ETV Bharat / state

एक लाखाची सुपारी अन् पतीला पत्नीनेच संपवलं; 50 हजार रुपये दिले ॲडव्हान्स

नागपूरमध्ये पत्नीनेच आपल्या पतीच्या हत्येसाठी 1 लाखाची सुपारी दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे.

nagpur crime news
पतीची हत्या (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : July 4, 2026 at 4:09 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

नागपूर : चारित्र्यावर संशय घेऊन छळ करणाऱ्या पतीची पत्नीनेच एक लाख रुपयांची सुपारी देऊन हत्या केल्याची धक्कादायक घटना नागपूर शहरात घडली आहे. या प्रकरणाचा शिताफीने तपास करत पोलिसांनी मृताच्या पत्नीसह दोन आरोपींना अटक केली असून, तीन फरार आरोपींचा शोध सुरू आहे. मृताचं नाव गणेश ऊर्फ गुरुदेव प्रितमलाल बोरकर असं आहे, अशी माहिती सहायक पोलीस आयुक्त शिवप्रसाद पारवे यांनी दिली.

पत्नीसह मुख्य आरोपीला अटक : या प्रकरणात भांडेवाडी पोलिसांनी मृताची पत्नी मनीषा बोरकर आणि सुपारी घेणारा मुख्य आरोपी अभिजित पुरुषोत्तम साखरेला अटक केली आहे. तर अमन फैथवास, रोहित बोरकर आणि एक अल्पवयीन मुलगा फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. गणेश बोरकरची हत्या 2 जुलै रोजी करण्यात आली होती.

प्रतिक्रिया देताना सहायक पोलीस आयुक्त शिवप्रसाद पारवे (ETV Bharat Reporter)

हत्येनंतर दिशाभूल करण्याचा प्रयत्न : माहितीनुसार, मनीषाचा हा दुसरा विवाह होता. पहिल्या पतीपासून तिला 16 वर्षांची मुलगी आहे. पतीच्या हत्येनंतर मनीषा रडत पोलीस ठाण्यात गेली आणि पतीची कुणीतरी हत्या केल्याचा दावा केला. पोलिसांची दिशाभूल करून पुरावे नष्ट करण्याचा तिचा प्रयत्न होता. मात्र, तांत्रिक तपास आणि चौकशीच्या जोरावर पोलिसांनी तिचा बनाव उघडकीस आणला, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त शिवप्रसाद पारवे यांनी दिली.

मृतकावर अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप : मनीषाने 14 वर्षांपूर्वी गणेश बोरकर याच्याशी प्रेमविवाह केला होता. मात्र, गणेश हा कुख्यात गुन्हेगार असून तो तिच्या चारित्र्यावर संशय घेत सतत मारहाण करत असल्याचा तिनं आरोप केला. धक्कादायक म्हणजे, गणेशची मनीषाच्या पहिल्या पतीच्या मुलीवरही वाईट नजर होती. यापूर्वी त्याच्यावर एका बालिकेवर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला होता आणि डिसेंबर 2025 मध्ये तो कारागृहातून बाहेर आला होता. त्याच्या या विकृत स्वभावामुळं मुलीच्या जीवाला धोका असल्याचं ओळखून मनीषानं त्याला संपवण्याचा निर्णय घेतला.

हत्येसाठी 1 लाख दिली रुपयांची सुपारी : मनीषाने पतीच्या हत्येसाठी अभिजित साखरे आणि त्याच्या साथीदारांना एक लाख रुपयांची सुपारी दिली. त्यापैकी 50 हजार रुपये रोख आगाऊ देण्यात आले तर उर्वरित 50 हजार रुपये काम पूर्ण झाल्यावर देण्याचं ठरलं. ठरल्याप्रमाणे, अभिजित आणि त्याच्या तीन साथीदारांनी भांडेवाडी परिसरात गणेशला गाठून त्याचा खून केला.

हेही वाचा -

  1. प्रेमविवाह केलेल्या पत्नीनंच प्रियकराच्या मदतीनं काढला पतीचा 'काटा' : झोपत मृत्यू झाल्याचा रचला बनाव
  2. प्रियकराच्या मदतीनं पत्नीनं केला पतीचा खून: कोडवर्डचा केला वापर, पोलिसांनी असं उलगडलं खुनाचं गूढ
  3. विवाहित प्रेयसीनं लग्नाला दिला नकार: प्रियकरानं प्रेयसीच्या पतीच्या डोक्यात फावडा घालून केला खून