ETV Bharat / state

होळी, धुळवडनिमित्त ठाण्यात पुरणपोळी, फ्लेवर्ड थंडाईला ग्राहकांची पसंती

होळी, धुळवड आणि रंगपंचमी सणांच्या निमित्तानं बाजारात विविध पदार्थांची रेलचेल पाहायला मिळते.

Puranpoli for Holi, Dhulvad, Flavored Thandaila is customer's favourite in Thane
होळी, धुळवडनिमित्त ठाण्यात पुरणपोळी, फ्लेवर्ड थंडाईला ग्राहकांची पसंती (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : March 2, 2026 at 8:21 PM IST

|

Updated : March 2, 2026 at 8:30 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

ठाणे : होळी, धुळवड आणि रंगपंचमी सणांच्या निमित्तानं बाजारात विविध पदार्थांची रेलचेल पाहायला मिळते. होळीच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य महत्त्वाचा मानला जातो. दरम्यान, पुरणपोळीसोबत धुळवडीची थंडाई आणि गुज्जिया...त्यासोबत वेगवेगळ्या प्रकाराच्या थंडाईयुक्त मिठाई आपल्याला या सणात खायला मिळतात. असाच मिठाईचा आस्वाद या सणांच्या निमित्तानं ठाण्यात पाहायला मिळतो.

Puranpoli for Holi, Dhulvad, Flavored Thandaila is customer's favourite in Thane
होळी रंगपंचमीसाठी विशेष पॅकिंग (ETV Bharat Reporter)

मिठाई आणि थंडाई ग्राहकांना उपलब्ध : दरवर्षी हजारो लिटर थंडाई विक्री करणाऱ्या प्रशांत कॉर्नरनं यावेळी होळी आणि रंगपंचमीसाठी विशेष मिठाई आणि थंडाई ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या आहेत. यात मसाला थंडाई तर आहेच. सोबत हनी बास्केट, रंग बरसे, रोज थंडाई गुज्जिया, शाही पान स्वीट, थंडाई चेना पान आणि अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या काजूकतली आणि गरम गरम जिलेबी देखील मिळणार आहेत. पुरणपोळीचा आस्वाद यासोबत आहेच पण वेगवेगळ्या फ्लेव्हर्सचे श्रीखंड, आम्रखंडसोबत नाष्टा देखील ग्राहकांना मिळणार आहे. जेणेकरून सणांच्या निमित्तानं आपल्या जिभेचे चोचले देखील पुरवले जाणार आहेत. वातावरणात झालेला बदल आणि त्यामुळं थंडाईची गरज लक्षात घेऊन ग्राहकांना आपल्या डाएट कडेही लक्ष देता येणार आहे.

होळी, धुळवडनिमित्त ठाण्यात पुरणपोळी, फ्लेवर्ड थंडाईला ग्राहकांची पसंती (ETV Bharat Reporter)


होळी रंगपंचमीसाठी विशेष पॅकिंग : होळी रंगपंचमी निमित्तानं ग्राहकांना वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाई, थंडाई यासोबत विविध कलर आणि पिचकारी देखील गिफ्ट हॅम्पर स्वरूपात उपलब्ध करून दिलेली आहे. रंगपंचमी धुळवडीच्या निमित्तानं मित्र मैत्रिणींना भेट देण्याची प्रथा आहे. अशावेळी पारंपारिक मिठाईसोबतच आकर्षक पॅकिंग असलेले हे गिफ्ट टेम्पर हे देखील प्रशांत कॉर्नरमध्ये उपलब्ध असून हे आकर्षक पॅकिंग ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. या ठिकाणी सर्व मिठाई या फ्रेश तयार केलेल्या असून सरकारी नियमांचे पालन करून त्यावर इत्यंभूत माहिती देखील दिलेली आहे.

Puranpoli for Holi, Dhulvad, Flavored Thandaila is customer's favourite in Thane
होळी, धुळवडनिमित्त ठाण्यात पुरणपोळी, फ्लेवर्ड थंडाईला ग्राहकांची पसंती (ETV Bharat Reporter)


थंडाई मसाला जातोय परदेशातही : रंगपंचमीच्या निमित्तानं विदेशात असलेल्या भारतीयांकडून थंडाई मसाला हा देखील मागविला जात आहे. जेणेकरून विदेशात असताना देखील त्यांना थंडाईचा आस्वाद घेता यावा. त्यासोबतच दीर्घकालीन टिकणाऱ्या मिठाईची मागणी देखील आधीपासूनच पुरवणे सुरू झालेले आहे. दरम्यान, "दरवर्षी चांगल्या दर्जाची थंडाई आम्ही घेत असतो परंतु चांगली चव असल्यामुळं आम्ही आमच्या सोसायटीमध्ये लागणारी थंडाई प्रत्येक घरी देण्यासाठी या ठिकाणी येतो आणि धुळवडीच्या दिवशी थंडाईचा आनंद घेतो, " असं ग्राहक प्रितेश मोरे यांनी सांगितलं.

हेही वाचा :

  1. व्हीएसआरचे मालक रोहित सिंह यांचा व्हिडीओ शेअर करत जय पवारांनी उपस्थित केले प्रश्न
  2. इराण-इस्रायल संघर्ष : कोल्हापुरातील एमबीबीएसचे 6 विद्यार्थी शारजाहमध्ये अडकले
  3. विश्व मराठी संमेलन 2026 : मराठी भाषेत शिकूनच सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश झालो- निवृत्त सरन्यायाधीश भूषण गवई
Last Updated : March 2, 2026 at 8:30 PM IST