भिक्षेकरी महिलेचा बलात्कार हत्या प्रकरणात आरोपी गजाआड; एआयच्या मदतीनं पोलिसांनी गुन्ह्याचा गुंता कसा सोडविला?
नागपूर ग्रामीण पोलिसांनी एआयचा वापर करून भिक्षेकरी महिलेच्या हत्या प्रकरणात अटक केली. या प्रकरणाचा पोलिसांनी कसा गुंता सोडविला, वाचा सविस्तर

Published : July 8, 2026 at 9:44 AM IST
|Updated : July 8, 2026 at 10:10 AM IST
नागपूर- एआयच्या मदतीनं अनेकांची कामे सोपी झाले आहेत. मात्र, त्यांचा वापर करून गंभीर गुन्ह्याची उकलदेखील करण्यासाठी मदत होत आहे. नागपूर ग्रामीण पोलिसांनी गंभीर आणि गुंतागुंतीच्या प्रकरणात आरोपीला अटक करण्यासाठी महाराष्ट्र मार्व्हेल एआयची मदत कशी घेतली, हे जाणून घ्या.
एखाद्या गवताच्या पेंडीतून सुई शोधण्याइतका बारीक तपास करत नागपूर ग्रामीण पोलिसांनी भिक्षेकरी महिलेवर झालेल्या बलात्कार आणि हत्येचा प्रकरणाचा उलगडा केलाय. मृतदेहाच्या शेजारी पडलेल्या चिप्स पॅकेटवरून पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. या तपास कार्यात पोलिसांनी (एआय) मदतीनं गुन्ह्याची उकल केली आहे. सुधाकर मंडपे असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे.
चिप्स पॅकेटच्या तुकड्यावरून आरोपीचा शोध:- घटनास्थळी पोलिसांना एक चिप्स पॅकेचा छोटा तुकडा आढळून आला. पोलिसांनी त्या भागात चिप्सच्या वितरकांना बोलावून घेतलं. या भागात गेल्या काही दिवसात चिप्स विकत घेतलेत का? ऑनलाइन पेमेंट केले का? याचा शोध सुरू केलेला होता. पाटणसावंगी ते खापरखेडाच्या दिशं तपास करावा लागेल, असा नागपूर ग्रामीण पोलिसांना तपासातून अंदाज आला.
52 हजार मोबाईल नंबरची तपासणी:- सावनेर पोलिसांनी अतिशय साधा-सोपा दिसून येत होता. मात्र, शवविच्छेदन अहवालानंतर या गुन्हाच्या तपासाची दिशाच बदलली. पोलिसांनी शेकडो सीसीटीव्हीचे फुटेज तपासले. त्याचबरोबर 52 हजार मोबाईल नंबरचीदेखील तपासणी करण्यात आली आहे.
घटनेची थोडक्यात हकीकतः-27 जून रोजी नागपूर (ग्रामीण) सावनेर पोलीस स्टेशन अंतर्गत मौजा पाटणसावंगी शिवारातील छत्रपाल इंगोले यांच्या शेतात एका अंदाजे 65 ते 70 वर्षाच्या एक भिक्षेकरी महिलेचा मृतदेह आढळून आलेला होता. सुरुवातीला पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. मृत महिलेच्या शवविच्छेदनानंतर महिलेवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करून तिचा खून केल्याची धक्कादायक माहीती समोर आल्यानंतर लगेच सावनेर पोलीस स्टेशन अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या (एआय) गुन्ह्याची उकल- या प्रकरणात मृत महिला ही पूर्णपणे अनोळखी असल्यानं त्याचबरोबर आरोपीबाबत कोणताही धागेदोरा, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार किंवा प्राथमिक पुरावा उपलब्ध नव्हता. त्यामुळे तपास हा अत्यंत गुंतागुंतीचा आणि आव्हानात्मक होता. या गुन्ह्याचं गांभीर्य आणि संवेदनशीलता लक्षात घेता ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींना शोधण्याकरिता विविध पथकाची स्थापना करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखा, सावनेर पोलीस स्टेशन, केळवद पोलीस स्टेशन आणि सायबर पोलीस स्टेशन येथील अधिकारी आणि अंमलदार यांनी परिश्रम घेऊन हा गुन्हा उघड केला आहे.या संपूर्ण तपासादरम्यान (मारवल) MARVEL (Maharashtra Research and Vigilance for Enhanced Law Enforcement) या कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या आधारे करण्यात आलेली महत्त्वाची कार्यवाही करण्यात आली. मृतक महिलेचा चेहरा सडलेल्या अवस्थेत असल्यामुळे तिची ओळख पटविण्यासाठी Marvel Al Photo Enhancement तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं तिच्या चेहऱ्याची पुनर्रचना (Face Reconstruction Reconstructed) करण्यात आली.
128 सीसीटीव्हींची तपासणी- तपासादरम्यान परिसरातील 182 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज बारकाईनं तपासण्यात आलं. घटनास्थळ आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आलं. पीपळा ते दहेगाव परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी दिसून आला. आरोपीचे फारच दूरचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध झाल्यानंतर Marvel Al Photo Enhancement तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं आरोपीच्या चेहऱ्याची आणि शारीरिक ठेवणीची (Face & Body Reconstruction) पुनर्रचना करण्यात आली. तसेच तांत्रिक विश्लेषणातून आरोपीचे लोकेशन नागपूर शहर परिसरात असल्याची माहिती प्राप्त झाली. आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या प्रत्यक्ष चेहऱ्याची Marvel Al Photo Enhancement द्वारे Reconstructed चेहऱ्याशी आणि शरिरीक रचनेची तुलना करण्यात आली असता सुमारे 85 टक्के साम्य दिसून आले.
आरोपीवर यापूर्वीदेखील गुन्हे दाखल- तब्बल 10 दिवसांनी भिक्षेकरी प्रकरणाचा छडा लागलेला आहे. नराधम आरोपीला अटक झाली असली तरी हत्या झालेल्या भिक्षेकरी महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही. धक्कादायक म्हणजे या अटकेतील आरोपीवर एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोपदेखील आहे. सावनेर पोलिसांनी अटक केलेला आरोपी विवाहित असून 2021 मध्ये त्याच्या विरुद्ध एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर गुन्हा दाखल झाला होता. याशिवाय त्याच्यावर विनयभंगाचे गुन्हेदेखील नोंद असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.
हेही वाचा-

