पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का! प्रदेश काँग्रेस उपाध्यक्षांच्या हाती घड्याळ
ऐन महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

Published : January 11, 2026 at 3:48 PM IST
पुणे - राज्यातील महानगरपालिका निवडणुकांना अवघे काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. काही ठिकाणी सर्वच पक्ष वेगवेगळे लढत आहेत, तर काही ठिकाणी युती, आघाडी झाली आहे. पुण्यात चित्र मात्र वेगळं आहे. पुण्यात भाजपा आणि राष्ट्रवादी विरोधात लढत आहेत. त्यामुळं ही निवडणूक रंजक होणार आहे. अशातच पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का - महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू आहे. महापालिकेच्या निवडणुकीला काही दिवस शिल्लक असताना पुण्यात सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार करण्यात येत आहे. पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला असून, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष उस्मान भाई तांबोळी यांनी रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.
उस्मान तांबोळी यांचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश - पुणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढाई पाहायला मिळत आहे. पुण्यातील प्रभाग क्रमांक 24 मध्ये पॅनल प्रमुख व राष्ट्रवादीचे नेते सदानंद शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस उपाध्यक्ष उस्मान तांबोळी यांचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करण्यात आला. या प्रवेशामुळं प्रभाग क्रमांक 24 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढली आहे, असं सदानंद शेट्टी म्हणाले.
पुण्यात जोरदार प्रचार - पुण्यातील मंगळवार पेठ तसंच आजूबाजूच्या परिसरात काँग्रेसचे नेते उस्मान तांबोळी यांची मोठी ताकद आहे. याचा फायदा राष्ट्रादी पक्षाला होणार आहे. महापालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये ठाण मांडून आहेत. भाजपावर टीका करत जोरदार प्रचार सुरू आहे. शहरातील विविध प्रभागात रोड शो तसंच सभा घेत अजित पवार यांच्याकडून पक्षाची ताकद वाढवली जात आहे.
हेही वाचा -
- ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात होणार चुरशीची लढत; लालबागमध्ये किरण तावडे आणि अनिल कोकीळ आमनेसामने
- बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक दगडू सपकाळ यांनी सोडली उद्धव ठाकरेंची साथ, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत एन्ट्री
- 'जे काम उबाठानं केलं, त्याचं श्रेय चोरू नका' : संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल

