतात, तर मतदान 16 मार्च रोजी होणार आहे. महाराष्ट्रात संख्याबळाच्या आधारे, महायुती (महायुती) सहा जागा जिंकू शकते, तर महाविकास आघाडी (MVA) एक जागा जिंकणे जवळपास निश्चित मानले जात आहे. तसेच बिहारमध्ये जिथे पाच जागा रिक्त होत आहेत, तिथे भाजपाने पक्षाध्यक्ष नितीन नबीन आणि प्रदेश नेते शिवेश कुमार यांना उमेदवारी दिलीय. 16 मार्च रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख उद्या आहे. राज्यसभेच्या महाराष्ट्रातील एकूण 7 जागेसाठी 16 मार्च रोजी निवडणूक होणार आहे. भाजपा आणि महायुतीकडील एकूण संख्याबळ बघता चारही उमेदवार राज्यसभेवर जाणार हे निश्चित झालंय. विदर्भातील माजी खासदार अशोक नेते, माजी मंत्री हंसराज अहिर आणि नवनीत राणा हे नाव चर्चेत असताना भाजपाने धक्कातंत्राचा वापर करत मायाताई इवनाते यांच्या नावाची घोषणा केलीय.
कोण आहेत मायाताई ईवनाते? - नागपूरच्या माजी महापौर मायताई इवनाते यांच्या नावाची घोषणा भाजपाने राज्यसभेच्या उमेदवार म्हणून केलीय. पूर्ण नाव मायाताई चिंतामण इवनाते असे आहे. मायाताई नागपूरच्या माजी महापौर राहिलेल्या आहेत. 15 जुलै 2007 ते 23 डिसेंबर 2009 पर्यंत नागपूर त्यांनी नागपूर महानगरपालिकेमध्ये महापौरपद भूषवलंय. अनेक वर्षांपासून त्या नागपूर शहर भाजपामध्ये सक्रिय आहे. शहर, प्रदेश भाजपामध्ये विविध पदावर कार्य करण्याचा अनुभव आहे. मायाताई आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व करतात. त्या राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग(NCST)च्या सदस्यपदी राहिलेल्या आहे. नुकत्याच झालेल्या नागपूर महानगरपालिकामध्ये प्रभाग 12 मधून भाजपाच्या नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या आहे. गेली अनेक वर्ष नागपूर महानगरपालिकेमध्ये नगरसेवक राहिलेल्या आहेत.
हेही वाचाः
डोंगरदऱ्या, वळणदार रस्त्यातून उभा राहिलेला संघर्ष; मेळघाटात बच्चू कडूंची ऐतिहासिक महापदयात्रा

