ETV Bharat / state

लाटांच्या धडकेत पोलिसांच्या 'नेपोलियन' गस्तीनौकेला जलसमाधी; मालवण किनाऱ्यावरील प्रकार

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या समुद्रात शनिवारी दुपारी एक खळबळजनक घटना घडली. सोसाट्याचा वारा आणि समुद्रातील अजस्र लाटांच्या धडकेमुळे पोलिसांच्या 'नेपोलियन' नावाच्या गस्तीनौकेला जलसमाधी मिळाली.

POLICE PATROL BOAT NAPOLEON
जलसमाधी घेताना नेपोलियन गस्तीनौका (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : February 28, 2026 at 8:13 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील मालवणच्या समुद्रात शनिवारी खळबळजनक घटना घडली. मोठमोठ्या लाटांच्या धडकेत पोलिसांच्या नेपोलियन नावाच्या गस्तीनैकेला जलसमाधी मिळाली. सुदैवानं गस्तीनौकेवर असलेल्या पोलीस आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखल्यामुळं जीवितहानी टळली.

सिंधुदुर्ग किल्ल्याच्या पाठीमागं घडली घटना : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील किनाऱ्यापासून दहा वावाच्या आता सिंधुदुर्ग किल्ल्याच्या मागील बाजूस ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत सुदैवानं नेपोलियन गस्तीनौकेवरील पोलीस आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वेळीच प्रसंगावधान दाखवत किनारा गाठला. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या पाठीमागील बाजूस नेपोलियन नावाची पोलिसांची गस्तीनौका गस्त घालत होती. सध्या समुद्रात सोसाट्याचा वारा सुरू झाला. त्यामुळे अजस्र लाटा किनाऱ्याच्या दिशेनं धडकत आहेत. शनिवारी (दि.28) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास लाटांनी नेपोलियन गस्तीनौकेला धडक दिली. त्यामुळं गस्तीनौकेत पाणी शिरलं. गस्तीनौका बुडू लागल्यानं नौकेवरील पोलीस तसंच सुरक्षा कर्मचाऱ्यांनी खबरदारीची उपाययोजना करत आपला जीव वाचवला. दरम्यानच्या काळात मालवण पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मालवणचे पोलीस निरीक्षक मारूती जगताप यांनी योगेश तोडणकर यांच्या मालकीची नौका घेऊन समुद्राच्या दिशेनं धाव घेतली.

पोलिसांचे अथक प्रयत्न अयशस्वी : पोलीस निरीक्षक मारूती जगताप त्यांच्यासोबत मत्स्य व्यावसायिक विली डिसोजा, नॉवेल फर्नांडिस, होमगार्ड जॉयल फर्नांडिस, खलाशी रॉनी, कुमार, लॉरेन्स, बेंडिट आदींनी पाण्यात बुडणाऱ्या नेपोलियन ग्स्तीनौकेला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले, मात्र ते अपुरे पडले. हे प्रयत्न करत असताना त्यांनी जलसमाधी मिळालेल्या नौकेवरील दोघांना वाचवण्यात यश मिळवलं. मालवणच्या समुद्रात पोलिसांच्या नौकेला जलसमाधी मिळाल्याच्या वृत्तानं सर्वत्र खळबळ उडाली आहे.

हेही वाचा :

  1. बारामतीच्या पठारावर स्ट्रॉबेरीचा गोडवा; प्रयोगशील शेतकरी दीपक जगताप यांची यशोगाथा
  2. झोपडपट्ट्यांत शिक्षणाची नवी वाट; 'ग्लोबल टीचर' विजेत्या रूबल नागी काय काम करतात?
  3. कोल्हापुरातून आता एअरबस विमानसेवेचं 'टेकऑफ', राजधानी दिल्लीसह शिर्डी, नागपूरशी कनेक्टिव्हिटी वाढणार