ETV Bharat / state

विरोधकांचा बिन'विरोध'! योग्य पायंडा म्हणत सत्ताधाऱ्यांनी केलं स्वागत, जाणून घ्या बिनविरोध उमेदवारांची संपूर्ण यादी

बिनविरोध निवडीवरुन राज्यातील वातावरण तापलं आहे. विरोधकांनी सरकार आणि निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली. बिनविरोध उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा...

Municipal Corporation Election 2026 unopposed
फाईल फोटो - महायुती आणि महाविकास आघाडी (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : January 3, 2026 at 3:54 PM IST

5 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई/नागपूर - राज्यात महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी अनेक ठिकाणी उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळं जवळपास ६७ नगरसेवक बिनविरोध जिंकले आहेत. या मुद्द्यावरुन विरोधकांनी सरकार तसंच निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल करत आरोप केलाय. इतक्या मोठ्या प्रमाणात बिनविरोध होत असतील तर मतदारांनी करायचं काय? असा सवाल विरोधकांनी विचारलाय.

सरकार, विरोधकांमध्ये जुंपली - बिनविरोध निवडीवरुन विरोधकांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. शिवसेना - उबाठा खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. "पंतप्रधान नरेंद्र मोदी, देशासह राज्यातील मोठे नेते सुद्धा बिनविरोध निवडून आले नाहीत, तर मग राज्यात इतक्या मोठ्या प्रमाणात बिनविरोध निवडून कसे आले?" असा सवाल संजय राऊत यांनी विचारला. विरोधकांच्या आरोपांना सत्ताधारी नेत्यांनीही उत्तर दिलं. "विकासाला प्राधान्य देत आमच्या विरोधातल्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळं हा चांगला पायंडा आहे," असं म्हणत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बिनविरोध निवडीचं स्वागत केलं.

प्रतिक्रिया देताना भाजपा नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (ETV Bharat Reporter)

बिनविरोध उमेदवारांची यादी -

1. कल्याण-डोंबिवली – वॉर्ड १८ मधून भाजपाच्या रेखा चौधरी

2. कल्याण-डोंबिवली – वॉर्ड २६ क मधून भाजपाच्या आसावरी नवरे

3. कल्याण-डोंबिवली – वॉर्ड २६ ब भाजपाच्या रंजना पेणकर

4. कल्याण-डोंबिवली – प्रभाग २४ ब मधून भाजपाच्या ज्योती पाटील

5. कल्याण-डोंबिवली – प्रभाग २७ अ मधून भाजपाच्या मंदा पाटील

6. कल्याण-डोंबिवली – प्रभाग २४ अ मधून शिवसेनेचे रमेश म्हात्रे

7. कल्याण-डोंबिवली – प्रभाग २४ ब मधून शिवसेनेचे विश्वनाथ राणे

8. कल्याण-डोंबिवली – प्रभाग २४ क मधून शिवसेनेच्या वृषाली जोशी

9. कल्याण-डोंबिवली – प्रभाग २८ अ मधून शिवसेनेचे हर्षल राजेश मोरे

10. कल्याण-डोंबिवली – प्रभाग २६ अ मधून भाजपाचे मुकुंद पेडणेकर

11. कल्याण-डोंबिवली – प्रभाग २७ ड मधून भाजपाचे महेश पाटील

12. कल्याण-डोंबिवली – प्रभाग १९ क मधून भाजपाचे साई शेलार

13. कल्याण-डोंबिवली – प्रभाग ११ अ मधून शिवसेनेच्या रेश्मा निचळ

14. कल्याण-डोंबिवली – प्रभाग २८ ब मधून शिवसेनेच्या ज्योती मराठे

15. कल्याण-डोंबिवली – प्रभाग २३ क मधून भाजपाच्या हर्षदा भोईर

16. कल्याण-डोंबिवली – प्रभाग २३ अ मधून भाजपाचे दीपेश म्हात्रे

17. कल्याण-डोंबिवली – प्रभाग २३ ड मधून भाजपाचे जयेश म्हात्रे

18. कल्याण-डोंबिवली – प्रभाग ३० अ मधून भाजपाच्या रविना माळी

19. कल्याण-डोंबिवली – प्रभाग २५ ड मधून भाजपाचे मंदार हळबे

20. कल्याण- डोंबिवली- प्रभाग 19 ब मधून भाजपाच्या डॉ.सुनिता पाटील

21. कल्याण- डोंबिवली- प्रभाग 19 अ भाजपाच्या पूजा म्हात्रे

22. पनवेल – वॉर्ड क्र १८ ब मधून भाजपाचे नितिन पाटील

23. पनवेल – प्रभाग १८ ब मधून भाजपाचे नितिन पाटील

24. पनवेल – प्रभाग १९ ब मधून भाजपाच्या रूचिरा लोंढे

25. पनवेल – प्रभाग २० अ मधून भाजपाचे अजय बहिरा

26. पनवेल – प्रभाग १९ अ मधून भाजपाच्या दर्शना भोईर

27. पनवेल – प्रभाग २० ब मधून भाजपाच्या प्रियांका कांडपिळे

28. पनवेल – प्रभाग १८ अ मधून भाजपाच्या ममता म्हात्रे

29. पनवेल – प्रभाग १८ क मधून भाजपाच्या स्नेहल ढमाले

30. ठाणे – प्रभाग १८ ब मधून शिवसेनेच्या जयश्री फाटक

31. ठाणे – प्रभाग १८ क मधून शिवसेनेच्या सुखदा मोरे

32. ठाणे – प्रभाग १७ अ मधून शिवसेनेच्या एकता भोईर

33. ठाणे – प्रभाग १८ ड मधून शिवसेनेचे राम रेपाळे

34. ठाणे – प्रभाग १४ अ शिवसेनेच्या शीतल ढमाले

35. ठाणे – शिवसेनेचे जयश्री डेव्हिड

36. ठाणे – प्रभाग ५ अ मधून शिवसेनेच्या सुलेखा चव्हाण

37. भिवंडी – प्रभाग १७ अ मधून भाजपाचे सुमित पाटील

38. भिवंडी – प्रभाग १६ अ मधून भाजपाचे परेश चौगुले

39. भिवंडी – प्रभाग १८ ब मधून भाजपाच्या दीपा मढवी

40. भिवंडी – प्रभाग १८ अ मधून भाजपाच्या अश्विनी फुटाणकर

41. भिवंडी – प्रभाग १८ क मधून भाजपाचे अबू साद लल्लन

42. भिवंडी – प्रभाग २३ ब मधून भाजपाच्या भारती चौधरी

43. धुळे – वॉर्ड क्र १ मधून भाजपाच्या उज्ज्वला भोसले

44. धुळे – प्रभाग ६ ब मधून भाजपाच्या ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील

45. धुळे – प्रभाग १७ मधून भाजपाच्या सुरेखा उगले़

46. अहिल्यानगर – प्रभाग ८ ड मधून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे कुमार वाकळे

47. अहिल्यानगर - प्रभाग १४ अ मधून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रकाश भागानगरे

48. अहिल्यानगर – प्रभाग 7 ब मधून भाजपाचे अनिल बोरूडे

49. अहिल्यानगर- प्रभाग 2 ड मधून भाजपाचे करण कराळे

50. अहिल्यानगर- प्रभाग 2 ब मधून भाजपाच्या सोनाबाई शिंदे

51. जळगाव – प्रभाग ९ ब मधून शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रतिभा देशमुख

