ETV Bharat / state

एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात राज ठाकरेंचा झंझावाती रोड शो: रस्त्यावर 'एकच ब्रँड ठाकरे ब्रँड'च्या घोषणा

मनसे प्रमुख राज ठाकरे कल्याण डोंबिवली नंतर आज एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात दाखल झाले. ठाण्यात राज ठाकेर यांचा झंझावाती रोड शो पार पडला.

Raj Thackeray Road Show In Thane
राज ठाकरे यांचा झांजवती रोड शो (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : January 8, 2026 at 10:50 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

ठाणे : महानगरपालिका निवडणूक प्रचार करण्यासाठी राज ठाकरे कल्याण डोंबिवली नंतर ठाण्यात दाखल झाले. त्यांनी ठाण्यातील उबाठा आणि मनसेच्या उमेदवारांसाठी रोड शो केला. यावेळी बाईक रॅली काढत हजारो कार्यकर्ते राज ठाकरे यांच्यासोबत सहभागी झाले होते. कोपरी अष्टविनायक चौक आणि बाजारपेठ मार्गे चरई खोपट माजीवडा येथे राज ठाकरे रोड शो करत पोहोचले. या रोड शोमुळे ठाण्यातील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील झालेली होती.

Raj Thackeray Road Show In Thane
राज ठाकरे यांचा झांजवती रोड शो (ETV Bharat Reporter)

राज ठाकरे यांना पाहण्यासाठी ठाणेकरांची गर्दी : ठाण्यातल्या उमेदवारांसाठी आजचा राज ठाकरे यांचा हा खास रोडशो होता. या रोडशोमध्ये उबाठाच्या अनेक शाखांमध्ये राज ठाकरे जाऊन हजेरी पुस्तिकेवरती सही देखील करत होते. यावेळी राज ठाकरे यांना पाहण्यासाठी ठाणेकरांनी गर्दी केली. लहान थोर अबाल वृद्ध देखील यावेळी रॉड शो मधील राज ठाकरेंना पाहात होते. राज ठाकरे यांनी 16 शाखांना भेट दिली. काही ठिकाणी कार्यालयांची उद्घाटनं देखील राज ठाकरे यांनी केली.

Raj Thackeray Road Show In Thane
राज ठाकरे यांचा झांजवती रोड शो (ETV Bharat Reporter)

आनंद दिघेंना अभिवादन : राज ठाकरे आणि ठाण्यातील दिवंगत नेते आनंद दिघे यांची चांगली मैत्री होती. ठाण्यात रोड शो दरम्यान राज ठाकरे आल्यानंतर टेंभी नाक्यावरील आनंद आश्रमासमोर आनंद दिघे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून राज ठाकरे पुढे रोड शो साठी निघाले. या शो मध्ये उबाठा नेते कार्यकर्त्यांसह सहभागी झाले होते. या रोड शो मुळे मनसे आणि उबाठा कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करण्याचे काम केले.

शिवसेनाप्रमुखांनी उद्घाटन केलेल्या शाखेला दिली भेट : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उद्घाटन केलेल्या चरई येथील शिवसेनेच्या शाखेला राज ठाकरे यांनी भेट दिली. 1986 साली शाखेचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी धर्मवीर आनंद दिघे यांच्या आठवणींना उजाळा मिळाला. याप्रसंगी शिवसेना नेते, माजी खासदार राजन विचारे, ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे उपस्थित होते.

'एकच ब्रँड ठाकरे ब्रँड' च्या घोषणेनं ठाणे दुमदुमलं : माजीवाडा येथून बाईक रॅलीला सुरूवात झाली. कोपरी येथील मनसेचे उमेदवार सविता चव्हाण आणि राजश्री नाईक यांच्या कार्यालयाचं उद्घाटन राज ठाकरे यांनी केलं. यावेळी "एकच ब्रँड ठाकरे ब्रांड", उद्धव ठाकरे, राज ठाकरे आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा जोरदार घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.

हेही वाचा :

  1. देवेंद्र फडणवीस नागपूरचे, त्यांना मुंबईचे प्रश्न कुठे कळतात? मूळ मुंबईकरांचा मुद्दा उपस्थित करत राज ठाकरेंचा सवाल
  2. नाशिकमध्ये 9 जानेवारीला ठाकरे बंधूंची एकाच व्यासपीठावरून तोफ धडाडणार!
  3. 'शब्द ठाकरेंचा' शिवसेना-मनसे-राष्ट्रवादीचा वचननामा जाहीर, घोषणेच्या वेळी राष्ट्रवादीची सावध भूमिका