Bihar Election Results 2025

ETV Bharat / state

छगन भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित 'ज्ञानोत्सवास' अनेक दिग्गजांची उपस्थिती!

मंत्री छगन भुजबळ यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा म्हणून फुलं, गुच्छ व इतर भेट वस्तू न देता पुस्तकं द्यावीत, असं आवाहन करण्यात आलं होतं.

Many luminaries attended the 'Gyanotsav' organized on the occasion of Chhagan Bhujbal's birthday!
छगन भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त 'ज्ञानोत्सवास' (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : October 15, 2025 at 7:50 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

नाशिक : राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या 78 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित ज्ञानोत्सवास राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह विविध क्षेत्रांतील दिग्गजांनी उपस्थिती लावत छगन भुजबळ यांचं अभीष्टचिंतन केलं. या ज्ञानाच्या भेटीच्या उत्सवाच्या निमित्तानं राज्यभरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, हितचिंतकांकडून हजारोंच्या संख्येनं पुस्तकं भेट स्वरूपात छगन भुजबळ यांना देण्यात आली. त्यामुळं यंदाचा त्यांचा वाढदिवस हा केवळ शुभेच्छांचा कार्यक्रम न राहता ज्ञान आणि संस्कारांचा उत्सव ठरला.

Many luminaries attended the 'Gyanotsav' organized on the occasion of Chhagan Bhujbal's birthday!
छगन भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त 'ज्ञानोत्सवास' (ETV Bharat Reporter)

विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती : मंत्री छगन भुजबळ यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा म्हणून फुलं, गुच्छ व इतर भेट वस्तू न देता पुस्तकं द्यावीत, असं आवाहन करण्यात आलं होतं. या आवाहनास राज्यभरातील हितचिंतकांनी मोठा प्रतिसाद दिला. त्यामुळं आजचा हा ज्ञानोत्सव अतिशय अविस्मरणीय ठरला. नाशिक भुजबळ फार्म येथील कार्यालयात राज्यभरातील हितचिंतकानी मोठ्या प्रमाणात शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली. यावेळी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देखील मदत करण्यात आली.

Many luminaries attended the 'Gyanotsav' organized on the occasion of Chhagan Bhujbal's birthday!
छगन भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त 'ज्ञानोत्सवास' (ETV Bharat Reporter)

शुभेच्छा रुपी मिळली पुस्तकं : "वाढदिवसाच्या निमित्तानं हजारोंच्या संख्येनं विविध विषयांवरील पुस्तकं शुभेच्छा रुपी मिळाली. त्यातून एक समृद्ध साहित्य संग्रह तयार झाला. तो संग्रह पुढं वाचनालयांना भेट देण्यात येणार आहे. ही कृती म्हणजे ज्ञानदानाच्या संस्कृतीचा सुंदर नमुना ठरली आहे. या साहित्य संपदेतून ग्रामीण तरुणाईला, विद्यार्थी वर्गाला आणि वाचनप्रिय समाजघटकांना त्यामुळं ज्ञानाचे नवे दरवाजे उघडतील.आजच्या काळात मोबाईलच्या पडद्यावर अडकलेलं मन पुन्हा एकदा पुस्तकांच्या पानांकडे वळावं, वाचनातून विचार आणि विचारातून परिवर्तन घडावं, हाच या उपक्रमामागचा खरा हेतू आहे," असं छगन भुजबळ यांनी सांगितलं.

Many luminaries attended the 'Gyanotsav' organized on the occasion of Chhagan Bhujbal's birthday!
छगन भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त 'ज्ञानोत्सवास' (ETV Bharat Reporter)

हेही वाचा :

  1. महाराष्ट्रातून सुरुवात; छत्तीसगड, तेलंगाणामधून नक्षलवादाचं लवकरच मोडणार कंबरडं: भूपतीच्या आत्मसमर्पण कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांना विश्वास
  2. ऑक्टोबर हिटच्या पार्श्वभूमीवर संसर्गजन्य आजारांमध्ये अनपेक्षित घट; राजावाडी रुग्णालयाचा अहवाल काय सांगतो?
  3. कोल्हापूरच्या गंगावेश परिसरात ओमनीचा भीषण अपघात; एक महिला ठार, तर दोन गंभीर जखमी