ETV Bharat / state

धक्कादायक : पुण्यात अपक्ष उमेदवाराची आत्महत्या; 'राष्ट्रवादीच्या उमेदवारानं केलं टॉर्चर', सुसाईड नोटमध्ये आरोप

हडपसरमधील अपक्ष उमेदवारानं कार्यालयात आत्महत्या केल्यानं मोठी खळबळ उडाली. राष्ट्रवादीच्या उमेदवारानं टॉर्चर केल्याचा आरोप आत्महत्या केलेल्या उमेदवारानं सुसाईड नोटमध्ये केला आहे.

PUNE INDEPENDENT CANDIDATE SUICIDE
प्रतिकात्मक छायाचित्र (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : January 4, 2026 at 9:22 PM IST

|

Updated : January 4, 2026 at 9:28 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

पुणे : महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना पुण्यातील हडपसर इथं अपक्ष उमेदवारानं आत्महत्या केल्यानं मोठी खळबळ उडाली. सादिक उर्फ बाबू कपूर असं या आत्महत्या केलेल्या अपक्ष उमेदवाराचं नाव आहे. सादिक उर्फ बाबू कपूर हे पुण्यातील प्रभाग क्रमांक 41 मधील अपक्ष उमेदवार होते. त्यांनी स्वतःच्या कार्यालयात आत्महत्या केली. "या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार फारुख इनामदार, अफ्फान फारुख इनामदार, जहुर सय्यद आणि तन्वीर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे," अशी माहिती पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांनी दिली.

अपक्ष उमेदवाराची कार्यालत आत्महत्या : पुण्यातील लष्कर भागात असलेल्या कार्यालयात सादिक उर्फ बाबू कपूर यांनी आत्महत्या केली. आत्महत्या कराण्याआधी सादिक कपूर यांनी त्यांच्या हातावर आणि कागदावर सुसाइड नोट लिहिली होती. यामध्ये अनेकांची नावं असून यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हडपसरचे उमेदवार फारुख शेख यांचंदेखील नाव आहे. सय्यद नगर भागातील पाच गुंठे जमिनीच्या वादातून ही आत्महत्या झाली असल्याची प्राथमिक माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर (ETV Bharat Reporter)

जागेच्या वादातून केली आत्महत्या : याबाबत पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर म्हणाल्या, "काल संध्याकाळी पोलिसांना सादिक उर्फ बाबू कपूर यानं आत्महत्या केली असल्याची माहिती मिळाल्यावर तत्काळ घटनास्थळी भेट दिली. त्यानं सुसाइड केली असल्याचं समजलं. त्याच्या मुलानं आज तक्रार दिली असून 4 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये फारुख इनामदार, अफ्फान फारुख इनामदार, जहुर सय्यद आणि तन्वीर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलाच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. त्यानं जी सुसाईड नोट लिहिली आहे, त्यात 38 जणांची नावं आहेत. याबाबत आम्ही तपास करत आहोत. जागेच्या वादामुळे सादिक हे मानसिक दबावात होते आणि यातून त्यांनी हे पाऊल उचललं. याबाबतचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे," असं यावेळी त्यांनी सांगितलं.

हेही वाचा :

  1. असाही लळा! पाळीव श्वानाच्या आजारपणामुळे दोन बहिणींची आत्महत्या, श्वानाचाही मृत्यू
  2. नांदेड मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा; मुलांनीच केला आई-वडिलांचा खून, नंतर स्वत: केली आत्महत्या
  3. हुंड्यासाठी छळाला कंटाळून नवविवाहितेची कर्नाटकात आत्महत्या; घाबरलेल्या पतीनं नागपूरमध्ये दिला जीव, सासूचाही आत्महत्येचा प्रयत्न
Last Updated : January 4, 2026 at 9:28 PM IST