ETV Bharat / state

कोल्हापुरात कुख्यात बिश्नोई गँगच्या म्होरक्यासह एकाला अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात सापळा रचून कुख्यात बिश्नोई टोळीच्या म्होरक्यासह त्याच्या साथीदाराला कारमधून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना ताब्यात घेतलं.

Bishnoi gang Leader Kolhapur arrest
कोल्हापुरात बिश्नोई गँगच्या म्होरक्यासह एकाला अटक (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : August 28, 2026 at 6:20 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

कोल्हापूर : कोल्हापुरात पोलिसांनी आंतरराज्यीय संघटित गुन्हेगारी टोळीविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारातून कुख्यात बिश्नोई टोळीचा म्होरक्या शामलाल गोवर्धनराम पुनिया (उर्फ बिश्नोई) आणि त्याचा साथीदार श्रीराम मंजू (उर्फ पाचाराम बिश्नोई) यांना ताब्यात घेतलं.

राजस्थान आणि पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे दोन्ही आरोपी अनेक गंभीर गुन्ह्यांच्या प्रकरणात फरार होते आणि पोलीस त्यांच्या शोधात होते. ते दोघे न्यायालय परिसरात येणार असल्याची माहिती मिळताच कोल्हापूर पोलिसांनी सापळा रचला. पार्किंगच्या जागेतून बाहेर पडत असताना पोलिसांना पाहताच त्यांनी आपल्या कारमधून पळून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र, पोलिसांनी गेट बंद करून त्यांचा मार्ग रोखला आणि त्या दोघांना ताब्यात घेतलं.

शामलाल पुनिया याच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, दरोडा आणि बेकायदेशीरपणे शस्त्रं बाळगणं यांसारखे 17 गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याचबरोबर, श्रीराम मंजू याच्यावर हत्येचा प्रयत्न, दरोडा, बलात्कार, विनयभंग, लुटालूट आणि घरफोडी यांसारख्या गुन्ह्यांसह एकूण 26 गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. पुढील तपासासाठी या दोन्ही आरोपींना संबंधित पिंपरी-चिंचवड आणि राजस्थान पोलीस दलांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं, बिश्नोई गँगवर राज्यासह राजस्थानमध्ये अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत, आंतरराज्यीय टोळी असलेल्या बिश्नोई गँगचे सदस्य आणि म्होरक्या कोल्हापुरात येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार कोल्हापुरातील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या परिसरात सापळा रचून कोल्हापूर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे.

राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील अटक

राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर कोल्हापुरात बिष्णोई गँगचा सदस्य अमोल गायकवाड याला मुंबई पोलिसांनी अटक केली होती. आज याच टोळीचा म्होरक्या गोवर्धनराम पुनिया (उर्फ बिश्नोई) आणि त्याचा साथीदार श्रीराम मंजू (उर्फ पाचाराम बिश्नोई) यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आता या टोळीचा म्होरक्या कोल्हापुरात कशासाठी आला होता, याचा तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा :

  1. नांदेडमध्ये हत्येचा थरार : जुन्या वादातून तरुणाची हत्या, आई, भाऊ गंभीर जखमी
  2. पोलिसवालेच दरोडेखोर!; मुंबई-नाशिक महामार्गावर 61 लाख लुटीचा थरार; पाच दरोडेखोरांना अटक