ETV Bharat / state

पूजा खेडकरला बांधून ठेवलं; दिलीप-मनोरमा खेडकर यांना बेशुद्ध करुन घरात चोरी

निलंबित प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या घरात चोरी झाल्याची घटना घडली आहे. ही चोरीची घटना शनिवारी रात्री घडली आहे.

Puja Khedkar
पुजा खेडकर (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : January 11, 2026 at 2:02 PM IST

|

Updated : January 11, 2026 at 2:40 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

पुणे : निलंबित प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या घरी चोरी झाली आहे. घरात काम करणाऱ्या नोकरानंच ही चोरी केली आहे. वडील दिलीप आणि मनोरमा खेडकर यांना बेशुद्ध करुन तर पूजा खेडकरला बांधुन नोकरानं चोरी केल्याची घटना घडली आहे.

बेशुद्ध करून केली चोरी : पूजा खेडकरनं त्यांच्या पुण्यातील घरी शनिवारी रात्री चोरीचा प्रकार घडल्याची माहिती चतुःश्रृंगी पोलीसांना फोन करून दिली. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यातील बाणेर रस्त्यावर खेडकर कुटुंबाचा बंगला आहे. या बंगल्यात खेडकर कुटुंबासह काही नोकर रहातात. त्यातील एक नोकर आठच दिवसापूर्वी नेपाळहून आला होता. त्या नोकरानं शनिवारी (10 जानेवारी) रात्री बेशुद्ध करून देऊन दिलीप आणि मनोरमा खेडकर यांना बेशुद्ध केलं. पूजा खेडकरला बांधून ठेवलं. त्यानंतर तो चोर घरातील सर्वांचे मोबाईल घेऊन पसार झाला, असं पूजा खेडकरनं पोलिसांना सांगितलं.

दिलीप आणि मनोरमा खेडकर बेशुद्धावस्थेत आढळले : बांधून ठेवलेल्या अवस्थेत असलेल्या पूजानं दाराच्या कडीचा उपयोग करुन स्वतःचे हात मोकळे केले. त्यानंतर पोलीसांना फोन करुन चोरीची माहिती दिली. तत्काळ चतुःश्रृंगी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली असता पूजा खेडकर हिचे वडील दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर हे बेशुद्धावस्थेत आढळून आले. तत्काळ पोलीसांनी त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केलं. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं पोलिसांनी सांगितलं. पूजा खेडकरनं स्वतः दुसऱ्या फोनवरून फोन करून हा प्रकार पोलीसांना कळवला. मात्र तिनं अद्याप लेखी तक्रार पोलीसांकडं दिलेली नाही. आपली मनस्थिती व्यवस्थित झाली की, आपण तक्रार देऊ असं तिनं पोलिसांना सांगितलं. मोबाईलच्या व्यतिरिक्त घरातील आणखी कोणत्या वस्तू चोरी झाल्यात याचीही तिनं अद्याप पोलिसांना माहिती दिलेली नाही.

यापूर्वी खेडकर कुटुंब कशामुळे आले होते चर्चेत- निलंबित सनदी अधिकारी पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर यांच्यावर यापूर्वी अपहरणाच्या गुन्हा दाखल आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस सप्टेंबर 2025 मध्ये जेव्हा त्यांच्या घरी पोहोचले, तेव्हा पूजाची आई मनोरमानं पोलिसांच्या पथकावर कुत्रे सोडले होते. त्यामुळे तिच्या पतीला मागच्या दारानं पळून जाण्यास मदत झाली होती. यापूर्वी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाील गैरवर्तन आणि त्यानंतर कागदपत्रांमध्ये आढळलेली अनियमितता या पार्श्वभूमीवर पूजा खेडकर यांच्यावर यूपीएससीकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली.

हेही वाचा -

  1. पूजा खेडकरच्या आई-वडिलांचा नवा कारनामा, पोलिसांवर कुत्रे सोडल्याचा आरोप; नेमकं प्रकरण काय?
  2. वादग्रस्त पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?
  3. पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना दिलासा; पिस्तुलानं धमकाविण्याच्या प्रकरणात जामीन मंजूर - Manorama Khedkar Bail
Last Updated : January 11, 2026 at 2:40 PM IST