ETV Bharat / state

“तू माझ्यासोबत संबंध ठेवले नाहीस तर...; भोंदूबाबाकडून महिलेवर तब्बल दहा वर्षे लैंगिक अत्याचार

भोंदूबाबा गणेश जगतापने (Fake Bhondu Baba) एका महिलेवर लैंगिक अत्याचार करून 50 लाखांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे.

Nashik Crime News
लैंगिक अत्याचार (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : November 15, 2025 at 6:43 PM IST

|

Updated : November 15, 2025 at 6:54 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

नाशिक :: “तू माझ्यासोबत संंबंध ठेवले नाहीस तर तुझ्या घरातील कोणाचा तरी बळी जाईल,” अशी धमकी देऊन महिलेच्या इच्छेविरुद्ध जबरीने लैंगिक अत्याचार करून तिच्या कुटुंबीयांची 50 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी, एका भोंदूबाबाविरुद्ध (Fake Bhondu Baba) नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांनी दिली.



काय आहे प्रकरण? : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही इंदिरानगर परिसरात राहाते. आरोपी गणेश जगताप भोंदूगिरी आणि बाबागिरी करतो. त्यानं पीडित महिलेच्या पतीला दारुचे व्यसन लावून ते व्यसन सोडवण्याच्या बहाण्याने महिलेशी जवळीक साधून तू मला खूप आवडतेस. तुला मिळवण्यासाठी मी स्मशानात पूजा करत आहे, असं सांगितलं. तसंच पीडितेला एक पुस्तक काढून दाखवलं. त्या पुस्तकात फिर्यादी, तिचे पती आणि मुलांची नावं लिहिलेली होती. हे पुस्तक दाखवून भोंदूबाबाने “तू माझ्यासोबत संबंध ठेवले नाहीस, तर पुस्तकात लिहिलेल्या नावातील कोणाचा तरी बळी जाईल,” अशी धमकी देऊन पीडितेवर तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने अनेकदा लैंगिक अत्याचार केला, तसंच तिच्या कुटुंबीयांची 50 लाख रुपयांची फसवणूक केली. जवळपास दहा वर्ष हा प्रकार सुरू होता.


भोंदू बाबाला अटक करण्यासाठी पथक रवाना : महिलेच्या फिर्यादीवरुन भोंदूबाबा गणेश जगताप विरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात बलात्कार आणि फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच भोंदूबाबा हा फरार झाला असून त्याला पकडण्यासाठी पथक रवाना करण्यात आल्याची माहिती, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांनी दिली.



भोंदूबाबाचे प्रताप : काही दिवसापूर्वी पुण्यातील एका उच्चशिक्षित दांपत्याची 14 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एका भोंदूबाबा विरोधात पुण्यात गुन्हा दाखल झालाय. या प्रकरणातील तीन आरोपींना नाशिकमधून अटक करण्यात आली होती. तसंच, एका भोंदूबाबाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल आहे.



हेही वाचा -

  1. विद्यार्थ्यांच्या सुरक्षा उपायांची 40 टक्के शाळांकडून पूर्तता; 'या' तारखेपर्यंत डेटा पोर्टलवर जाहीर करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश
  2. नातेवाईकांनीच केला चार अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार, दोन आरोपींना अटक, चारही मुलींची सुटका
  3. बाप-लेकीच्या नात्याला कोल्हापुरात काळीमा; जन्मदात्या बापानेच केला लेकीवर लैंगिक अत्याचार
Last Updated : November 15, 2025 at 6:54 PM IST