ETV Bharat / state

पोलीस भरतीचं स्वप्न अधूरं; 26 वर्षीय तरुणीची सुसाईड नोट लिहून आत्महत्या

पोलीस भरतीच्या तयारीत असलेल्या अंबरनाथमधील एका तरुणीनं आत्महत्या केली आहे. प्रतीक्षा राणे (26) असं तरुणीचं नाव आहे.

प्रतीक्षा राणे
प्रतीक्षा राणे (ETV Bharat/file)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : February 27, 2026 at 3:16 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

ठाणे - पोलीस भरतीत सतत अपयश येत असल्यानं एका 26 वर्षीय तरुणीनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना अंबरनाथ पश्चिम भागातील स्वामीनगर भागात घडली आहे. याप्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सय्यद शब्बीर यांनी दिली आहे. प्रतीक्षा राणे (26) असं तरुणीचं नाव आहे.

खळबळजनक बाब म्हणजे तिने आत्महत्या करण्यापूर्वी आई बाबा मला माफ करा, तुम्हाला जे जीवन द्यायचं होतं मला नोकरी न लागल्यानंतर ते देता आलं नाही, अशा आशयाची नोंद सुसाईड नोटमध्ये आढळून आल्याचं पोलिसांनी सांगितलं. यानंतर मुलीनं आत्महत्या केल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या तरूण तरुणींमध्येही या घटनेमुळं हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतक प्रतीक्षा ही अंबरनाथ पश्चिम भागातील स्वामीनगर भागात परिवारासह राहात होती. मृत प्रतीक्षा ही गेल्या काही वर्षापासून पोलीस भरतीचा सराव करत होती. पोलीस विभागात नोकरी करून आपल्या आईवडिलांना सुखी ठेवण्याचं तिचं स्वप्न होतं. मात्र प्रत्येक वेळी पोलीस भरतीत तिला अपयश येत असल्यानं या नैराश्यातून टोकाचं पाऊल उचलत 26 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारस तिनं आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल होत, पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी उल्हासनगर शहरातील मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात रवाना केला.



खळबळजनक बाब म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वी मृतक प्रतीक्षा राणे हिने आईवडिलांच्या नावे सुसाईड नोट लिहून ठेवल्याचं समोर आलं. याप्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सय्यद शब्बीर यांनी दिली आहे. या घटनेनंतर प्रतीक्षा राहात असलेल्या परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

(टीप - जर तुमच्या मनात आत्महत्येचे विचार येत असतील किंवा तुम्हाला एखाद्या मित्राची काळजी वाटत असेल किंवा तुम्हाला भावनिक आधाराची गरज असेल, तर स्नेहा फाउंडेशन - 04424640050 (24x7 उपलब्ध) किंवा iCall, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस हेल्पलाइन - 9152987821 सोमवार ते शनिवार सकाळी 8 ते 10 पर्यंत उपलब्ध आहे.)

हेही वाचा...

  1. पोलीस भरती दरम्यान तरुणाचा मृत्यू, 1600 मीटर धावताना भोवळ येऊन कोसळला!
  2. राज्यात पोलीस भरती प्रक्रियेत आणखी एक दुर्घटना, धावण्याच्या चाचणीत युवकाचा मृत्यू
  3. कुत्र्यामुळे सुसाईड नोट लिहून बँक कर्मचाऱ्याची आत्महत्या, नेमकं काय घडलं?