ETV Bharat / state

मोबाईल व्यसनावर अनोखा उपाय; मोबाईल-टीव्ही बंद, पुस्तकांशी नातं जुळलं, सायरन वाजताच सगळं बंद करुन मुलं बसतात अभ्यासाला

मोबाईलच्या आहारी जाण्यापासून मुलांना रोखणं हे पालकांसाठी प्रचंड आव्हानात्मक झालं आहे. मात्र, बीडच्या नागापूर गावानं (Nagapur Village) यावर अनोखा तोडगा शोधून काढलाय.

Nagapur  Village
परळी तालुक्यातील नागापूर गावातील विद्यार्थी (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : January 5, 2026 at 3:13 PM IST

|

Updated : January 5, 2026 at 8:23 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

बीड : मोबाईल आता काळाची गरज झाली आहे. कोणतंच काम मोबाईलशिवाय पूर्ण होणं आता शक्य नाही. एकंदरीतच काय तर, मोबाईल आज प्रत्येकाच्या आयुष्यात फार महत्त्वाचा घटक झाला आहे. सध्याच्या डिजिटल युगाच्या विळख्यात अडकलेली तरुण पिढी आणि मोबाईलच्या व्यसनामुळं अभ्यासापासून दूर जाणारे विद्यार्थी ही मोठी चिंतेची बाब बनली आहे. मात्र, बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील नागापूर या गावानं यावर एक अनोखा तोडगा शोधला आहे.

‘अभ्यासासाठी सायरन’नं घडवली शैक्षणिक क्रांती : 'अभ्यासासाठी सायरन' हा उपक्रम राबवून या गावानं संपूर्ण जिल्ह्यात शैक्षणिक क्रांतीची नवी मशाल पेटवली आहे. दुर्गम भागात असलेल्या नागापूर ग्रामपंचायतीनं पुढाकार घेऊन गावात दररोज संध्याकाळी 7 ते 9 या वेळेत सायरन वाजवण्याची पद्धत सुरू केली. सायरन वाजताच गावातील प्रत्येक घरातील टीव्ही बंद केले जातात आणि मोबाईल फोन देखील बंद करून बाजूला ठेवले जातात. हा 2 तासांचा वेळ केवळ आणि केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. या उपक्रमाची संकल्पना उपसरपंच संतोष सोळंके यांच्या पुढाकारातून मांडण्यात आली. सांगली जिल्ह्यात यशस्वी झालेल्या प्रयोगापासून प्रेरणा घेऊन त्यांनी नागापूरमध्ये हा बदल घडवण्याचं ठरवलं. त्यांनी गावकरी आणि शाळेतील शिक्षक मुख्याध्यापक यांची बैठक घेऊन हा निर्णय घेतला आणि त्यांचा निर्णय देखील सर्वांना आवडला.

बीडच्या नागापूर गावात 'अभ्यासासाठी सायरन' (ETV Bharat Reporter)

सायरन संस्कृती मुलांचं भविष्य उज्ज्वल करणारी : हा उपक्रम केवळ नावापुरता राहू नये, यासाठी गावानं एक 'देखरेख समिती' स्थापन केली आहे. समितीचे सदस्य आठवड्यातून दोनदा विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करतात. जे विद्यार्थी नियमितपणे अभ्यास करतात, त्यांना शालेय साहित्याचं वाटप करून प्रोत्साहित केलं जातं. आधी ज्या मुलांना अभ्यासाला बसवण्यासाठी ओरडावं लागत होतं, ती मुलं आता सायरनचा आवाज ऐकताच स्वतःहून पुस्तक घेऊन बसतात. दरम्यान पाहायला गेलं तर नागापूरनं दाखवलेली ही वाट जिल्ह्यातील इतर गावांसाठी दीपस्तंभ ठरेल. अभ्यासाची ही सायरन संस्कृती मुलांचं भविष्य उज्ज्वल करणारी ठरेल, अशी सर्वांनाच आशा आहे.

हेही वाचा -

  1. 'मी 21 व्या वर्षी कलेक्टर होणारच' विद्यार्थ्यांच्या घरातल्या भिंती घेतात स्वप्नांचा श्वास, विद्या मंदिर चाळणवाडी शाळेची ‘लोकल टू ग्लोबल’ भरारी
  2. शिकायला शाळेत या अन् शौचालयाला घरी जा! बीडच्या जिल्हा परिषद शाळेची दुरवस्था
  3. कौस्तुकास्पद! दोन शिक्षकांनी बनवली जिल्हा परिषदेची शाळा जगात नंबर वन
Last Updated : January 5, 2026 at 8:23 PM IST