छत्तीसगडच्या आरोपीकडून दोन जिवंत डिटोनेटर जप्त : न्यायालयानं आरोपीला ठोठावली कोठडी
नागपूर पोलिसांनी छत्तीसगडच्या आरोपीला अटक केली आहे. या आरोपीकडून दोन डिटोनेटर जप्त करण्यात आली आहेत.

Published : September 3, 2026 at 7:54 AM IST
नागपूर : नागपूर पोलिसांनी एक संशयास्पद आरोपीकडून स्फोटकं जप्त केली आहे. पोलिसांची गस्त सुरू असताना त्यांना या आरोपीकडं स्फोटक असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. पोलिसांनी संबंधित व्यक्तीचा शोध घेतला असता, त्याच्याकडं 2 जिवंत कमर्शियल डिटोनेटर आणि 12 मीटर लीड गेज वायर असे स्फोटक साहित्य आढळून आलं आहे. राजेंद्र रामलाल विश्वकर्मा असं या व्यक्तीचं नाव असून छत्तीसगड राज्याचा रहिवासी आहे. या प्रकरणी लकडगंज पोलीस ठाण्यात 495/2026 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी दिली आहे.
दोन जिवंत डिटोनेटर आणि वायर जप्त : लकडगंज पोलिसांनी जप्त स्फोटक साहित्याची तज्ज्ञांकडून तपासणी केली असून ते धोकादायक स्वरूपाचे असल्याचं निष्पन्न झालं आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीनं जप्त केलेले डेटोनेटर कोलटेक एनर्जी लिमिटेड, बाजारगाव इथं जमा करण्यात आले आहेत. पोलिसांनी आरोपीला न्यायालयासमोर हजर केलं असता त्याला 5 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली. आरोपीनं डिटोनेटर कोठून प्राप्त केले, त्याचा उद्देश काय होता, तसेच इतर साथीदार आहेत का, याबाबत तपास सुरू आहे.

वरोरा इथून आणले स्फोटकं : जप्त स्फोटक साहित्य पूर्णतः नष्ट करण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी मागण्यात आली होती. न्यायालयानं स्फोटक साहित्याचा नाश करण्यास परवानगी दिली आहे. स्फोटक साहित्य सुरक्षितरीत्या नष्ट करण्यासाठी बॉम्ब शोधक आणि नाशक पथक तसेच कोलटेक कंपनीशी पत्रव्यवहार करून उद्या नाश करण्याची कार्यवाही प्रस्तावित आहे. आरोपीने सदर डिटोनेटर कोल माईन, वरोरा, इथून प्राप्त केल्याचं सांगितलं. सदर ठिकाणी जाऊन शहानिशा करून पुढील तपास करण्याची कार्यवाही प्रस्तावित आहे.
हेही वाचा :

