स्वातंत्र्यदिनी रायगडमध्ये ध्वजारोहण कोण करणार? मंत्री भरत गोगावले यांनी थेटच सांगितलं
गेल्या काही दिवसांपासून रायगडचा पालकमंत्री कोण? हा प्रश्न विचारला जात आहे. यावर मंत्री भरत गोगावले यानी स्पष्टच सागितलं.

Published : July 3, 2026 at 3:40 PM IST
मुंबई - रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा ति़ढा अजून सुटलेला नाही. गोगावले विरुद्ध तटकरे असा हा सामना मागील काही वर्षांपासून रायगडमध्ये रंगत आहे. अशातच येत्या 15 ऑगस्टला झेंडावंदन कोण करणार यावरुन चर्चा सुरू झाली आहे. मंत्री भरत गोगावले यांनी याबाबतच थेट उत्तर 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिलं. 15 ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्यदिनाला रायगड जिल्ह्याचा झेंडावंदन भरतशेठ गोगावलेच करणार, असा विश्वास भरत गोगावले यांनी व्यक्त केला.
रायगडचा पालकमंत्री कोण? - गेल्या काही दिवसांपासून रायगडचा पालकमंत्री कोण? हा प्रश्न विचारला जात आहे. अनिकेत तटकरे यांना विधान परिषदेची आमदारकी मिळाल्यानंतर भरत गोगावले हेच रायगडचे पालकमंत्री होतील, असे म्हटले जात होते. याविषयी बोलताना भरत गोगावले यांनी रायगडचा पालकमंत्री मीच असणार, असा आत्मविश्वास ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केला.
पूर्वीच्या रोजगार हमी योजनेमध्ये 266 कामं होती. मात्र, आता या नवीन योजनेमध्ये 318 कामं समाविष्ट करण्यात आली आहेत. पूर्वी 296 रुपये दिले जात होते, आता 317 रुपये दिले जाणार आहेत. महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांपैकी मुंबई आणि ठाणे हे दोन जिल्हे सोडले तर 34 जिल्ह्यांमध्ये ही रोजगार हमी योजना राबवली जाणार आहे. ग्रामपंचायत इमारती, अंगणवाडी, शाळा, गृह, स्मशानभूमी, बंधारे, बांध दुरुस्ती, शेळीपालन, कुक्कुटपालन अशी सर्व कामं या योजनेमध्ये राबवली जाणार असल्याचे मंत्री भरत गोगावले म्हणाले.
सव्वाशे दिवसांचा रोजगार मिळणार - पूर्वी शंभर दिवसांचा रोजगार हा सर्वसामान्य मिळत होता. मात्र, आता या योजनेतून सव्वाशे दिवसांचा रोजगार मिळणार असल्याचेही ते म्हणाले. "कॅबिनेटमध्ये हा विषय मंजूर झाला असून, या विषयाच्या कार्यशाळा लवकरच सुरू होणार आहेत. येत्या मंगळवारी विधानभवनात याची कार्यशाळा घेण्याचं ठरवण्यात आलं आहे. केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी उत्तर प्रदेशमध्ये या योजनेचा शुभारंभ जरी केला असला तरी महाराष्ट्रामध्ये नक्कीच या योजनेचा मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्यांना लाभ घेता येणार आहे," असेही भरत गोगावले म्हणाले.
हेही वाचा -

