ETV Bharat / state

'नमो ठाणे' शेजारी लागलं 'जगणं झालं सोपं' असं शिवसेनेचं पोस्टर, महापालिका निवडणूक प्रचार शिगेला

महापालिका निवडणुकीची धामधूम शहरांमध्ये सुरू आहे. ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस वेगळी लढत असली तरी शिवसेना भाजपाची युती आहे. दोन्ही पक्षांचे बॅनर शेजारी शेजारी लागले आहेत.

शिवसेना भाजपाची युती, दोन्ही पक्षांचे बॅनर शेजारी  शेजारी
शिवसेना भाजपाची युती, दोन्ही पक्षांचे बॅनर शेजारी शेजारी (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : January 6, 2026 at 3:28 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

ठाणे - ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीमध्ये महायुतीच्या वतीनं मतदारांवरती छाप पाडण्यासाठी पोस्टर आणि हार्डिंगसह जाहिरातीच्या माध्यमातून अनोखी बॅनरबाजी करण्यात आली आहे. भाजपानं सुरू केलेल्या नमो भारत नमो ठाणेच्या शेजारीच आता शिवसेनेकडून ठाण्यात तीन हात नाका भागात ही बॅनरबाजी करण्यात आली आहे.


महायुतीत पालिका निवडणूक लढणाऱ्या भाजपाकडून एकीकडे 'नमो भारत नमो ठाणे' बॅनर लावून त्यावर कमळाचे चिन्ह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्यात आल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे त्याच्याच शेजारी शिवसेनेच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो असलेला बॅनर वर 'माझ्या भावाला मत धनुष्यबाणाला' 'जगणं झालं छान कारण धनुष्यबाण' अशा प्रकारचा मजकूर बॅनर वरती दिसून येत आहे. त्यामुळे ठाणे महानगरपालिकेवर कोणाचा भगवा झेंडा फडकणार आणि कोणाची सत्ता येणार आणि कोणाचा महापौर बसेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर दुसरीकडे विरोधक कशा प्रकारची बॅनरबाजी करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. कालच संजय राऊत यांनी नमो ठाणे वरून भाजपाला लक्ष्य केलं होतं. त्यानंतर आज लागलेल्या या पोस्टरमुळे दोन्ही पक्ष आपल्या उमेदवारांसाठी विशेष प्रयत्न करताना दिसत आहेत. एकूणच प्रचार शिगेला पोहोचला आहे.

जगणं झालं सोप शिवसेना - शिवसेना आणि भाजपा ठाण्यात एकत्र लढत असले तरी महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) त्यांच्याबरोबर नाही. त्यामुळे त्यांनी सवता सुभा मांडला असून ते ठाण्यात एकला चलो रे च्या भूमिकेत आहेत. त्यामुळे भाजपा-शिवसेनेची पोस्टर सगळीकडे पाहायला मिळू लागली आहेत. अजित पवारांच्या पक्षाचं मात्र त्या दृष्टीनं काहीच प्रचाराची साधनं दिसत नाहीत.

हेही वाचा...

  1. निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांचा एजंट बनलाय, संजय राऊतांचं पुन्हा 'रोखठोक'
  2. उमेदवार हजर नसतानाही अर्ज घेतला मागे; 'बिनविरोधसाठी चालला होता खटाटोप', भाजपा बंडखोर उमेदवाराचा गंभीर आरोप