ETV Bharat / state

पोलीस संरक्षणासाठी संतप्त तरुणानं केला व्हिडिओ; संरक्षण देण्याऐवजी पोलिसांनी रॅपिडो चालकावरच केला गुन्हा दाखल

नागपुरात FIR ऐवजी NCR नोंदवल्यानं संतप्त रॅपिडो चालकाने पोलिसांना जबाबदार धरत व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. आता पोलिसांनीच त्याच्यावर कारवाई केलीय.

Nagpur Crime
रॅपिडो बाईक चालकावर कायदेशीर कारवाई (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : July 2, 2026 at 8:51 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

नागपूर - पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिला म्हणून एका रॅपिडो चालक तरुणाने पोलीस स्टेशन समोर उभे राहून व्हिडिओ बनवला. मात्र यामुळे संरक्षण मिळण्याऐवजी त्या रॅपिडो चालकाला ही कृती चांगलीच महागात पडली आहे. पोलीस सुरक्षा देत नाहीत म्हणून आता तो स्वतः हत्यार बाळगत स्वतःची सुरक्षा करणार अशा आशयाचा व्हिडिओ त्यानं बनवला होता. जर माझ्या हातून कुणाची हत्या झाली तर आता पोलीस प्रशासन जबाबदार असा दावा करणारा हा व्हिडिओ त्यानं तयार केला. तो व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी रॅपिडो चालकाविरोधात कायदेशीर कारवाई केली आहे.

पोलिसांवर आरोप करणारा व्हिडिओ केला व्हायरल - नागपुरात रॅपिडो चालकाने ऑटो चालकाकडून मारहाण झाल्याची तक्रार दिल्यानंतर नंदनवन पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याचा आरोप त्याने केला. त्यामुळं त्यानं पोलिसांविरोधात व्हिडिओ बनवत संताप व्यक्त केला होता. त्या तरुणाने नंदनवन पोलीस ठाण्यासमोरच उभे राहून पोलिसांवर आरोप करणारा व्हिडिओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर व्हायरल केला होता.

माहिती देताना पोलीस निरीक्षक कैलास देशमाने (ETV Bharat Reporter)


मनाप्रमाणे एफआयआर दाखल न झाल्याचा राग -तरुणाने व्हिडिओमध्ये असा दावा केला की, तो स्वतःच्या सुरक्षेसाठी आता हत्यार बाळगणार आणि त्यात माझ्याकडून कोणाची हत्या झाली तर त्याला पोलीस जबाबदार असतील, असा इशारा दिलेला होता. ऑटो चालकांनी मारहाण केल्याची तक्रार केल्यानंतर पोलिसांनी (FIR) एफआयआर नोंदविण्याऐवजी नंदनवन पोलिसांनी केवळ एनसीआर नोंदवल्याचा रॅपिडो चालकाचा आरोप होता.



रॅपिडो चालकावर कायदेशीर कारवाई : त्या तरुणाची तक्रार ही अदखलपात्र स्वरूपाची असल्यानं नियमानुसार एनसीआर नोंदविण्यात आल्याचं नंदनवन पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. मात्र, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी संबंधित रॅपिडो चालकालाच ताब्यात घेऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई ही केली आहे. पोलीस संरक्षण मिळण्याऐवजी आता या तरुणाला पोलिसांच्या कारवाईलाच सामोरे जावे लागत आहे.

हेही वाचा -

  1. रॅपिडो बाईक टॅक्सी अनधिकृतच! बाईक बुक करत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केला भांडाफोड
  2. Bomay High Court : बाईक टॅक्सी चालविण्यासाठी परवानगी देण्याबाबत चालढकल; राज्य सरकारला मुंबई उच्च न्यायालयाने फटकारले
  3. महाराष्ट्रात बाईक टॅक्सी सेवांवर सरकारचा मोठा निर्णय! बेकायदा बाईक टॅक्सी सेवांवर कारवाई; Apple-Google ला नोटीस