52. जळगाव – प्रभाग ७ अ मधून भाजपाचे विशाल भोळे

53. जळगाव – प्रभाग ७ अ मधून भाजपाच्या दीपमाला काळे

54. जळगाव – प्रभाग १६ अ मधून भाजपाचे डॉ वीरेन खडके

55. जळगाव – भाजपच्या वैशाली पाटील

56. जळगाव – भाजपाच्या अंकिता पाटील

57. जळगाव – शिवसेनेच्या रेखा पाटील

58. जळगाव – शिवसेनेचे विक्रम सोनवणे

59. जळगाव – शिवसेनेचे मनोज चौधरी

60. जळगाव – शिवसेनेचे सागर सोनवणे

61. जळगाव – प्रभाग १२ ब मधून भाजपाच्या उज्ज्वला बेंडाळे

62. जळगाव – प्रभाग १८ अ मधून शिवसेनेचे गौरव सोनवणे

63. पुणे – प्रभाग ३५ मधून भाजपाच्या मंजुषा नागपुरे

64. पुणे – प्रभाग ३५ ड मधून भाजपाचे श्रीकांत जगताप

65. पिंपरी-चिंचवड – प्रभाग ६ ब मधून भाजपाचे रवी लांडगे

66. पिंपरी-चिंचवड – प्रभाग १० ब मधून भाजपाच्या सुप्रिया चांदगुडे

67. मालेगाव – वॉर्ड ६ क मधून इस्लाम पार्टीच्या मुनिरा शेख फकीर मोहम्मद

कोणत्या महानगरपालिकेत कोणाचे किती बिनविरोध झाले? -

  • कल्याण -डोंबिवली महापालिका- 21

भाजपा - 15

शिवसेना - 6

एकूण - 21

  1. पनवेल महापालिका - 8

भाजपा- 8

एकूण - 8

  • ठाणे महापालिका- 7

शिवसेना - 7

एकूण- 7

  • भिवंडी महापालिका- 6

भाजपा- 6

एकूण - 6

  • धुळे महापालिका - 3

भाजपा- 3

एकूण - 3

  • अहिल्यानगर महापालिका- 5

भाजपा- 3

राष्ट्रवादी - 2

एकूण - 5

  • जळगाव महापालिका- 12

भाजपा- 6

शिवसेना - 6

एकूण -12

  • पुणे महापालिका - 2

भाजपा - 2

एकूण - 2

  • पिंपरी-चिंचवड महापालिका - 2

भाजपा - 2

एकूण - 2

  • मालेगाव महापालिका - 1

इस्लाम पार्टी - 1

राज्यातील इतिहासात प्रथमच? - राज्यामध्ये यापूर्वी इतक्या मोठ्या प्रमाणात उमेदवारांनी अर्ज मागे घेतलेले नाहीत. या बिनविरोध विजयी नगरसेवकांमध्ये महायुतीचे सर्वाधिक नगरसेवक आहेत. यामध्ये भाजपाचे ४५, शिवसेना १९ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या २ नगरसेवकांचा समावेश आहे. या विषयावर भाजपाचे नेते आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. "निवडणूक आयोगाला चौकशी करू द्या, जे सत्य असेल ते पुढे येईल," असं बावनकुळे म्हणाले.

त्यामुळे उमेदवार बिनविरोध झाले :- बावनकुळे - "या संदर्भात चौकशी केलीच पाहिजे. अनेक उमेदवार बिनविरोध निवडून आले. त्यामध्ये आमचे ४४, तर एकनाथ शिंदे व अजित पवारांचे खालोखाल उमेदवार आहेत. सर्वाधिक महायुतीचेच उमेदवार बिनविरोध झालेत, कारण आमच्या विरोधात जे उभे राहिले होते त्यांनाही कळलं आहे की आमच्याबरोबर राहिल्यास विकासाचं राजकारण होईल. डबल इंजनच्या माध्यमातून विकास होईल," बिनविरोध निवडीबाबतचे हे कारण सांगत चंद्रशेखर बावनकुळे यांनी निवडून आलेल्यांचं एकप्रकारे स्वागतच केलं.

हा चांगला पायंडा आहे - "कोणी कोणावरही दबाव टाकेल आणि कोणी उमेदवारी मागे घेईल, असं महाराष्ट्रात होत नाही. महाराष्ट्र हा प्रगल्भ आहे. ज्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतले, त्यांनी विकासाच्या मुद्द्याला प्राधान्य देत अर्ज मागे घेतले आहेत. हा चांगला पायंडा आहे. असाच पायंडा राज्यात असायला पाहिजे. विकासाला यामुळं चालना मिळते. बिनविरोध झाले त्या उमेदवारांना शुभेच्छा देताना एक लक्षात ठेवलं पाहिजे की, ज्या उमेदवारांनी त्यांना मदत केली आहे, त्यांना आपल्यासोबत घ्यावं," असं आवाहन करत चंद्रशेखर बावनकुळे यांनी बिनविरोध निवडीचं स्वागत केलं.

दहशत आणि कुटील राजकारण : काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांच्या मते, "स्थानिक पातळीवर सत्ताधारी पक्ष दबाव टाकत उमेदवारी अर्ज मागे घेण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न करतात. कोणत्याही थराला जाऊन विरोधकांना कसं हरवायचं, लोकशाही कशी हायजॅक करायची हाच विचार सध्या भाजपा करत आहे." "बिहार मतदानाच्या दिवशी पहिली फेरी संपली तरी पैसे वाटप झाले. दहशत आणि कुटील राजकारण हाच भाजपाचा सत्ता मिळवण्याचा रस्ता आहे. लोकशाही धोक्यात आहे. याविरोधात जनतेने उभं राहिलं पाहिजे, लढा दिला पाहिजे," असं सचिन सावंत म्हणाले.

सत्ताधारी पक्षांचा पलटवार : याला उत्तर देताना शिवसेना प्रवक्ते अरूण सावंत यांनी त्या त्या ठिकाणी असलेल्या परिस्थितीवरून निवडणुकांच्या अर्जाची आणि उमेदवारांच्या निवडीची प्रक्रिया ठरत असते, असं सांगितलं. मागील निवडणुका महायुती जिंकत आहे याचा अर्थ मतदारांचं महायुतीवर प्रेम आहे असाच होतो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाची पावतीच यातून मिळत असल्याचं अरूण सावंत सांगतात. तसेच भाजपा प्रवक्ते नवनाथ बन यांच्या मते, "भाजपाच्या विकासाच्या राजकारणाला जनतेचा पाठींबा असल्याचं हे प्रतीक आहे. काँग्रेसने भाजपावर टीका करण्यापेक्षा स्वतःचं काम नीट करावं आणि आपले उमेदवार कसे जिंकून येतील यावर लक्ष द्यावं."

हेही वाचा -

  1. 66 उमेदवार बिनविरोधी कसे निवडून येतात? संजय राऊतांचा थेट सवाल, निवडणूक आयोगावरही केली टीका
  2. नवी मुंबईत भाजपानं उधळला गुलाल; पनवेल महापालिकेत भाजपाचे 6 उमेदवार बिनविरोध
  3. कल्याण-डोंबिवलीत युतीचे २० उमेदवार बिनविरोध, पुण्यात भाजपानं विजयाचं खातं उघडलं, लोकशाही संपली म्हणत मनसेची टीका