ETV Bharat / state

नाशिक: दीक्षांत सोहळ्यात प्रेमाचं उड्डाण; वैमानिकानं हेलिकॉप्टरसमोर गुडघ्यावर बसून प्रेयसीला घातली लग्नाची मागणी

दीक्षांत सोहळा संपल्यानंतर उपस्थित अधिकारी, कुटुंबीय आणि मित्रमंडळींना एक अनपेक्षित, रोमँटिक आणि भावनिक क्षण अनुभवायला मिळाला.

Nashik Graduation Ceremony
दीक्षांत सोहळ्यात प्रेमाचं उड्डाण (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : June 2, 2026 at 5:53 PM IST

|

Updated : June 2, 2026 at 10:24 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

नाशिक : येथील कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल इथं आज मंगळवारी (2 जून) भारतीय लष्कराच्या हेलिकॉप्टर आणि ड्रोन वैमानिकांचा दीक्षांत सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्याचं प्रमुख आकर्षण म्हणजे युद्धभूमीवरील परिस्थितीचा प्रत्यक्ष अनुभव देणारे विशेष प्रात्यक्षिक होते.

हेलिकॉप्टर, ड्रोन, तोफा, रणगाडे आणि पायदळ दल यांच्या संयुक्त कारवाईचं प्रभावी सादरीकरण करण्यात आलं. या प्रात्यक्षिकातून भारतीय लष्कराची आधुनिक युद्धसज्जता, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि हवाई शक्तीचं सामर्थ्य अधोरेखित झालं. या भव्य सोहळ्यामुळे नाशिककरांना आधुनिक युद्धतंत्राची जवळून झलक पाहण्याची संधी मिळाली. भारतीय लष्कराच्या क्षमतेचं दर्शन घडवणारा हा सोहळा उपस्थितांसाठी डोळ्यांचं पारणं फेडणारा ठरला.

वैमानिकानं हेलिकॉप्टरसमोर गुडघ्यावर बसून प्रेयसीला घातली लग्नाची मागणी (ETV Bharat Reporter)

रोमँटिक आणि भावनिक क्षण : दीक्षांत सोहळा संपल्यानंतर उपस्थित अधिकारी, कुटुंबीय आणि मित्रमंडळींना एक अनपेक्षित, रोमँटिक आणि भावनिक क्षण अनुभवायला मिळाला. प्रशिक्षण पूर्ण करून वैमानिक म्हणून नव्या जबाबदारीसाठी सज्ज झालेल्या भारत भारद्वाज यांनी सर्वांसमोर आपल्या प्रेयसी आरुषी हिला लग्नाची मागणी घातली.

हेलिकॉप्टरसमोर गुडघ्यावर बसून भारत यांनी आरुषीला प्रपोज केलं. चित्रपटातील प्रसंगालाही साजेसा वाटणारा हा क्षण पाहून आरुषी भावूक झाली आणि तिच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्टपणे झळकत होता. या अनोख्या प्रेमप्रस्तावानं उपस्थितांची मने जिंकली. लष्करी शिस्त आणि भावनिक क्षणांचा सुंदर संगम घडवणारा हा प्रसंग सोहळ्याचं विशेष आकर्षण ठरला.

आजचा दिवस खूप अविस्मरणीय- भारत भारद्वाज : "आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षण आहे. आम्ही दोघे गेल्या 5 वर्षांपासून एकमेकांना ओळखतो आणि आज आमच्या नात्याला अधिकृत स्वरूप मिळालं आहे. सर्वांसमोर माझ्या मनातील भावना व्यक्त करत मी तिला लग्नाची मागणी घातली आणि तिनंही ती आनंदानं स्वीकारली. याचा मला खूप आनंद होत आहे. आम्ही लवकरच विवाहबंधनात अडकणार आहोत. त्यामुळे आजचा दिवस माझ्यासाठी अत्यंत खास आणि महत्त्वाचा आहे," असं वैमानिक भारत भारद्वाज यांनी सांगितलं.

हेही वाचा

Last Updated : June 2, 2026 at 10:24 PM IST