ETV Bharat / state

ओल्या कचऱ्यापासून आता घरच्या घरी बनवा खत; पुण्याच्या तरुणाचा अनोखा स्टार्टअप

पुण्यातील सार्थवा भोंडवे तरुणाने एक अनोखा स्टार्टअप सुरू केला असून, याद्वारे नागरिक आता त्यांच्या घरातील ओला कचरा स्वतःहा प्रक्रिया करून त्याद्वारे खत निर्मिती करू शकतात.

Now make compost from wet waste right at home
ओल्या कचऱ्यापासून आता घरच्या घरी बनवा खत (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : August 31, 2026 at 1:40 PM IST

|

Updated : August 31, 2026 at 5:39 PM IST

3 Min Read
Choose ETV Bharat

पुणे: पुणे शहरात दररोज तब्बल 2800 टन कचरा निर्माण होत असून, यात 1000 ते 1100 टन हा ओला कचरा असतो. एवढ्या मोठ्या प्रमाणावर पुणे शहरात कचरा असल्याने आणि प्रक्रिया क्षमता कमी असल्याने शहरात कचऱ्याची मोठी समस्या निर्माण होत असून, अनेक ठिकाणी कचरकुंड्यांमध्ये कचरा पडलेला पाहायला मिळतोय. मात्र असं असलं तरी आता पुण्यातील सार्थवा भोंडवे या तरुणाने फेकू नका, तर कचरा मशिनमध्ये टाकून फिरवा म्हणत एक अनोखा स्टार्टअप सुरू केला असून, याद्वारे नागरिक आता त्यांच्या घरातील ओला कचरा स्वतःहा प्रक्रिया करून त्याद्वारे खत निर्मिती करू शकतात. त्यांच्या या स्टार्टअपला चांगला प्रतिसाद मिळत असून, देशभरात नागरिक आता घरच्या घरी खतनिर्मिती करीत आहेत.

मशिनद्वारे महिन्याला 10 ते 15 किलो खत तयार : पुण्यातील सार्थवा भोंडवे या तरुणाने अ‍ॅक्सी सस्टेनेबल सोल्युशन्स या स्टार्टअपद्वारे होम कंपोस्टिंग मशीन विकसित केली असून, त्याद्वारे नागरिक ओला कचरा कचराकुंडीत तसेच कुठेही न टाकता आता थेट त्या कचऱ्यापासून खत बनवू शकतात आणि हे मशीन नागरिक डस्टबिन म्हणून देखील वापरू शकतात. गेल्या तीन वर्षात देशभरात 3500 हून अधिक होम कंपोस्टिंग मशीन विकल्या गेल्या असून, याला नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे आणि नागरिक या मशिनद्वारे महिन्याला 10 ते 15 किलो खत बनवत आहेत.

ओल्या कचऱ्यापासून आता घरच्या घरी बनवा खत (Source- ETV Bharat)

अशी झाली सुरुवात : याबाबत अ‍ॅक्सी सस्टेनेबल सोल्युशन्सचा सह संस्थापक सार्थवा भोंडवे सांगतो की, या स्टार्ट अपची सुरुवात वर्ष 2023 मध्ये आम्ही केली आणि सुरुवातीला याची ट्रायल घेतली आणि 2024 मध्ये आम्ही हे विकायला सुरुवात केली. माझे वडील हे गेल्या अनेक वर्षापासून सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटमध्ये काम करत असल्याने मी कचऱ्याच्या समस्या लहानपणापासूनच पाहत आलो आहे. पुण्यात मोठ्या प्रमाणावर ओला कचरा निर्माण होत असतो. यावर उपाय म्हणून आम्ही याबाबत अभ्यास करीत होतो आणि याची सुरुवात विज्ञान आश्रमातून झाली. तेथील डॉ. योगेश कुलकर्णी यांनी आम्हाला खूप मदत केली आणि आम्ही तेथून याची टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करून घेतली आणि ओला कचऱ्यावर उपाय म्हणून आम्ही ही होम कंपोस्टिंग मशीन विकसित केली, असंही तो म्हणाला.

Now make compost from wet waste right at home
ओल्या कचऱ्यापासून आता घरच्या घरी बनवा खत (Source- ETV Bharat)

3500 हून अधिक नागरिकांच्या घरात होम कंपोस्टिंग मशीन : तो पुढे म्हणाला की, ही होम कंपोस्टिंग मशीन तयार झाल्यानंतर आम्ही सुरुवातीला याचं ट्रायल घेतलं आणि यानंतर 2024 मध्ये ऑनलाईन विक्रीला सुरुवात केली. आजपर्यंत साधारणत: 28 राज्यांमध्ये ऑनलाइनच्या माध्यमातून ही मशीन पोहोचली असून, आतापर्यंत 3500 हून अधिक मशीन या विक्रीला गेल्या आहेत. नागरिक आपल्या घरात तयार होणाऱ्या कचऱ्याला पर्याय म्हणून याकडे पाहत आहे. आपल्या प्रत्येकाच्या घरात डस्बिन असून, या मशीनला नागरिकांचा प्रतिसाद चांगला मिळत आहे, असंही यावेळी त्याने सांगितलं.

