ETV Bharat / state

देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात भाजपाचा एक गट सक्रिय : नाना पटोलेंचा दावा, म्हणाले 'सुधीर मुनगंटीवार . . . '

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात भाजपाचा एक गट सक्रिय झाला असा दावा काँग्रेसनेते नाना पटोले यांनी केला. सुधीर मुनगंटीवारांवरुनही त्यांनी यावेळी हल्लाबोल केला.

Nana Patole On Devendra Fadnavis
काँग्रेस नेते नाना पटोले (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : January 5, 2026 at 3:43 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात एक गट सक्रिय असल्याचा दावा काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केला आहे. सुधीर मुनगंटीवार काय करत आहेत, याची देखील सर्व माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांना असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केलाय. नाना पटोले हे आज नागपूर इथं बोलत होते. भाजपामध्ये प्रचंड असंतोष आहे. लवकरच या असंतोषाचा उद्रेक होईल, असा दावा देखील त्यांनी केलाय.

भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांनी नारायण राणेंचा आदर्श घ्यावा : भाजपा नेत्यांना मानसिक आजार झाला असून त्यांना सत्तेचा माज चढल्याचा आरोप पटोले यांनी केला. ज्या प्रमाणं नारायण राणे यांनी निवृत्तीचे संकेत दिले आहेत, त्यांचा आदर्श नारायण राणे यांच्या पेक्षा मोठे आणि बरोबरीच्या नेत्यांनी घ्यावा, असा टोला नाना पटोले यांनी लागवलाय.

विधानसभा अध्यक्ष बदला : "राज्याच्या विधिमंडळाला फार मोठी गौरवशाली परंपरा आहे. विधानसभा अध्यक्ष हे संवैधानिक पद आहे. लोकांना न्याय मिळेल याची काळीजी घेण्याचं काम त्यांचं आहे. जनतेचा आवाज दाबला जाऊ नये, याची काळजी विधानसभा अध्यक्षांनी घ्यायची असते. बाहेर वावरत असताना राजकीय वक्तव्य करता येत नाही. असं लिखित नसलं तरी राजकीय परंपरा आहे. संवैधानिक पदाची गरिमा राखणाऱ्या व्यक्तीला या पदावर बसवावं," अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.

अजित पवारांचं सूचक वक्तव्य : भाजपानं प्रचारात आघाडीवर घेतली आहे. यावर बोलताना नाना पटोले चांगलेच संतापलेले. जनता वाऱ्यावर आणि सरकार प्रचारात आहे, अशीच परिस्थिती असल्याचं नाना पटोले म्हणाले. "शेतकरी आत्महत्या वाढलेल्या आहेत. बेइमानीनं सरकार सत्तेत आलं. हे लोकशाहीसाठी फार हानिकारक आहे. अजित पवार यांचं वक्तव्य सूचक आहे, 70 हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला, असा आरोप आहे. तरी भाजपा सोबत सत्तेत मी सहभागी आहे, असं त्यांनी सांगितलं. भ्रष्टाचारच्या आधारावर निवडणुका या बिनविरोध करण्याचं काम सुरू आहे. भ्रष्टाचाराला वलय देणारी व्यवस्था भाजपानं उभी केल्याचे संकेत अजित पवार यांनी दिले आहेत, असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.

हेही वाचा :

  1. अमरावतीत भाजपाला मिळणार बहुमत ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास
  2. अमरावती मुख्यमंत्र्यांचा रोड शो, महापालिका निवडणूक प्रचाराचा 'श्री गणेशा', पक्ष निरीक्षकांना चालावं लागलं पायी
  3. 'महाराष्ट्रात फक्त मराठी भाषा सक्तीची'; मुख्यमंत्र्यांचा चिमटा, म्हणाले, 'साहित्यिकांनी राजकारणात जरूर यावं, पण...'