ETV Bharat / state

कर्नाटकात लॉरी आणि बसची टक्कर, भीषण अपघातानं वाहनांना आग, आगीत होरपळून नऊ जणांचा मृत्यू

एका लॉरीची एका खासगी ट्रॅव्हल बसशी जोरदार टक्कर झाल्याने हा अपघात झाला असून, धडकेनंतर बस आणि लॉरी दोघांनाही आग लागली.

lorry and a bus collided in Karnataka
कर्नाटकात लॉरी आणि बसची टक्कर (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : December 25, 2025 at 9:32 AM IST

|

Updated : December 25, 2025 at 1:13 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

चित्रदुर्ग (कर्नाटक): कर्नाटकातील चित्रदुर्गात गुरुवारी पहाटे एक भीषण रस्ते अपघात झालाय. या अपघातात नऊ जणांचा जागीच मृत्यू झालाय. एका लॉरीची एका खासगी ट्रॅव्हल बसशी जोरदार टक्कर झाल्याने हा अपघात झाला असून, धडकेनंतर बस आणि लॉरी दोघांनाही आग लागली. या अपघातात बस पूर्णपणे जळून खाक झाली असून, अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला.

अपघातात बस पूर्णपणे जळून खाक : मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकात एका खासगी ट्रॅव्हल बसला एक लॉरीनं धडक दिली आणि त्यानंतर दोन्ही वाहनांना आग लागली. या अपघातात बस पूर्णपणे जळून खाक झाली, त्यात अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला. ही बस बंगळुरूहून शिवमोग्गा मार्गे गोकर्णला जात होती. हिरीयुर गोरलाट्टू क्रॉसजवळील जावंगोंडानहल्ली येथे हा अपघात झाला. लॉरीची धडक बसल्यानंतर अचानक बसमधून आगीच्या ज्वाळा निघाल्या. प्रवाशांनी पळून जाण्याचा प्रयत्न करताच आगीने त्यांना वेढले. आग इतक्या वेगाने पसरली की त्यात अनेकांचा मृत्यू झाला.

लॉरी चालकाचा मृत्यू झाला : आज पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात लॉरी चालकासह किमान नऊ प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी बचाव कार्य सुरू केलंय. अपघातावेळी वाहनामध्ये 30 प्रवासी होते, असे समजते. अपघाताबाबत अधिक माहिती मिळण्याची प्रतीक्षा आहे. अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी कुमारस्वामी बी.टी. यांनी माध्यमांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "बंगळुरूहून गोकर्णला जाणाऱ्या बसला अपघात झाला. विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका लॉरीने बसला धडक दिली, ज्यामुळे हा अपघात झाला. लॉरी चालकाचा मृत्यू झाला आणि त्याचा मृतदेह रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आलाय.

नऊ जण तुमकुर येथील सरकारी रुग्णालयात दाखल : वृद्धांसह 12 जखमींना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. नऊ जणांना तुमकुर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. बसमध्ये 30 हून अधिक प्रवासी असल्याचे वृत्त आहे. लॉरी चालकाच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली. मृतदेहांची अद्याप ओळख पटलेली नाही." गेल्या काही दिवसांपूर्वी अलिकडेच आंध्र प्रदेशातील कुर्नूल जिल्ह्यातही असाच एक अपघात घडला होता.

Last Updated : December 25, 2025 at 1:13 PM IST