इन्स्टाग्रामवरून कॉल करत बोलावून अल्पवयीन मुलाची हत्या, विधीसंघर्षग्रस्त बालकाचा शोध सुरू
कथित प्रेमप्रकरणातून विधीसंघर्षग्रस्त बालकानं अल्पवयीन मुलाची मंगळवारी हत्या केली. या प्रकरणात पोलिसांकडून विधीसंघर्षग्रस्त बालकाचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

Published : May 6, 2026 at 10:01 PM IST
नागपूर- शहरातील कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाजपेयीनगर परिसरात हत्या प्रकरण समोर आलं आहे. एकतर्फी प्रेम प्रकरणात एका अल्पवयीन मुलाची हत्या झाली. एका अल्पवयीन मुलीशी असलेल्या मैत्रीच्या कारणावरून दोन अल्पवयीन मुलामध्ये झालेल्या वादाचे पर्यवसान हत्येच्या घटनेत झालं आहे. याप्रकरणी कळमना पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलाच्या हत्या प्रकरणात विधीसंघर्षग्रस्त बालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
मृताच्या आईनं दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या मुलाला रात्री इन्स्टाग्रामवरून विधीसंघर्षग्रस्त मुलानं कळमना हद्दीत असलेल्या मुलाला मैदानात भेटायला बोलावले होते. फिर्यादीचा मुलगा त्या ठिकाणी गेला असता,विधीसंघर्षग्रस्त बालकानं मुलाला ठार मारण्याच्या उद्देशानं त्याच्या गळ्यावर, डोक्यावर, कानाजवळ कोणत्या तरी धारदार शस्त्रानं मारुन जिवानिशी ठार केले. या प्रकरणी फिर्यादी दिलेल्या तक्रारीवरुन पोलीस ठाणे कळमना येथे विधीसंघर्षग्रस्त बालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीचा शोध सुरू:- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत आणि विधीसंघर्षग्रस्त बालक दोघे एकाच अल्पवयीन मुलीवर प्रेम करत होते. त्यातूनच निर्माण झालेल्या वादाचे रूपांतर
हत्येच्या घटनेत झाले आहे. विधीसंघर्षग्रस्त मुलानं हत्या केल्यानंतर पळ काढलाय. कळमना पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केल्याचं पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांनी सांगितलं.
इन्स्टाग्रामवर कॉल करून बोलावलं- मृत अल्पवयीन आणि संघर्षग्रस्त बालक हे एकाच अल्पवयीन मुलीच्या प्रेमात होते. अल्पवीयन हादेखील तिच्या प्रेमात असल्याचं विधीसंघर्षग्रस्त बालकाला काही दिवसांपूर्वीच समजले. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला.
विधीसंघर्षग्रस्त बालकानं अल्पववयीन मुलाला इन्स्टाग्रामवर फोन करून एका निर्जन ठिकाणी भेटायला बोलावलं. तिथे आल्यानंतर विधीसंघर्षग्रस्त बालकानं त्याच्यावर धारधार चाकूनं वार केले. त्यामुळे गंभीर जखमी झालेल्या अल्पवयीन मुलाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती समजताच कळमना पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी विधीसंघर्षग्रस्त बालकाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केलेला असून त्याचा शोध घेतला जात आहे. कळमना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांनी सांगितले की, मृत अल्पवयीन मुलगा आणि विधीसंघर्षग्रस्त बालक एकमेकांना ओळखत होते. ही हत्या प्रेमप्रकरणातून झाली आहे.

