ETV Bharat / state

शिर्डी नगरपरिषद निवडणूक निकाल : महायुतीनं महाविकास आघाडीचा केला सुपडासाफ, विखे पाटलांनी नगरपरिषदेचा राखला गड

शिर्डी नगरपरिषद निवडणुकीत महायुतीनं महाविकास आघाडीचा सुपडासाफ केला. महायुतीच्या उमेदवार जयश्री थोरात यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना धूळ चारली.

Shirdi Nagar Palika Election
संपादित छायाचित्र (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : December 21, 2025 at 4:13 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

शिर्डी : नगरपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीसह लोक क्रांती सेना आघाडीनं मोठी ताकद लावली होती. मात्र मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली महायुतीनं सर्वांचा सुपडासाफ करत गड राखण्यात मोठं यश मिळवलं आहे. भाजपानं माजी नगराध्यक्ष जयश्री थोरात यांना पुन्हा एकदा उमेदवारी देत मैदानात उतरवलं होतं. त्यावर त्यांनी यश मिळवून ही उमेदवारी योग्य असल्याचं ठर

Shirdi Nagar Palika Election
विजयी उमेदवार जयश्री थोरात (ETV Bharat Reporter)

जयश्री थोरात यांना पुन्हा एकदा उमेदवारी : शिर्डी नगरपरिषद निवडणुकीत एकूण 23 उमेदवार आपलं नशीब आजमवत होते. महाविकास आघाडीनं या निवडणुकीत मोठी ताकद लावत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं नगराध्यक्ष पदासाठी भाग्यश्री सावकारे यांना रिंगणात उतरवलं. तर काँग्रेस पक्षाच्या वतीनं माधुरी शेजवळ यांना उमेदवारी देण्यात आली. भाजपाचे निष्ठावंत बाबुराव पुरोहित यांनी लोक क्रांती सेना आघाडीची स्थापना करून डॉ. कल्याणी आरणे यांना नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार म्हणून मैदानात उतरवलं. दुसरीकडं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाच्या वतीनं माजी नगराध्यक्ष जयश्री थोरात यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली.

Shirdi Nagar Palika Election
विजयी उमेदवार जयश्री थोरात (ETV Bharat Reporter)

भाजपाच्या उमेदवारानं चारली धूळ : भाजपाच्या उमेदवार जयश्री थोरात यांनी महाविकास आघाडी तसेच लोक क्रांती सेना आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना धूळ चारत मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवला आहे. शिर्डी नगरपरिषद निवडणुकीत 23 जागांपैकी महायुतीतील भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एकूण 20 जागा मिळाल्या असून 3 अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. शिर्डीत महायुतीनं नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदासाठी रिंगणात असलेल्या महाविकास आघाडी आणि लोक क्रांती सेना आघाडीचा सुपडासाफ करत मोठा विजय मिळवला आहे.

हेही वाचा :

  1. शंकरराव गडाख यांनी गड राखला मात्र 'सिंह' गेला; शिवसेना नगराध्यक्षपदाचे उमेदवार करणसिंह घुले मोठ्या मताधिक्क्यानं विजयी
  2. धामणगाव रेल्वेत भाजपाचा झेंडा, चिखलदऱ्यात काँग्रेसचा जल्लोष
  3. लाइव्ह Maharashtra Local Body Election Results 2025 Live : नगरपरिषद, नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये कोण बाजी मारणार? निकाल हाती येण्यास सुरुवात