Now make compost from wet waste right at home
ओल्या कचऱ्यापासून आता घरच्या घरी बनवा खत (Source- ETV Bharat)

या प्रक्रियेने महिन्याला 5 किलो खत तयार : आता जे लोक याचा वापर करीत आहेत, ते लोक त्यांच्या घरातील गार्डनमध्ये हे खताचं मशीन ठेवत असून, तिथेच खत बनवतात. तसेच त्यांचा वापर झाल्यानंतर शिल्लक राहिलेलं खत ते शेतकऱ्यांना देतात. घरात जर दिवसाला 700 ते 800 ग्रॅम ओला कचरा तयार होत असेल, तर ते महिन्याभरात 20 ते 25 किलो होतं आणि या मशीनमध्ये कंपोस्ट केल्यावर त्याचेच 5 किलो खत बनते. कचऱ्यातील पाण्याचे नैसर्गिक बाष्पीभवन होऊन सुमारे 75 टक्के कचरा कमी होतो आणि या खताचा वापर नागरिक आपल्या गार्डनमध्ये करीत आहेत. पुण्यात 500 ते 600 मशीन या विकल्या गेल्या असून, अनेक ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Now make compost from wet waste right at home
ओल्या कचऱ्यापासून आता घरच्या घरी बनवा खत (Source- ETV Bharat)

कचरा डस्टबिनमध्ये टाकण्याला स्वल्पविराम : ज्याप्रमाणे आज घरोघरी रद्दी पेपर गोळा करून पुनर्वापरासाठी देण्याची सवय रुजली आहे, त्याचप्रमाणे प्रत्येक घरात ओल्या कचऱ्याचे कंपोस्टिंग करण्याची सवय लागावी, असा आमचा मानस आहे. कचरा डस्टबिनमध्ये टाकणे हा जर 'स्वल्पविराम' असेल, तर हे कंपोस्टिंग मशीन त्या समस्येवर 'पूर्णविराम' ठरत असून, गेल्या काही वर्षांत हे देशातील प्रत्येक घरात डस्टबिन म्हणून वापरला गेला पाहिजे, अशी आमची इच्छा असल्याचं त्यानं सांगितलं.

Now make compost from wet waste right at home
ओल्या कचऱ्यापासून आता घरच्या घरी बनवा खत (Source- ETV Bharat)

कसा वापर करावा? : आपल्या घरात दररोज ओला कचरा हा तयार होत असतो, तोच घरातील रोजचा ओला कचरा या मशीनमध्ये टाकायचा आणि सुरुवातीला त्यासोबत विशिष्ट 'बायो-कल्चर' पावडर टाकायची आणि मशीनचे झाकण बंद करून त्याचे हँडल दिवसातून एकदा किंवा तीनदा सरळ आणि तीन वेळा उलट दिशेनं त्या मशीनचं हॅण्डल फिरवायचं हे दिवसापासून 3 सेकंद करायचं असून, या तीन स्टेप केल्यावर महिन्याअखेरीस चहाच्या पत्तीसारखे बारीक, दुर्गंधीमुक्त सेंद्रिय खत तयार होते.

तीन साडेतीन किलो खत तयार : यावेळी हे होम कंपोस्टिंग मशीन वापरणाऱ्या सुनीता म्हणाल्या की, गेल्या तीन वर्षांपासून हे मी वापरत असून, माझ्या घरातील ओला कचरा दररोज मी या मशीनमध्ये टाकत असते आणि मला महिन्याला जवळपास तीन साडेतीन किलो खत तयार होत असते आणि घरातील गार्डनमध्येच ते खत मी वापरत आहे. मला एक गोष्टीचा अभिमान आहे की, माझ्या घरातील ओला कचरा हा वाया जात नाही, मी कुठेही फेकत नाही, असंही यावेळी त्यांनी सांगितलंय.

खत बनवणारी अतिशय चांगली मशीन : यावेळी कोथरूड येथील महात्मा सोसायटी येथे राहणाऱ्या नीरजा आपटे म्हणाल्या की, मला नेहमी वाटायचं की माझ्या घरातील कचरा मी बाहेर फेकून देते आणि देताना कधी ते पडतं तर कधी त्यातून वास येतो. मला झाडांची आवड असल्याने खत हे बाहेरून आणावं लागत होतं आणि आपल्या घरातील कचऱ्यापासून खत बनवता येईल, यासाठी खूप ठिकाणी शोध मोहीम सुरू केली आणि आम्हाला ही मशीन मिळाली आणि अतिशय चांगली मशीन असून, मला याच चांगला अनुभव येत असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलंय.

हेही वाचाः

ऐन सणासुदीत केळीचे भाव कोसळले; नांदेड जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात

तेलंगाणा पोलिसांवर महाराष्ट्रात हल्ला; आरोपीला हातकडीसह पळवलं: किनवटमध्ये मध्यरात्री गोळीबाराचा थरार

Last Updated : August 31, 2026 at 5:39 PM IST