ETV Bharat / state

फियाटच्या क्लासिक गाड्यांची पुण्यात दिमाखदार रॅली; पिढ्यानपिढ्या जपलेला वारसा पुन्हा रस्त्यावर धावला

फियाट कार्सचा देखणा नजराणा आज शनिवारी पुणेकरांना पाहायला मिळाला. पुणे ते महाबळेश्वर मार्गावर या क्लासिक व्हिन्टेज कार धावल्या.

Parade of Classic Fiats
फियाटच्या क्लासिक गाड्यांची पुण्यात दिमाखदार रॅली (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : February 21, 2026 at 6:22 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

पुणे : पिढ्यानपिढ्या जतन केलेल्या, चमकदार क्रोमची किनार, गोलाईदार बॉडी, शांत पण दमदार इंजिन आवाज, हलकं स्टिअरिंग, हॅन्डगिअर, क्लासिक ग्रील आणि रुबाबदार हेडलाईट्स अशी फिचर्स असलेल्या फियाट कार्सचा देखणा नजराणा आज शनिवारी (21 फेब्रुवारी) पुणेकरांना पाहायला मिळाला.

फियाटच्या क्लासिक गाड्यांची पुण्यात दिमाखदार रॅली (ETV Bharat)

पुणे ते महाबळेश्वर मार्गावर धावल्या क्लासिक व्हिन्टेज फियाट : फियाट क्लासिक कार क्लब ऑफ इंडिया (Fiat Classic Car Club of India) यांच्या वतीनं आयोजित क्लासिक फियाट कार रॅलीत 1955 पासूनच्या विविध रंगातील 20 पेक्षा अधिक गाड्यांचा सहभाग होता. पुणे ते महाबळेश्वर या निसर्गरम्य मार्गावर या जतन केलेल्या गाड्यांचा ताफा मार्गक्रमण करत होता.

Parade of Classic Fiats
फियाटच्या क्लासिक गाड्यांची पुण्यात दिमाखदार रॅली (ETV Bharat)

सहभागी वाहनचालकांनी गाड्यांची मूळ रचना आणि फिचर्स जपून ठेवल्यामुळे वाहनप्रेमींना ऑटोमोबाईल इतिहासाचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला. मार्गात अनेक ठिकाणी नागरिकांनी या गाड्यांचं छायाचित्रण करत सहभागींना दाद दिली.

1955 पासूनच्या विविध मॉडेलच्या फियाट कार : यावेळी आयोजक संजय प्रकाश ढेरे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितलं की, 'क्लासिक वाहनांचा वारसा जतन करणं आणि नव्या पिढीमध्ये या गाड्यांविषयी आकर्षण निर्माण करणं हा या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे. अशा रॅलींमुळे वाहनप्रेमी एकत्र येतात आणि ऐतिहासिक वाहनसंस्कृती जिवंत राहते. 1955 पासूनच्या विविध मॉडेलच्या फियाट कार असलेले आम्ही सर्वजण मिळून क्लब चालवतो. काळ्या, निळ्या, लाल, पांढऱ्या, हिरव्या अशा विविध रंगांच्या व्हिंटेज कार घेऊन आम्ही महाबळेश्वर, गोवा, मुंबई, बंगळुरू, कन्याकुमारी आदी ठिकाणी भेटी देत असतो.' तसंच, 'ही गाडी माझ्या वडिलांची असल्यानं तिच्याशी माझा भावनिक बंध आहे. ती चालवताना मला वडिलांचा सहवास मिळाल्याची भावना निर्माण होते,' असंही त्यांनी सांगितलं.

Parade of Classic Fiats
फियाटच्या क्लासिक गाड्यांची पुण्यात दिमाखदार रॅली (ETV Bharat)

लोकांच्या उत्सुक नजरा हेच सर्वात मोठं पारितोषिक : शीतल सोनकांबळे यांनी म्हटलं की, 'माझ्याकडे 1991 मधील फियाट कार आहे. ही कार आमच्या कुटुंबासाठी केवळ वाहन नसून आठवणींचा ठेवा आहे. अनेकवर्षे जपून ठेवलेल्या या गाडीची देखभाल आम्ही स्वतः करतो. अशा रॅलीत सहभागी होताना तिचा खरा आनंद अनुभवायला मिळतो. लोकांच्या उत्सुक नजरा आणि कौतुकाचे शब्द हेच आमच्यासाठी सर्वात मोठं पारितोषिक असतं.'

हेही वाचा