ETV Bharat / state

शिर्डीत आंध्रप्रदेशातील पाकिटमारी टोळी अटकेत, सतर्क राहण्याचं प्रशासनाचं भाविकांना आवाहन

शिर्डीत पाकिटमारी करणाऱया आंध्रप्रदेशातील टोळीला शिर्डी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

shirdi police arrest Andhra Pradesh theft gang
पाकिटमारी करणाऱया आंध्रप्रदेशातील टोळीला शिर्डी पोलिसांनी अटक केली (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : February 21, 2026 at 10:36 AM IST

|

Updated : February 21, 2026 at 11:07 AM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

अहिल्यानगर(शिर्डी) - साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून दररोज लाखो भाविक शिर्डीत येतात. मात्र, याच गर्दीचा फायदा घेत पाकिटमारी करणाऱ्या परराज्यातील टोळ्याही सक्रिय होत असल्याचं चित्र पोलिसांनी केलेल्या कारवाईतून समोर आलं. आंध्रप्रदेशातील एका पाकिटमारी टोळीला 1 लाखांच्या मुद्देमालासह शिर्डी पोलिसांनी अटक केली.

माहिती देताना शिर्डी पोलीस अधिकारी आणि गुन्हा कबूल करताना आरोपी (ETV Bharat Reporter)

शिर्डीत पाकिटमारी वाढली - श्रद्धा-सबुरीचा महामंत्र देणाऱ्या शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून दररोज लाखो भाविक शिर्डीत येतात. खास करून दक्षिणेतील भाविकांची संख्या यात लक्षणीय असते. याचाच फायदा घेत दक्षिणेतील पाकिटमारी करणारी टोळी सक्रिय असल्याचं समोर आलं. आंध्रप्रदेश राज्यातील कर्नुल जिल्ह्यातील आत्माकुर येथील एक अल्पवयीन मुलासह दोन महिला आणि एक पुरुष शिर्डी साईबाबांच्या मंदिराच्या क्रमांक तीन प्रवेशद्वाराजवळ संशयास्पद फिरताना साध्या वेशातील पोलीस कर्मचारी आणि साई संस्थानच्या सुरक्षा रक्षकांना आढळून आले.

shirdi police arrest Andhra Pradesh theft gang
शिर्डी पोलिसांनी आरोपींकडून जप्त केलेला मुद्देमाल (ETV Bharat Reporter)

आंध्रप्रदेशातील टोळी पकडली - अंगावर चांगले कपडे आणि तेलुगु भाषेतून बोलत असल्यानं सुरक्षा रक्षकांनी काही काळ मंदिर परिसरात त्यांच्यावर पाळत ठेवली. या टोळीतील अल्पवयीन मुलानं एका साईभक्त महिलेची पर्स चोरण्याचा प्रयत्न करताना रंगेहात पकडण्यात आलं. त्यावेळी त्याच्याबरोबर असलेला एक पुरुष आणि दोन महिलांनाही साई संस्थानच्या सुरक्षा रक्षकांनी व पोलिसांनी ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या जवळून विविध कंपनींचे तब्बल 10 मोबाईल , काही विदेशी चलन आणि 1100 रुपये रोख रक्कम असा एकूण 1 लाख 17 हजार 370 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांना मिळून आला. त्यानंतर साई संस्थानच्या सुरक्षा विभागाच्या वतीनं आरोपींसह मुद्देमाल शिर्डी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.

shirdi police arrest Andhra Pradesh theft gang
शिर्डी पोलिसांची मोठी कारवाई (ETV Bharat Reporter)

गुन्हा दाखल करत मुद्देमाल केला जप्त - शिर्डी पोलिसांनी आरोपींची चौकशी केली असता, ही पाकिटमारी करणारी टोळी आंध्रप्रदेश राज्यातील कर्नुल जिल्ह्यातील आत्माकुर गावातील असल्याचं निष्पन्न झालं. सैयद खाजा, गोकुळा कलम्मा आणि मणिकला रमुलाम्मा अशी आरोपींची नावं असून, एक अल्पवयीन मुलगा यांच्यासह आणखी एक आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपींविरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार आरोपींचा शोध शिर्डी पोलीस घेत आहेत. पुढील तपास सुरू असल्याची माहिती शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांनी दिली.

shirdi police
अटक केलेला आरोपी (ETV Bharat Reporter)

आरोपी अटकेत -आंध्रप्रदेश राज्यातील कर्नुल जिल्ह्यातील आत्माकुर गावातील ही पाकिटमारी टोळी रेल्वेनं नागपूर येथे आली. तेथून शुक्रवारी सकाळी शिर्डीत आली. साई मंदिराजवळील शौचालयात फ्रेश होऊन चांगले कपडे घालून मंदिर परिसरातील भाविकांच्या गर्दीत शिरून पाकिटमारी करत असल्याची कबुली आरोपी सैयद खाजा यांनी दिली.

हेही वाचा -

  1. शिर्डीत लवकरच भव्य शिवसृष्टी उभारणार, 10 कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी; डॉ. सुजय विखे पाटील यांची माहिती
  2. शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागली घरघर; विमानं घटली, टॅक्सी चालक अडचणीत
  3. ऑस्ट्रेलियन भक्त शिर्डीत, साई प्रसादालयातील शिस्तबद्ध व्यवस्था पाहून भारावले
Last Updated : February 21, 2026 at 11:07 AM IST