ETV Bharat / state

पावसाळ्यात जीर्ण इमारती ठरतायेत जीवघेण्या! मुंबईतील इमारती कोसळलेल्या मोठ्या घटना

मानखुर्द येथील हनुमान मंदिराच्या पाठीमागे असलेल्या जनता नगरमधील एका चाळीचे तीन मजले कोसळले. या दुर्घटनेमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला.

Major Buildings Collapses incidents in Mumbai
मानखुर्द चाळ दुर्घटना (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : July 7, 2026 at 8:18 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरू आहे. मुंबईत दरवर्षी पावसामुळं घरांची, इमारतीची पडझड झाल्याच्या अनेक घटना घडतात. मुंबईत अनेक इमारती जीर्ण अवस्थेत शेवटची घटका मोजत असल्याचं चित्र पहावयास मिळतं. तसंच अनेक झोपड्या धोकादायक अवस्थेत आहेत. त्यामुळं पावसाळ्यात अशा जीर्ण इमारती जीवघेण्या ठरतात. गेल्या रविवारीच (5 जुलै) मुंबईच्या मानखुर्द परिसरात मन सून्न करून टाकणारी घटना घडली. मानखुर्द येथील हनुमान मंदिराच्या पाठीमागे असलेल्या जनता नगरमधील एका चाळीचे तीन मजले कोसळले. या दुर्घटनेमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर मुंबईत आतापर्यंत अशा घडलेल्या घटनांची माहिती जाणून घ्या....

मानखुर्दमध्ये चाळीचे तीन मजले कोसळले (PTI)

मुंबईतील इमारती कोसळलेल्या मोठ्या घटना...

  • 05-07-2026 : मुंबईतील मानखुर्द येथील हनुमान मंदिराच्या पाठीमागे असलेल्या जनता नगरमधील एका चाळीचे तीन मजले कोसळले. या दुर्घटनेमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळं आतापर्यंत मुंबईतील सुरु असलेल्या पावसाळ्यातील एकूण मृतांची संख्या दहावर पोहोचली आहे. प्राथमिक माहितीनुसार, मानखुर्द येथील घटनेतील मृतांमध्ये एका महिलेचा आणि तिच्या मुलांचा, तसंच त्यांच्या घरी आलेल्या शेजारच्या मुलांचा समावेश आहे.
  • 27-8-2025 : मुंबईतील विरार पूर्व भागात चार मजली इमारत कोसळल्यानं 17 जणांचा मृत्यू झाला होता, तर 9 जण जखमी झाले होते. ही घटना नारंगी परिसरातील रमाबाई अपार्टमेंट्समध्ये घडली होती. या घटनेत एनडीआरएफ, पोलीस आणि अग्निशमन दलानं राबवलेल्या बचावकार्यात 24 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली होती.
  • 27-07-2024 : नवी मुंबईतील बेलापूर भागात पहाटेच्या सुमारास एक जुनी इमारत कोसळली होती. या घटनेत तिघांचा मृत्यू झाला होता, तर दोघे जखमी झाले होते. दरम्यान, या इमारतीला तडे गेल्याचं लक्षात आल्यानंतर, ती कोसळण्यापूर्वीच प्रशासनानं 52 रहिवाशांना (ज्यामध्ये 13 मुलांचा समावेश होता) सुरक्षितपणे बाहेर काढलं होतं; अन्यथा जीवितहानीची संख्या खूप जास्त असू शकली असती.
  • 20-07-2021 : ठाण्यातील कळवा भागात दरड कोसळल्यामुळं एका इमारतीची पडझड होऊन चार महिलांसह पाच जणांचा मृत्यू झाला होता. ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत चार महिला आणि एका पुरुषाचा मृत्यू झाला होता, तर ढिगाऱ्याखालून अन्य दोन जणांची सुटका करण्यात आली होती.
  • 23-07-21 : मुंबईतील गोवंडी भागात इमारत कोसळल्यानं तिघांचा जागीच मृत्यू झाला होता. तसंच या दुर्घटनेत इतर 10 जण जखमी झाले होते.
  • 10-06-21 : मुंबईतील मालाडमध्ये इमारत कोसळण्याची दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला होता. यात 8 मुलांचा समावेश होता. दरम्यान, या घटनेतील पीडितांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली होती.
  • 21-06-2020 : ठाणे जिल्ह्यातील पटेल कंपाऊंड भागात भिवंडी येथील तीन मजली इमारत कोसळली होती. यावेळी झालेल्या दुर्घटनेत एनडीआरएफनं इमारतीच्या ढिगाऱ्याखालून एकूण 41 मृतदेह बाहेर काढले होते. तर 25 जणांना सुखरूप बाहेर काढले होतं.
  • 31-08-2021 : दक्षिण मुंबईतील दाटीवाटीच्या भेंडी बाजार भागात 117 वर्षे जुनी 'हुसैनी' इमारत कोसळल्यामुळं 24 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. ही इमारत 'सेस' श्रेणीतील होती.
  • 25-07-2017 : मुंबईतील घाटकोपर (पश्चिम) येथील एलबीएस मार्गावर 'सिद्धी साई अपार्टमेंट' ही चार मजली इमारत कोसळली होती. या घटनेत 17 जणांचा मृत्यू झाला होता.
  • 04-08-2015 : ठाणे रेल्वे स्थानकाजवळ 50 वर्षे जुनी इमारत कोसळली होती. या घटनेत एकाच कुटुंबातील चौघांसह 11 जण ठार झाले होते, तर सात जण जखमी झाले होते.
  • 27-09-2013 : मुंबई शहरातील माझगाव भागात पाच मजली इमारत कोसळली होती. या दुर्घटनेत जवळपास 61 जणांचा मृत्यू झाला होता. तर 32 जण जखमी झाले होते.

हेही वाचा :

  1. 'काँग्रेसनं बांधलेल्या सी लिंकला काहीच झालं नाही, मिसिंग लिंकची घटना हा 55 टक्के भ्रष्टाचाराचा परिणाम'-नाना पटोले
  2. लोकभवन परिसरात तैनात असलेल्या एसआरपीएफच्या जवानाचा मृत्यू; आत्महत्या केल्याचा संशय
  3. कृष्णा नदीच्या वाढत्या पाण्यामुळे नृसिंहवाडीत पहिला दक्षिण द्वार सोहळा संपन्न; दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी