ETV Bharat / state

नागपुरात भाजपाची मोठी कारवाई, पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्या 32 सदस्यांची 6 वर्षांसाठी हकालपट्टी

नागपुरात भाजपानं पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे. भाजपानं पक्षाची शिस्त मोडणाऱ्या 32 सदस्यांचं 6 वर्षांसाठी निलंबन केलं आहे.

Symbolic photo
प्रतिकात्मक फोटो (ETV Bharat File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : January 9, 2026 at 12:19 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

नागपूर : भारतीय जनता पक्षानं नागपुरातील 32 सदस्यांना 6 वर्षांसाठी निलंबित केलं आहे. महानगरपालिका निवडणुकीत शिस्त आणि पक्षनिष्ठा याला सर्वोच्च प्राधान्य दिलं आहे. तरीही, काही कार्यकर्ते पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात काम करत आहेत किंवा स्वतः निवडणूक लढवत आहेत. अशा स्थितीत पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी झाल्याचं कारण देत 32 सदस्यांना पक्षातून 6 वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं आहे.

पक्षातून निलंबित सदस्यांची नावं खालीलप्रमाणे :

  • प्रभाग 1 मधून: सुनिता महल्ले
  • प्रभाग 2: देवराज वासनिक
  • प्रभाग 3: नसिमाबानो
  • प्रभाग 4: सचिन खोब्रागडे व सुरेश टेंभरे
  • प्रभाग 5: महेन्द्र गुप्ता व पुष्पा किरपाने
  • प्रभाग 9: रुणाल चौहान
  • प्रभाग 14: सुनील अग्रवाल
  • प्रभाग 17: विनायक डेहनकर
  • प्रभाग 18: धीरज चव्हाण व अक्षय ठवकर
  • प्रभाग 19: प्रकाश घाटे व पापा यादव
  • प्रभाग 20: विशाल लारोकर
  • प्रभाग 21: शुभम मौदेकर, सुलोचना कोवे व राकेश भनारकर
  • प्रभाग 22: रविशंकर कुंभारे, दशरथ मस्के, आशिष भुते व नंदिनी भुते
  • प्रभाग 24: टेकचंद सोनबोईर, नंदु अहिर, रेणु गेंडरे, शुभम पडोळे व राजु घोसे
  • प्रभाग 26: सुनील मानापुरे
  • प्रभाग 31: सोनाली घोडमारे
  • प्रभाग 32: दिपक चौधरी
  • प्रभाग 34: आसावरी कोठीवान व सुनील मानेकर

'पक्षविरोधी कारवाई केलेल्यांची गय नाही' : या निलंबनाबाबत अधिक माहिती देताना भाजपा शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी स्पष्ट केलं की, "भारतीय जनता पार्टी हा शिस्तबद्ध कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. निवडणुकीच्या काळात पक्षाचा आदेश अंतिम मानला जातो. जो सदस्य पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचं काम करणार नाही किंवा पक्षाच्या विरोधात छुपी खेळी करेल, त्याची गय केली जाणार नाही.

आता या कारवाईनंतर, संबंधित व्यक्तीचा भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही कार्यक्रमाशी, पदाशी किंवा मोहिमेशी संबंध राहणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं. सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना अधिकृत उमेदवाराच्या विजयासाठी जोमानं काम करण्याचं आवाहनदेखील नागपूर भाजपाकडून करण्यात आलं आहे.

हेही वाचा