ETV Bharat / state

काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध; निवडणूक आयोगासह मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांवर हर्षवर्धन सपकाळांनी केली आरोपांची सरबत्ती

नागपूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं आपला जाहीरनामा प्रसिद्ध केलाय.

Harshwardhan Sapkal
हर्षवर्धन सपकाळ (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : January 6, 2026 at 7:04 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

नागपूर : नागपूर महापालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षानं 100 नगरसेवक निवडून आणण्याचा संकल्प केला आहे, त्यासाठी काँग्रेसनं आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. त्यात विजयाची 20 सूत्रे ठरवण्यात आली आहेत. नागपूर शहरातील नागरी समस्यांवर आधारित 20 सुत्रांमध्ये अनेक आश्वासने देण्यात आली आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थिती हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष विकास ठाकरे उपस्थित होते.

काँग्रेसने तयार केला आराखडा : काँग्रेसच्या जाहीरनाम्यात भाजपाच्या अपयशी कारभारामुळंच निर्माण झालेल्या समस्यांचा स्पष्ट आणि ठोस उल्लेख करण्यात आला आहे. त्या अपयशावर प्रभावी उत्तर देण्यासाठी काँग्रेसने 20 सूत्रांचा सर्वसमावेशक आणि लोकाभिमुख आराखडा सादर केला आहे. या 20 सूत्रांच्या माध्यमातून स्वच्छ, सुरक्षित आणि स्मार्ट नागपूर घडवण्याचा ठाम आणि निर्धारपूर्ण संकल्प काँग्रेसने व्यक्त केला आहे.

प्रतिक्रिया देताना हर्षवर्धन सपकाळ (ETV Bharat Reporter)



दुबार मतदार : राज्यात 29 महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत. वोट चोरीचा मुद्दा काँग्रेसनं लावून धरला आहे. काँग्रेसनं कामठीत मोठी रॅली सुद्धा काढली. निवडणूक आयोगाने कबूल सुद्धा केलं की दुबार (डुप्लिकेट) नावं मतदारयादीत आहेत. अशा दुबार नावांच्या पुढे स्टार लावण्यात आले होते, ती नावं यावेळी काढण्यात आल्याचं सपकाळ म्हणाले.


उमेदवार बिनविरोध करण्यासाठी सत्तेचा उपयोग : मतदानाच्या 48 तासाच्या आधी प्रचार बंद होतो, मात्र यंदा प्रचार सुरू होता. मतदारांना प्रलोभनं देण्यात आली. मतदान केंद्र सुरक्षित नाहीत. भाजपा आणि मित्र पक्ष हा तमाशा करत असल्याचा आरोप सपकाळ यांनी केलाय. फोडाफोडीचं राजकारण यावेळी देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आपले उमेदवार बिनविरोध निवडणूक यावे याकरिता मोठ्या प्रमाणात सत्तेचा उपयोग केला जात आहे. मुख्यमंत्र्यपासून तर आमदारांच्या पीएपर्यंत हा संपूर्ण खेळ चालवला जातो असं देखील सपकाळ म्हणाले. राहुल नार्वेकर हे विधानसभा अध्यक्ष आहेत. त्यांनी आपल्या कुटुंबातील तीन लोकांना बिनविरोध निवडणुकीसाठी प्रयत्न केल्याचा आरोप सपकाळ यांनी केला.




नागपूरसाठी काँग्रेसचा जाहीरनामा : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची 20 सूत्रे

● मालमत्ता कर माफ - 500 चौ. फुटांपर्यंतच्या घरांसाठी मालमत्ता कर पूर्णतः माफ
● मोफत पाणीपुरवठा - 24x7 अखंड पिण्याच्या पाण्याचा पुरवठा आणि महिन्याला 30,000 लिटरपर्यंत पाण्यावर एकही रुपयाचे पाणीबिल नाही
● मोफत शहर बस प्रवास - आपली बसमध्ये जेष्ट नागरिक, विद्यार्थी, माजी सैनिक, स्वातंत्र्य संग्राम सैनिक आणि महिलांसाठी मोफर प्रवास
● बीपीएल धारकांसाठी मोफत आरोग्यसेवा - बीपीएल कुटुंबासाठी खासगी रुग्णालयांमध्ये मोफत ओपीडी आणि सर्व आवश्यक तपासणी सुविधा
● मोफत फ्रीहोल्ड - NMC व NIT मध्ये युवकांसाठी तात्पुरत्या रोजगार संधी
● स्वच्छ नागपूर -प्रत्येक घरातून दिवसातून दोन वेळा कचरा संकलन
● मोफत मालकी हक्क पट्टे - सर्व झोपडपट्टीधारकांना मोफत मालकी हक्काचे पट्टे
● दिव्यांगांसाठी मोफत साहित्य - दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी आवश्यक साधने, यंत्रसामग्री व साहित्य मोफत
● मोफत दुकाने -BPL कुटुंबांसाठी बाजारपेठांमध्ये मोफत दुकाने व ओट्टे
● युवकांना स्वयंरोजगार मोफत योजना - पदवीधर युवकांसाठी स्वयंरोजगार विशेष मोफत योजना
● युवकांना रोजगार - पदवीधर युवकांसाठी स्वयंरोजगार विशेष मोफत योजना
● खड्डे मुक्त रस्ते - शहरातील सर्व रस्ते पूर्णपणे खड्डेमुक्त करणे
● मोफत शिक्षण - मोफत शिक्षणासह 151 इंग्रजी माध्यमांच्या शाळांची स्थापना
● आर.एल. मंजुरी - आरक्षण जमिनीवरील सर्व अनधिकृत प्लॉट्सना आर.एल. मंजुरी
● वाहतूक कोंडीतून शहर पुर्णत: मुक्त - Intelligent & Integrated Traffic Management System & Comprehensive Mobility Plan यांच्या माध्यमातून वाहतूक कोंडीमुक्त शहर
● पुरमुक्त शहर - पूर व पाणी साचण्याच्या समस्येला कायमचा आळा
● डंपिंग यार्ड स्थलांतर - शहरातून भांडेवाडी डंपिंग यार्डचे कायमस्वरूपी स्थलांतर
● डासमुक्त शहर - डासमुक्त व आरोग्यदायी शहराची उभारणी
● सांडपाणी निराकरण - सांडपाणी समस्येचे संपूर्ण व कायमस्वरूपी निराकरण
● खाऊ गल्ल्या - 151 फेरीवाले आणि खाऊ गल्ल्यांची निर्मिती


हेही वाचा -

  1. उमेदवारी न मिळाल्यामुळे नागपूरमधील राजकीय पक्षांमध्ये उफाळला असंतोष; मनसेसह भाजपा पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
  2. नागपूर महानगरपालिका निवडणूक : राष्ट्रवादी काँग्रेसची 22 जागांची मागणी, पण भाजपाची 'वेट अँड वॉच' ची भूमिका
  3. नागपूर महापालिका निवडणुकीची आरक्षण सोडत जाहीर, 76 जागा महिलांसाठी राखीव, अनेक माजी नगरसेवकांचा पत्ता कट