ETV Bharat / state

पुणे महापालिका क्षेत्रातील प्राथमिक शाळांच्या वेळेत बदल; दोन महिने सकाळी 7 वाजता शाळा, शिक्षकांसह पालकांमध्ये नाराजी

पुणे महापालिकेने मतदार यादी पुनरीक्षणासाठी 1 जुलै ते 31 ऑगस्ट या काळात प्राथमिक शाळांची वेळ सकाळी 7 केली. या निर्णयामुळं शिक्षकांसह पालकांमध्येही नाराजी आहे.

School Timing in Pune
प्राथमिक शाळांच्या वेळेत बदल (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : July 2, 2026 at 3:47 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

पुणे - लहान मुलांची झोप पूर्ण व्हावी, यासाठी मागीलवर्षी राज्यपालांच्या सूचनेनुसार शाळांची वेळ बदलून सकाळी 9 वाजता करण्यात आली होती. मात्र, आता पुणे महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागानं निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेच्या कामासाठी प्राथमिक शाळांच्या वेळेत बदल केला आहे. त्यामुळं पुणे महानगरपालिका क्षेत्रातील प्राथमिक शाळा पुढील दोन महिन्यांसाठी सकाळी 9 ऐवजी 7 वाजता भरणार आहे. या निर्णयामुळं पालकांमध्ये नाराजीचं वातावरण असून, "मुलांना किती वाजता उठवायचं?" असा प्रश्न पालकांकडून उपस्थित केला जात आहे.

शाळेची वेळ काय? : निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेच्या कामासाठी शिक्षकांना वेळ उपलब्ध व्हावा, या उद्देशाने महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागानं हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 1 जुलै ते 31 ऑगस्ट या कालावधीत शाळेची वेळ सकाळी 7.00 ते दुपारी 12.15 अशी राहणार आहे. याबाबत प्राथमिक शिक्षण विभागाच्या प्रशासकीय अधिकारी सुनंदा वाखारे आणि उपआयुक्त वसुंधरा बारवे यांनी सर्व मुख्याध्यापकांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. महापालिकेच्या या निर्णयामुळं शिक्षकांसह पालकांमध्येही नाराजी व्यक्त केली जात आहे.

प्रतिक्रिया देताना पालक (ETV Bharat Reporter)

मुलांना सकाळी लवकर उठणं कठीण जात आहे : काही पालकांनी सांगितलं, "पूर्वीची सकाळी 9 वाजताची वेळच योग्य होती. सध्या मुलांना सकाळी लवकर उठणं कठीण जात आहे. लवकर उठवल्यामुळं ते दुपारी शाळेतून आल्यानंतर लगेच झोपून जातात. शिवाय, ही वेळ केवळ दोन महिन्यांसाठी असल्यानं मुलांना लवकर उठण्याची सवय लागेल आणि नंतर पुन्हा शाळा सकाळी 9 वाजता सुरू झाल्यावर त्यांना त्याचा त्रास होईल. त्यामुळं पूर्वीची वेळच कायम ठेवावी. सध्या मुलांना सकाळी उठवताना मोठा त्रास होत आहे."

हेही वाचा -

  1. मेळघाटातील जिल्हा परिषद शाळा प्रवेशोत्सवात शिक्षणमंत्री दादाजी भुसे गैरहजर; तीन दिवसांच्या तयारीनंतरही विद्यार्थ्यांचा उत्साह कायम
  2. मुंबई महानगरपालिकेच्या कारभारामुळं 3 लाख विद्यार्थी वह्या-पुस्तकांविना; शिक्षण मंडळाच्या बैठकीत मुद्दा गाजणार
  3. खिडक्या मोडल्या, पत्रे गंजले, लाईट नाही ना शौचालय! छत्रपती संभाजीनगरमधील जिल्हा परिषद शाळेची दुरवस्था