ETV Bharat / state

'बांबू कसा लावायचा आम्हाला सांगत चला'; खासदार अशोक चव्हाण यांचा टोमणा कोणाला?

खासदार अशोक चव्हाण यांनी शेतकरी नेते पाशा पटेल यांना टोमणा लगावला आहे.

Ashok Chavan on pasha patel
फाईल फोटो - खासदार अशोक चव्हाण (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : February 23, 2026 at 7:34 AM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

नांदेड - माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी शेतकरी नेते पाशा पटेल यांना टोमणा लगावला आहे. रविवारी नांदेड शहरातील शंकरराव चव्हाण प्रेक्षकगृहात पार पडलेल्या एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात अशोक चव्हाण बोलत होते. "पाशा पटेल यांच्याकडे बांबू लागवड मिशन आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना विशेष जवाबदारी दिली आहे, पण अधून मधून ते राजकीय बांबू लावत असतात," असं वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थित नागरिकांसह मान्यवरामध्ये एकच हशा पिकला. कार्यक्रमाला पाशा पटेल यांच्यासह सर्वपक्षीय स्थानिक नेते आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

रविवारी शहरातील शंकरराव चव्हाण प्रेक्षकगृह येथे पार पडलेल्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात राजकीय रंगत पाहायला मिळाली. माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी आपल्या खास शैलीत शेतकरी नेते पाशा पटेल यांना टोला लगावत उपस्थितांमध्ये एकच हशा पिकवला.

बांबू लावायचा आम्हाला शिकवा - पाशा पटेल यांच्याकडे बांबू लागवड मिशनची जबाबदारी आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर ही विशेष जबाबदारी सोपवली आहे. याच संदर्भाचा धागा पकडत अशोक चव्हाण म्हणाले, “पाशा पटेल अधूनमधून राजकीय बांबू लावत असतात, पण तो बांबू कसा लावायचा हे आम्हालाही सांगत चला.” त्यांच्या या मिश्कील वक्तव्यामुळे सभागृहात उपस्थित नागरिक, कार्यकर्ते आणि मान्यवरांमध्ये जोरदार हशा पिकला.

नवा राजकीय संवाद रंगण्याची शक्यता - कार्यक्रमाला सर्वपक्षीय स्थानिक नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजकीय टोलेबाजी असली तरी वातावरण हलकं-फुलकं आणि मैत्रीपूर्ण असल्याचे चित्र पाहायला मिळाले. अशोक चव्हाण यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली असून, आगामी काळात या वक्तव्यावरून नवा राजकीय संवाद रंगण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा -

  1. 'हवेत गोळीबार नको’; विरोधकांना अधिवेशनात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं खुलं आव्हान
  2. काँग्रेस हा नात्या गोत्याचा पक्ष; खासदार अशोक चव्हाण यांची काँग्रेसवर टीका